जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
दळणवळण

…या पंतप्रधान सडक योजनेचे वाजले बारा !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

संवत्सर -(प्रतिनिधी)

   कोपरगाव तालुक्याच्या पूर्व बाजूकडील गावांना वरदान ठरणारा संवत्सर ते शिरसगाव हा पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत साधारण पंधरा वर्षापूर्वी बांधण्यात आलेला रस्ता वर्तमानात पूर्ण उद्ध्वस्त झाला असून या रस्त्याने प्रवास करणे ग्रामस्थांना महाग पडत असल्याचे दिसून आले आहे.सदरचा रस्ता तातडीने पुन्हा नवीन बांधण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

    

कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ते शिरसगाव हा कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागास जोडणारा जवळपास २० कि.मी. चा रस्ता तत्कालीन सरकारने पंतप्रधान सडक योजनेतून पूर्ण केला होता.त्याला आता जवळपास पंधरा वर्षांचा कालखंड उलटला असून वर्तमानात हा रस्ता अत्यंत दयनीय अवस्थेत पोहचला आहे.परिणामी या मार्गावर मोठया प्रमाणावर अपघात वाढले आहे.

   तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी दिनाक १५ ऑगस्ट २००० रोजी पंतप्रधान ग्रामीण रस्ते योजनेची घोषणा केली होती,ज्यामुळे पूर्वी संपर्क नसलेल्या गावांना रस्ते उपलब्ध होतील.ही एक केंद्र पुरस्कृत योजना आहे आणि ती केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वांनुसार राबविली जाते.पंतप्रधान ग्रामीण रस्ते योजनेचा उद्देश ५०० किंवा त्याहून अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामीण भागातील (आदिवासी भागात २५० किंवा त्याहून अधिक) संपर्क नसलेल्या भागात सर्व हवामान रस्ते जोडणी प्रदान करणे हा होता.
पंतप्रधान ग्रामीण रस्ते योजनेच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत (२०००-२०१३) ५,६०७ रस्त्यांपैकी एकूण २४,२१० किमी रस्त्यांना मंजुरी देण्यात आली होती,त्यापैकी ५,५९९ रस्त्यांपैकी २४,१६७ किमी रस्त्यांचे काम पूर्ण झाले होते.याव्यतिरिक्त,मंजूर झालेल्या ६७७ पुलांपैकी ६७३ पुलांचे काम पूर्ण झाले आहे.या टप्प्यासाठी एकूण ७,२४१ कोटी रुपये खर्च आला असल्याची माहिती आहे.त्यात कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ते शिरसगाव हा कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागास जोडणारा जवळपास १० कि.मी. चा रस्ता तत्कालीन सरकारने पूर्ण केला होता.त्याला आता जवळपास पंधरा वर्षांचा कालखंड उलटला असून वर्तमानात हा रस्ता अत्यंत दयनीय अवस्थेत पोहचला आहे.परिणामी या मार्गावर मोठया प्रमाणावर अपघात वाढले आहे.त्यात अनेकांना आपला जीव गमावावा लागला आहे.तर अनेक जण जायबंदी झाले आहे.अनेकांचे वित्तीय नुकसान झाले ते वेगळेच आहे.या रस्त्यावर संवत्सर हे मोठे गाव असून पुढे कासली,दहिगाव बोलका,शिरसगाव आदी भागातील शेतकऱ्यांना तो वरदान ठरला आहे.त्यामुळे या रस्त्याचे काम पूर्ण होणे गरजेचे आहे.त्यासाठी ग्रामस्थांनी हा रस्ता तातडीने पूर्ण करावा अशी मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close