अपघात
…हा रस्ता ठरला मृत्युपथ,एका दिवसात अगणित अपघात !

न्युजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव शहराच्या जवळून जात असलेल्या व नव्याने राष्ट्रीय महामार्ग घोषित केलेल्या सावळीविहीर-मालेगाव या मार्गावर पुणतांबा चौफुलीवर वर्तमानात रस्त्याचे काम होण्याची सुतराम शक्यता नाही उलट या चौफुलीवर रस्त्यावर खड्डे बुजविण्यासाठी संबधित ठेकेदाराने माती टाकल्याने आज थोड्याशा पावसाने अनेक दुचाकीस्वारांना त्या निसरड्या ठिकाणी अपघातांचा सामना करावा लागला असून तो वर्तमानात मृत्युपथ बनला असून त्या ठिकाणी तातडीने मुरूम टाकून सदरचे अपघात थांबवावे अशी मागणी सिने अभिनेते चंद्रकांत शिंदे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केली आहे.

“आज दुपारी झालेल्या पावसाने अनेक दुचाकीस्वारांचा तोल जाऊन ते आपल्या मागील जोडीदाराला घेऊन पडताना दिसत होते.त्यामुळे अनेकांना ईजा पोहचत होती.तर काही अवजड वाहनांच्या खाली जाता-जाता वाचले आहे.त्यामुळे या रस्त्यावर तातडीने कडक मुरूम टाकून त्या पुणतांबा चौफुली ते गोदावरी नदीवरील पुलापर्यंत तातडीने खड्डे बुजवावे’-चंद्रकांत शिंदे,सिनेअभिनेते व कार्यकर्ते कोपरगाव.
अहिल्यानगर-कोपरगाव राज्यमार्गाला पाच वर्षांपूर्वी राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला.मात्र,राष्ट्रीय महामार्गात रूपांतर होताना त्याचे दोन तुकडे झाले.सावळीविहीर ते नगर या अंतरातील रस्त्याला १६० क्रमांक,तर सावळीविहीर ते येवला अंतरातील रस्त्याला ७५२-जी,असा क्रमांक मिळाला.नगर दक्षिणचे खा.सुजय विखे यांनी दिल्ली येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अध्यक्ष यांची आज भेट घेतली असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.सावळीविहीर ते नगर अंतरातील राष्ट्रीय महामार्गाचे काम येत्या जानेवारीत सुरू होईल अशी राणा भीमदेवी गर्जना झाली होती.त्यावेळी हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ताब्यात घेतला होता.मात्र,राज्य सरकारने काम केलेला कोपरगाव ते नगर दरम्यान हा रस्ता निकृष्ट झाल्याने,दर पावसाळ्यात खड्यांच्या महापुरात जातो.त्याच्या त्याच्या दुरुस्तीसाठी तत्कालीन आमदारांनी खास बाब (?) म्हणून सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी ४० कोटी रुपये मंजूर केले होते.त्यातून खड्डे कसेबसे बुजविण्याचे काम सुरू झाले होते.मात्र ताह्यात सदर खड्डे काही बुजले नाही.

केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या राज्यात नगर-मनमाड या रस्त्याने आणि येथील पुढाऱ्यांनी आपल्याला अपयशाचे धनी बनवले असल्याची सल वेळोवेळी बोलून दाखवली आहे.येथील पुढाऱ्यांचा टक्का कामास मोठी अडचण आणतो असे थेट ठणकावले आहे.तर नगर येथील प्रचार सभेत उत्तरेतील एका महिला लोकप्रतिनिधींनीने या मार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी केंद्रीय मंत्री गडकरी यांना निवेदन देऊन जाहीर प्रचार सभेत आपले हासे करून घेतले होते.तरीही यातून कोणी काही बोध घेण्याची सुतराम शक्यता नाही.
दरम्यान त्या आधी मुख्यमंत्री असताना विलासराव देशमुख यांनी या रस्त्याचे नगर येथे भूमिपूजन केले होते.आज त्याला पंचवीस वर्षे उलटली आहे.मात्र या रस्त्याचे दुरावस्थेचे दशावतार संपण्याचे कोणतेही चिन्ह नाही.उलट या रस्त्याच्या बाबतीत केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या देशात या रस्त्याने आणि येथील पुढाऱ्यांनी अपयशाचे धनी बनवले असल्याची सल वेळोवेळी बोलून दाखवली आहे.येथील पुढाऱ्यांचा टक्का कामास मोठी अडचण आणतो असे थेट ठणकावले आहे.तर नगर येथील प्रचार सभेत उत्तरेतील एका महिला लोकप्रतिनिधींनीने या मार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी केंद्रीय मंत्री गडकरी यांना निवेदन देऊन जाहीर प्रचार सभेत आपले हासे करून घेतले होते.तरीही यातून कोणी काही बोध घेण्याची सुतराम शक्यता नाही.भाजपने याच पिंडीवरच्या काँग्रेसी विंचवांना पुढे पावन करून घेतले आहे.आणि पुढचे पाढे पंचावन्न अशी अवस्था निर्माण झाली आहे.त्यामुळे मात्र सामान्य प्रवासी आणि ग्रामस्थ यांचे बळी मात्र हकनाक जात आहे.

