दळणवळण
…या महामार्गाबाबत लोकप्रतिनिधींना जाग आली हो…!

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातून जाणाऱ्या आणि उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणाऱ्या नगर मनमाड या मार्गाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने मोठ्या प्रमाणावर वाहातूक कोंडी होत असताना अपघाताची संख्या विक्रमी पातळीवर वाढली असताना व माध्यमांत यावर वारंवार बातम्या प्रसिद्ध झाल्यावर कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांना जाग आली असल्याचे दिसून आले असून त्यांनी अधिकाऱ्यांना उशिरा का होईना कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.त्यामुळे जनतेला काही अंशी का होईना दिलासा मिळाला आहे.

दरम्यान हीच बाब झगडे फाटा ते वडगाव पान या रस्त्याची झाली असून पोहेगाव ते रांजणगाव देशमुख या दरम्यान तर खड्डेच खड्डे तयार झाले असून मागील वर्षी काम होऊनही एका महिन्यात रस्ता होत्याचा नव्हता झाला आहे.संबधित ठेकेदारावर कोणी अधिकारी व राजकीय नेता कारवाई करण्याचे नाव घेताना दिसत नाही हे मोठे आश्चर्य आहे.या मागील इंगित जनतेला समजायला तयार नाही.त्यामुळे हा रस्ता आणखी किती बळी घेणार असा सवाल निर्माण झाला आहे.
कोपरगाव शहरानजीक असलेल्या व दक्षिण भारतास जोडण्यास अहंम भूमिका निभावणाऱ्या नगर-मनमाड मार्गाचे काम तब्बल वीस वर्षे उलटूनही पूर्णत्वास न गेल्याने या मार्गावर बळी जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आजही एक कोपरगाव कडून मुंबईकडे जाणारी कोपरगाव शहरातील महिला रुक्साना हसन बागवान (वय-६६) यांचा पुणतांबा चौकात कंटेनर खाली सापडून बळी गेला असल्याची धक्कादायक घटना मागील हप्त्यात घडली होती.दरम्यान लग्न तिथीचा मोठा मुहूर्त असल्यावर सर्वच नागरिकांनी घराच्या बाहेर आपली दुचाकी आणि चारचाकी वाहने काढल्यावर कोपरगाव शहराच्या दक्षिणेस साधारण अडीच कि.मी.अंतरावर असलेल्या पुणतांबा फाटा येथे वारंवार वाहनांनी मोठी गर्दी होत असल्याचे दिसून आले आहे.नगर-मनमाड मार्गावर पुणतांबा फाटा चौफुली या ठिकाणी तर पुलाचे काम सुरू असल्याने व पर्यायी रस्ताच संबधित ठेकेदाराने तयार केला नसल्याने ही वाहतूक कोंडी आणि अपघात प्रवणता विशेष वाढत आहे.अनेक रुग्णांचे जीव हकनाक जात आहेत.मात्र यावर राजकीय नेत्यांनी आपल्या तोंडात मिठाची गुळणी धरली होती.त्यामुळे सामान्य नागरिक आणि प्रवाशी यांचे जीव स्वस्त झाले होते.यावर आमच्या प्रतिनिधीने ‘न्युजसेवा’ मार्फत वारंवार आवाज उठवला आहे.यावर आता विद्यमान लोकप्रतिनिधी यांना जाग आली असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान हीच बाब झगडे फाटा ते वडगाव पान या रस्त्याची झाली असून पोहेगाव ते रांजणगाव देशमुख या दरम्यान तर खड्डेच खड्डे तयार झाले असून मागील वर्षी काम होऊनही एका महिन्यात रस्ता होत्याचा नव्हता झाला आहे.संबधित ठेकेदारावर कोणी अधिकारी व राजकीय नेता कारवाई करण्याचे नाव घेताना दिसत नाही हे मोठे आश्चर्य आहे.या मागील इंगित जनतेला समजायला तयार नाही या रस्त्यावर किती बळी गेल्यावर राजकीय नेत्यांना जाग येणार असा सवाल प्रवाशी आणि नागरिकांनी केला आहे.

याबाबत आ.काळे यांनी प्रथमच तोंड उघडले असून त्यांनी आपल्या प्रसिध्दी पत्रकात म्हंटले आहे की,” या राष्ट्रीय महामार्ग ७५२ जी महामार्गावरील कोपरगांव सावळीविहीर रस्त्याचे कामासाठी आपण १९१ कोटी निधी मंजूर करून आणला आहे.परंतु या महामार्गाचे काम सुरु झाल्यापासून आजतागायत या महामार्गाचे काम संबंधित ठेकेदार अत्यंत संथ गतीने करीत असल्यामुळे सदर कामाची मुदत संपली असतांना देखील या महामार्गाचे काम पूर्ण होवू शकले नसल्याची कबुली दिली आहे.तसेच काम करीत असतांना नियोजनाचा अभाव असल्यामुळे या महामार्गावर रहदारीला येणाऱ्या अडथळ्यामुळे अपघाताचे प्रमाण देखील वाढलेले असून नागरीकांना आपले प्राण गमवावे लागलेले आहे. त्यामुळे या रस्त्याने प्रवास करतांना नागरीकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
कोपरगांव मतदार संघात मागील काही दिवसांपासून सातत्याने पडत असलेला पाऊस व या महामार्गावर असलेले तिर्थक्षेत्र,महाविद्यालय,तसेच मोठ्या प्रमाणात विवाह सोहळे होत असल्यामुळे रहदारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे.संबंधित ठेकेदाराने योग्य नियोजन न करता सर्व्हिस रोड पूर्ण करण्यापूर्वीच उड्डाण पुलाचे काम हाती घेतल्यामुळे रहदारीच्या अडचणी अधिक प्रमाणात वाढल्या असून रहदारीस वारंवार अडथळे निर्माण होत आहेत.परिणामी वेळोवेळी रहदारी थांबली जावून त्याचा फटका अत्यवस्थ रुग्णाला रुग्णालयात घेवून जाणाऱ्या रुग्णवाहिकांना देखील बसत असल्यांची कबुली दिली आहे व या महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढून जीवित हानी देखील होत आहे.परंतु याबाबत सबंधित ठेकेदार आणि अधिकारी देखील गंभीर नसून ठेकेदाराची कामाची मुदत संपलेली असतांना देखील अद्याप कामात सुधारणा झालेली नाही.त्यामुळे सुरु असलेले सावळीविहीर फाटा ते कोपरगाव रस्त्याचे काम योग्य नियोजन करून लवकरात लवकर पूर्ण करावे अन्यथा ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचा ईशारा आ.काळे यांनी शेवटी दिला आहे.त्यामुळे आता खरोखरच या ठेकदरावर कारवाई होणार का असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे.