जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

वीज वितरण कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक-आरोप

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

    मागील गेल्या दीड महिना पासून श्रीरामपूर तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये वीज वितरण कंपनीकडून वीज वितरण करण्यामध्ये सातत्याने असमर्थता दिसून येत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी आपल्या दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात केला आहे.

  

“श्रीरामपूर तालुक्यातील वाड्या-वस्त्यावर राहणाऱ्या तसेच शहरी व ग्रामीण नागरिकांना वीज नसल्यामुळे अनेक प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.विशेषतः ग्रामीण भागातील सार्वजनिक पाणीपुरवठ्यांच्या बाबत मोठा अडथळा निर्माण होत असल्याने  दोन-दोन दिवस नागरिकांना पिण्याचा पाणी पुरवठाही होत नाही.त्यात सुधारणा न केल्यास शेतकरी आंदोलन करील”- अनिल औताडे,जिल्हाध्यक्ष,शेतकरी संघटना,नगर जिल्हा.

   वीज वितरण कंपनीने मुळा प्रवरा सहकारी विज संस्थेचा वीज वितरण परवाना रद्द झाल्यानंतर २०१० मध्ये संस्थेच्या कार्यक्षेत्रातील संपूर्ण मालमत्तेसह ताबा घेऊन वीज वितरणाचे काम करत आहे.परंतु वीज वितरण कंपनीने सदर स्ट्रक्चरवर कुठलेही देशभालीचे काम केले गेले नाही हे विषेश ! गेल्या दिड महिन्यापासून बाभळेश्वर ते हरेगाव, नायगाव एम.आय.डी.सी.सबस्टेशन पर्यंत येणारा ३३ केव्ही लाईनवर कुठलीही देखभाल दुरुस्ती न केल्यामुळे वाहकतारा-पोल जवळ मोठमोठी झाडे झाडांच्या फांद्या सातत्याने स्ट्रक्चर वर पडून वीज पुरवठा खंडित होताना दिसत आहे.तसेच सबस्टेशन पासून गावोगावी जाणारा ११ के.व्ही.वीज पुरवठा सुद्धा अशाच पद्धतीने पोल पडणे वीज वाहक तारा तुटणे या बाबी सातत्याने होत आहे.थोडासा पाऊस व वारा आला किंवा दिसला तरीही सातत्याने वीज पुरवठा खंडित होत आहे.श्रीरामपूर तालुक्यातील वाड्या-वस्त्यावर राहणाऱ्या तसेच शहरी व ग्रामीण नागरिकांना वीज नसल्यामुळे अनेक प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.विशेषतः ग्रामीण भागातील सार्वजनिक पाणीपुरवठ्यांच्या बाबत मोठा अडथळा निर्माण होत असल्याने  दोन-दोन दिवस नागरिकांना पिण्याचा पाणी पुरवठाही होत नाही.अशा परिस्थितीमध्ये वीज वितरण कंपनीकडे मनुष्यबळाचा अभाव असल्याचे सातत्याने दिसून येत आहे.यावरून वीज वितरण कंपनी वीज पुरवठा सुरळीत न देता ग्राहकांकडून विज बिल आकारण्याचे मोठे काम करत आहे शिवाय शेती ग्राहकांचेही शासनाकडून मोठ्या प्रमाणात अनुदान लाटत आहे.या गंभीर समस्याबाबत शासन स्तरावर लोकप्रतिनिधी अथवा जिल्ह्याचे जबाबदार मंत्री ठोस पावले उचलताना दुर्दैवाने दिसत नाही.

   वास्तविक मुळा प्रवरा वीज संस्थेच्या कार्यक्षेत्रात पन्नास वर्षांपूर्वी वापरलेले ॲल्युमिनियम वाहक तारा-सिमेंट पोल बदलणे गरजेचे आहे परंतू याबाबत वीज वितरण कंपनीची कुठलीही कार्यवाही करताना दिसत नाही.स्ट्रक्चर जवळ वाढलेली मोठमोठी झाडी काढण्याचे कामही होत नाही.तरी शासनाने याबाबत तात्काळ दखल घेऊन येणाऱ्या पावसाळी ऋतूमध्ये शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही सामान्य जनतेसह वाड्यावर राहणाऱ्या शेतकऱ्यांना सुरळीत विद्युत पुरवठा करावा.वीज वितरण कंपनीच्या या अनागोंदी कारभार विरोधात जनतेमध्ये मोठा असंतोष निर्माण होत आहे तरी याबाबतची दखल घेऊन वीज वितरणाबाबत भविष्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी ठोस पावले उचलावी अन्यथा अहिल्यानगर जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शेतकरी संघटनेने प्रसिद्धी पत्रकारद्वारे दिला आहे.

   सदर पत्रकावर जिल्हाध्यक्ष अनिल औताडे,तालुका अध्यक्ष युवराज जगताप,जिल्हा सचिव रूपेंद्र काले,राज्य प्रसिद्धीप्रमुख नानासाहेब जवरे,जिल्हा उपाध्यक्ष हरिभाऊ तुवर, जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी जवरे,नेवासा तालुका अध्यक्ष अशोक काळे,राहुरी तालुका अध्यक्ष नारायण टेकाळे,डॉ.दादासाहेब आदिक,सुदाम औताडे,डॉ.विकास नवले,शरद पवार,बबन उघडे,भास्कर तूवर,कैलास पवार,श्रीरामपूर युवा आघाडीचे शरद असणे,नेवासा युवा आघाडीचे डॉ.रोहित कुलकर्णी,संतोष पटारे,सुजित बोडके,सागर गिऱ्हे,सतीश नाईक,समीर रोकडे,सुनील असणे,बाळासाहेब असणे,संपत मुठे,गोविंद वाघ,अहमद शेख आदींच्या सह्या आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close