निधन वार्ता
कोपरगाव नगरपरिषद कर्मचाऱ्याचे निधन !

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगांव शहरातील ब्राम्हण सभेचे उपाध्यक्ष व नगरपालिकेतील निवृत्त कर्मचारी गोविंद पांडूरंग जवाद (वय-६३) यांचे नुकतेच हृदयविकाराने पुणे येथे निधन निधन झाले आहे.त्यांचे पश्चात पत्नी अॅड.श्रद्धा जवाद,मुलगी गायत्री,सुहास व सीमाताई जमदग्नी,दिपिका शिवलकर,मोठे भाऊ असा मोठा परिवार आहे.

स्व.गोविंद जवाद हे अत्यंत विनयशील आणि आपल्या सहकाऱ्यांत प्रिय होते.कामावर निष्ठा असलेले व्यक्तिमत्त्व होते.त्यांचेवर कोपरगाव येथील अमरधाम येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
स्व.गोविंद जवाद हे अत्यंत विनयशील आणि आपल्या सहकाऱ्यांत प्रिय होते.कामावर निष्ठा असलेले व्यक्तिमत्त्व होते.त्यांचेवर कोपरगाव येथील अमरधाम येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.सदर अंत्यविधी प्रसंगी माजी नगराध्यक्ष संजय सातभाई,बांधकाम व्यावसायिक प्रसाद नाईक,न्यायालयीन कर्मचारी,वकील संघाचे पदाधिकारी,नगरपालिका क्षेत्रातील तसेच व्यापारी,ब्राह्मण सभेचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
सदर प्रसंगी ब्राम्हण सभा कोपरगांव यांचे तर्फे गोविंद जवाद यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.त्यांच्या निधनाबद्दल आ.आशुतोष काळे,माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे आदींनी दुःख व्यक्त केले आहे.सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.