वर्तमानात नैऋत्य मोसमी पाऊस सुरू असून पर्जन्यछायेचा प्रदेश असल्याने या ठिकाणी झिमझिम पाऊस सुरू असतो.परिणामी रस्त्यावर खड्ड्यात टाकलेली काळी माती रस्त्याला निसरडे बनून ती दुचाकीस्वारांना मृत्युपथ बनवत आहे.त्यामुळे आज दुपारी झालेले पावसाने आज त्याचा अनेकांना दाहक अनुभव आला आहे.
त्यातच सन-२०२७ मध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे.कुंभमेळ्यात देश-विदेशातून लाखोंच्या संख्येने भाविक येणार असल्याने,वाहतूक व्यवस्थेसह संपूर्ण पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करण्यासाठी मागील महिन्यात २३ जून रोजी नागपूरमध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली त्यात नाशिक आणि शिर्डीला जोडणाऱ्या विविध नऊ रस्त्यांना ०४ हजार कोटी रुपये नितीन गडकरी यांनी मंजूर केले आहे त्यात या शिर्डी सावळीविहीर मनमाड-मालेगाव या रस्त्याचा समावेश आहे.त्यामुळे या भागातील नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

मात्र वर्तमानात सावळीविहीर,कोपरगाव बेट आणि पुणतांबा चौफुली वरील पुल तातडीने पूर्ण होण्याची कोणती शक्यता दिसत नाही.त्यामुळे त्यास बायपास करून दिले जात असताना त्याकडे सपशेल दुर्लक्ष होत असताना दिसत आहे.मात्र केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग हा त्या बायपास रस्त्यावर साधे खड्डे बुजविण्याची तसदी घेताना दिसत नाही.ती घेतली तर त्यावर काळी माती टाकून त्यावर जनतेची परीक्षा घेताना दिसत आहे.वर्तमानात नैऋत्य मोसमी पाऊस सुरू असून पर्जन्यछायेचा प्रदेश असल्याने या ठिकाणी झिमझिम पाऊस सुरू असतो.परिणामी रस्त्यावर खड्ड्यात टाकलेली काळी माती रस्त्याला निसरडे बनून ती दुचाकीस्वारांना मृत्युपथ बनवत आहे.त्यामुळे आज दुपारी झालेले पावसाने आज त्याचा अनेकांना दाहक अनुभव आला आहे.मात्र याबाबत कोणी लोकप्रतिनिधी त्याची दखल घेतो ना प्रशासनिक अधिकारी.त्यामुळे नागरिकांना केवळ हात आणि पाय मोडून दवाखान्यात भरती होणे एवढेच त्यांच्या हाती राहिले आहे.त्यामुळे स्थानिक नेत्यांना शेलक्या शब्दात आशीर्वाद (!) देण्याशिवाय त्यांचेकडे कोणताही पर्याय असल्याचे दिसत नव्हते.तर काही लोकप्रतिनिधींना व्हिडिओ पाठवा असा सल्ला देताना दिसत होते.
आज दुपारी झालेल्या पावसाने अनेक दुचाकीस्वारांचा तोल जाऊन ते आपल्या मागील जोडीदाराला घेऊन पडताना दिसत होते.त्यामुळे अनेकांना ईजा पोहचत होती.तर काही अवजड वाहनांच्या खाली जाता जाता वाचले आहे.त्यामुळे या रस्त्यावर तातडीने कडक मुरूम टाकून त्या पुणतांबा चौफुली ते गोदावरी नदीवरील पुलापर्यंत तातडीने खड्डे बुजवावें अशी मागणी ही चंद्रकांत शिंदे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केली आहे.