जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
अपघात

दशक्रिया नंतर अपघात एक ठार,एक जखमी

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी )

   कोपरगाव शहराच्या उत्तरेस दीड किमी अंतरावर असलेल्या येवला नाक्यानजिक् असलेल्या उमा ब्रीज जवळ उभ्या असलेल्या दुचाकीस (क्रं.एम.एच.१५ ई.व्हि.३१६८) मागून येणाऱ्या तामिळनाडूमधील ट्रकने (क्रं.टी.एन.८८ जे.४१८३) आज दुपारी १२ च्या सुमारास जोराची धडक दिल्याने त्या अपघातात वेद कॉलनी येवला येथील महिला संगीता रामकृष्ण महाले (वय-५६) ही महिला जागीच ठार झाली आहे.या बाबत तिचा पती रामकृष्ण माधव महाले (वय-६२)यांनी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मयत महिला संगीता महाले यांचे छायाचित्र.

दरम्यान सदर मयत महिला संगीता महाले आणि त्यांचे पतीच्या हे साकुरी येथील मामी भागीरथीबाई रामनाथ लूटे यांच्या दशक्रिया विधीसाठी गेले होते.येताना ही दुर्दैवी घटना घडली आहे.त्यांच्या पश्चात जखमी पती,एक मुलगा,सून,नातवंडे,दोन विवाहित मुली असा परिवार आहे.त्यांचेवर आज सायंकाळी ७.३० वाजता येवला येथे अंत्यसंस्कार करणेत येणार आहेत.

   कोपरगाव तालुक्यात नगर -मनमाड रस्ता हा मृत्यूचा सापळा ठरला असून यावर दर आठवड्यात दोन किंवा तीन अपघात होऊन त्यात दगवणाऱ्यांच्या संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.हा रस्ता या पूर्वीच वाहनांची वाढलेले संख्या विचारात घेता सहा पदरी होणे गरजेचे होते.मात्र अद्याप या कामाला मुहूर्त लागलेला नाही.जे काही काम सुरू आहे.त्याची मुदत संपूनही सदरचे काम पूर्ण झालेले नाही.त्यावर ना सार्वजनिक बांधकाम विभागाचे नियंत्रण आहे ना राजकीय नेत्यांचे.याभागात नेते मोठे आणि लक्षण खोटे अशी स्थिती रस्त्यांच्या बाबतीत आढळून येत आहे.त्यामुळे अपघात होणे आणि त्यात जीवित आणि वित्तीय हानी होणे या बाबी कोपरगावकरांना सामान्य बनल्या असून जनतेची त्यामुळे संवेदनशीलता संपली असल्याचे जाणवत आहे.अशीच एक घटना आज दुपारी १२ वाजेंच्या सुमारास येवला नाका जवळ उमा ब्रीज जवळ घडली असून यातील येवला शहरातील जोडपे हे आपल्या दुचाकीवर असताना त्यांना मागील बाजूने तामिळनाडू मधील ट्रकने भरधाव वेगाने वरील क्रमांकाच्या दुचाकीस जोराची धडक दिली आहे.त्यात सदरची संगीता महाले ही महिला जागीच ठार झाली आहे.तर तिचा पती या अपघातात जखमी झाला आहे.दरम्यान या अपघातानंतर आरोपी चालक आय्याहू अतियप्पा गोउंडर रा.ईस्ट स्ट्रीट,पल्लपालन,जिल्हा-नमक्कल हा फरार झाला आहे.दरम्यान घटनास्थळी पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांचेसह पोलिस उपनिरीक्षक संजय पवार आदींनी भेट दिली असून घटनास्थळाची पाहणी केली आहे.

  दरम्यान सदर मयत महिला संगीता महाले आणि त्यांचे पतीच्या हे साकुरी येथील मामी भागीरथीबाई रामनाथ लूटे यांच्या दशक्रिया विधीसाठी गेले होते.येताना ही दुर्दैवी घटना घडली आहे.त्यांच्या पश्चात जखमी पती,एक मुलगा,सून,नातवंडे,दोन विवाहित मुली असा परिवार आहे.त्यांचेवर आज सायंकाळी ७.३० वाजता येवला येथे अंत्यसंस्कार करणेत येणार आहेत.

  दरम्यान याबाबत शहर पोलिस ठाण्यात मयत महिलेचा पती रामकृष्ण महाले यांनी गुन्हा क्रं.३२५/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १०६(१),२८१,१२५,(अ)(ब),३२४(४)सह मोटार वाहन कायदा कलम १८४,१३१,(अ)(ब)१७७ प्रमाणे आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हे.कॉ.बबन तमनर हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close