धार्मिक
कोपरगावांत आषाढी एकादशी उत्साहात संपन्न

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात विविध शाळांनी दिड्यांचे तर विविध तरुण मित्र मंडळांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.तर अनेक मित्र मंडळांनी खिचडी प्रसादाचे उपस्थित भाविकांना केले आहे.त्यामुळे संपूर्ण शहर या आषाढी एकादशीत रंगून गेले असल्याचे दिसून आले आहे.त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आषाढी एकादशीच्या दिवशी संत एकनाथ महाराज यांचे आजोबा संत भानुदास महाराजांनी भगवान पांडुरंगाला विजयनगरची राजधानी असलेल्या हम्पी येथून एक चमत्कार घडवून राजाच्या तावडीतून सोडवून आणले होते अशी समाज मान्यता आहे.त्यामुळे या दिवशी पुन्हा एकदा पांडुरंगाची मूर्ती पंढरपूर येथे विराजमान झाली होती.त्यामुळे ५०० वर्षापूर्वी हा उत्सव बनला होता तो आजतागायत सुरू आहे.
महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकादशीला पायी चालत येतात.कारण याच दिवशी संत एकनाथ महाराज यांचे आजोबा संत भानुदास महाराजांनी भगवान पांडुरंगाला विजयनगरची राजधानी असलेल्या हम्पी येथून एक चमत्कार घडवून सोडवून आणले होते अशी समाज मान्यता आहे.त्यामुळे या दिवशी पुन्हा एकदा पांडुरंगाची मूर्ती पंढरपूर येथे विराजमान झाली होती.त्यामुळे ५०० वर्षापूर्वी हा उत्सव बनला होता तो आजतागायत सुरू आहे.हिलाच आषाढी वारी म्हणतात.चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात.आषाढीला या दिवशी पंढरपुरास शेगाव येथून संत गजानन महाराजांची,आळंदीहून ज्ञानेश्वरांची,देहूहून तुकारामांची,त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची,मुक्ताईनगर येथून मुक्ताबाई यांची,उत्तर भारतातून कबीरांची,श्री गांगागिरीजी महाराज यांची सरला बेटातून पालखी येते.या शिवाय राज्य भरातून हजारो पालख्या या दिवशी दर्शनासाठी येत असतात.ज्यांना येणे शक्य होत नाही अशी भक्त मंडळी गावात असलेल्या विठ्ठल मंदिरात दिंडीचे आयोजन करतात व एकमेकाला आषाढी एकादशीनिमित्त विविध शुभेच्छा संदेश दिले जातात.

दरम्यान राज्यातील विविध गावात स्थानिक विठ्ठलाची मंदिरे,शाळा यांच्यामध्ये आषाढी एकादशीनिमित्त दिंडी आयोजित केली जाते.तर अनेक ठिकाणी खिचडी प्रसाद वाटपाचे आयोजन केले जाते.कोपरगावसह तालुक्यात या दींड्या आणि प्रसाद वाटपाचे विविध कार्यक्रम आयोजन केले होते.कोपरगाव शहरात अजित पवार राष्ट्रवादी गटाने कोपरगाव तहसील कार्यालयाजवळ या खिचडी प्रसाद वाटपाचे आयोजन केले होते.तर शिवसेना रिक्षा संघटना यांनी बस स्थानकासमोर या प्रसाद वाटपाचे आयोजन केलं होते.तर विघ्नेश्वर चौकात माजी नगरसेवक स्व.कांतिभाई कहार यांचे स्मरणार्थ नरसिंह मित्र मंडळाने खिचडी,राजगिरा लाडू प्रसादाचे वितरण केले आहे.तर विर सावरकर चौकात एका मित्र मंडळाने खिचडी प्रसाद वाटप केले आहे.

दरम्यान या आषाढी एकादशीच्या दिवशी रविवार असल्याने अनेक प्राथमिक शाळांनी आदल्या दिवशीच लहान बालकांच्या हाती टाळ,मृदुंग,भगवी पताका देऊन, कपाळी अष्टगंध लेऊन दिंड्यांचे आयोजन करून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते.त्यात भगवान विठ्ठलाचे रुप बालकानी घेऊन नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते तर अन्य बालकांनी वारकरी,संताचा वेश धारण करून दिंडीत सहभाग नोंदवला आहे.त्यात प्रामुख्याने निवारा या उपनगरातील दादाप्पा कोयटे प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते.