जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
अपघात

पुन्हा वाहनकोंडीचा बळी,ठेकेदार,अधिकारी की राजकीय नेते,जबाबदार कोण ?

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव –(नानासाहेब जवरे)

   कोपरगाव शहरानजीक असलेल्या व दक्षिण भारतास जोडण्यास अहंम भूमिका निभावणाऱ्या नगर-मनमाड मार्गाचे काम तब्बल वीस वर्षे उलटूनही पूर्णत्वास न गेल्याने या मार्गावर बळी जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आजही एक कोपरगाव कडून मुंबईकडे जाणारी कोपरगाव शहरातील महिला रुक्साना हसन बागवान (वय-६६) यांचा पुणतांबा चौकात कंटेनर (क्रं.एम.एच.४३ सी.ई.८६९३) खाली सापडून बळी गेल्याने याबाबत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

घटनास्थळी नागरिकांनी केलेली गर्दी दिसत आहे.

या रस्त्याबाबत शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी लोकसभेत हा प्रश्न उपस्थित करून गडकरी याचे लक्ष वेधून घेतले होते.त्यांनी त्याबाबत अडीच हजार कोटी रुपयांची संसदेत घोषणा केली आहे.मात्र काम सुरू असताना पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबधित कंपनीची असताना याबाबत राजकीय प्रतिनिधी चकार शब्द काढताना दिसत नाही.परिणामी रस्त्यावरील खड्डे बुजवले जात नाही.परिणामी रस्ते अपघातात लक्षणीय वाढ होत आहे.

   आज लग्न तिथीचा मोठा मुहूर्त असल्याने सर्वच नागरिकांनी घराच्या बाहेर आपली दुचाकी आणि चारचाकी वाहने काढल्याने कोपरगाव शहराच्या दक्षिणेस साधारण अडीच कि.मी.अंतरावर असलेल्या पुणतांबा फाटा येथे आज सकाळ पासून वाहनांनी मोठी गर्दी केली असल्याने आज नगर-मनमाड मार्गावर पुन्हा एकदा लग्न कोंडी झाली असल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे वाहनांच्या दोन्ही बाजूंना दूरदूरपर्यंत वाहनाच्या लांबच लांब रांगा आढळून आल्या असून अनेकांचा लग्न मुहूर्त हुकुन गेला असला तरी याही पलीकडे जावून या ठिकाणी आज सकाळी ११.४५ वाजेच्या सुमारास एका कोपरगाव येथील रहिवासी असलेली महिला रुक्साणा बागवान यांचा बळी गेला आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यासह नगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

कोपरगाव येथील मयत महिला रुकसाणा बागवान याचे छायाचित्र.

   नगर मनमाड मार्गाची वाहन कोंडी या नित्यप्रकार झाला आहे.याबाबत कोणालाही काही घेणे देणे असल्याचे दिसून येत नाही.राजकीय नेते केवळ मतांचे भुकेले असल्याचे वारंवार दिसून आले आहे.त्यामुळे हा मार्ग मार्गी लावण्याचे नाव घेताना दिसून येत नाही.परिणामी या मार्गावर बळी जाणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे.आज लग्न मुहूर्त असल्याने या कोपरगाव नजिक असलेल्या पुणतांबा चौकात मोठी गर्दी झाली असल्याचे दिसून आले आहे.तेथे एक अर्धवट पुल संबधित ठेकेदार यांनी बांधून ठेवला असल्याने सदर चौकात जाण्यासाठी मोठा चक्कर मारून अवजड वाहन चालकांना जावे लागत आहे.परिणामी वाहनांची गर्दी होताना दिसत आहे.त्यातच लग्न तिथी असल्यावर ही गर्दी उच्चांकी होते.परिणामी अपघातांची संख्या वाढत चालली आहे.मात्र याबाबत देशाचे परिवहन व रस्ते विकास मंत्री यांनी आपण हा रस्ता करू शकलो नाही याचे थेट शल्य बोलून दाखवले आहे.मागील वेळी त्यांनी येथील नेते ठेकेदार यांचेकडून निर्लज्जपणें मोठे कमिशन मागतात त्यांनी आधीच कमी दराने निविदा भरलेल्या असताना त्यांना काम परवडत नसल्याने ते पळून जात असल्याचे बोलून दाखवले आहे असे तीन ठेकेदार पळून गेले आहे.

   याबाबत शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी लोकसभेत हा प्रश्न उपस्थित करून गडकरी याचे लक्ष वेधून घेतले होते.त्यांनी त्याबाबत अडीच हजार कोटी रुपयांची संसदेत घोषणा केली आहे.मात्र काम सुरू असताना पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबधित कंपनीची असताना याबाबत राजकीय प्रतिनिधी चकार शब्द काढताना दिसत नाही.परिणामी रस्त्यावरील खड्डे बुजवले जात नाही.परिणामी रस्ते अपघातात लक्षणीय वाढ होत आहे.याच बाबत आज दाहक अनुभव आला आहे.यातील मयत महिला आणि तिचा पती हे मुंबई येथे जाण्यासाठी निघाले असताना त्यांना एक देऊळगाव राजा तालुका व जिल्हा हिंगोली येथील कंटेनर चालक मनोज विजय दिपके याने जोराची धडक मारली आहे.त्यात सदर महिलेचा बळी गेला आहे.याबाबत संबधित ठेकेदार व अधिकारी यांचेवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी नागरिकांनी केली हे.

   दरम्यान या प्रकरणी मयत महिलेचा कांदा व्यापार करणारा नातेवाईक गणी हासन बागवान (वय – रा.दत्तनगर कोपरगाव) यांनी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रं.३६४/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३चे कलम  १०६(१),२८१,१२५(अ),(ब) मोटार वाहन अधिनीयम १८४ प्रमाणे आरोपी विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.घटना स्थळी पोलिस निरीक्षक भगवान मथुरे,पोलिस उपनिरीक्षक भूषण हांडोरे आदींनी भेट दिली आहे.पुढील तपास पोलीस हे. कॉ.के.ए.जाधव हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close