जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवड

शिवसेना पदाधिकारी निवड जाहीर,…यांना मिळाली संधी !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा गटाने नुकतीच कोपरगाव तालुका शिवसेनेचे पदाधिकारी निवड जाहीर केली असून यात जिल्हा समन्वयक म्हणून कलविंदर दडियाल यांची तर कोपरगाव विधानसभा अध्यक्षपदी किरण खर्डे यांची तर पश्चिम अध्यक्षपदी गंगाधर रहाणे यांची तर पूर्व भागाच्या अध्यक्षपदी संजय दंडवते यांची निवड जाहीर केल्याने आता आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत रंग भरणार असल्याचे दिसून येऊ लागले आहे.

किरण खर्डे          .  संजय दंडवते           गंगाधर रहाणे

दरम्यान गंगाधर रहाणे यांनी ५५ वर्षे प्रलंबित असलेल्या व उत्तर नगर जिल्ह्यातील राजकारण्यांनी चेष्टेचा विषय बनवलेल्या निळवंडे धरण कालव्यांच्या आंदोलनात निळवंडे कालवा कृती समितीत सक्रिय कार्यरत राहून निळवंडे धरणाचे कालवे पूर्ण करण्यात तसेच सन -२००६ साली कुक्कुट पालन संघटनेचे राज्यव्यापी आंदोलन करून त्यांना न्याय मिळवून देण्यात व नैऋतेकडिल दुष्काळी गावांना सोयी सुविधा पुरविण्यात करण्यात मोठी भूमिका निभावली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार आठवड्यात जाहीर करून ती प्रक्रिया चार महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोग व राज्य सरकारला नुकतेच दिले आहेत.या आदेशाची अंमलबजावणी मुदतीत होईल की अधिक कालावधी लागणार,आदी बाबी लवकरच स्पष्ट होणार असल्या तरी राजकीय पक्षांनी मात्र कात टाकली असल्याचे दिसून येत आहे. त्यांनी आपल्या बैठकांचा जोर वाढवला असून आपल्या अनेक वर्षापासून स्थगित पदाधिकारी निवडी मात्र जाहीर केल्या आहेत.त्याला उबाठा शिवसेनाही अपवाद नाही त्यांनी आपल्या कोपरगाव विधानसभा मतदार संघ आणि तालुका अध्यसक्षांच्या निवडी नुकत्याच आपल्या मुखपत्र सामना मधून प्रसिद्ध केल्या आहेत.त्यात या निवडी जाहीर झाल्या आहेत.त्यात या तिघांची वर्णी लागली आहे.त्यांचे सर्वत्र स्वागत होत आहे.

नूतन जिल्हा समन्वयक कलविंदर दडियाल.

   दरम्यान यात कोपरगाव विधानसभा सहसंघटक म्हणून अशोक कानडे यांचा नंबर लागला आहे तर सह समन्वयक म्हणून राजू शेख यांची वर्णी लागली आहे.या सर्वाचा निवडीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

  दरम्यान गंगाधर रहाणे यांनी ५५ वर्षे प्रलंबित असलेल्या व उत्तर नगर जिल्ह्यातील राजकारण्यांनी चेष्टेचा विषय बनवलेल्या निळवंडे धरण कालव्यांच्या आंदोलनात निळवंडे कालवा कृती समितीत सक्रिय कार्यरत राहून निळवंडे धरणाचे कालवे पूर्ण करण्यात तसेच सन -२००६ साली कुक्कुट पालन संघटनेचे राज्यव्यापी आंदोलन करून त्यांना न्याय मिळवून देण्यात व नैऋतेकडिल दुष्काळी गावांना सोयी सुविधा पुरविण्यात करण्यात मोठी भूमिका निभावली आहे.ते सेनेचे निष्ठावान सैनिक म्हणून परिचित असून त्यांनी बहादरपुर ग्रामपंचायतीचे माजी उपरपंच म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे.त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.
तर कलविंदर दडियाल यांनी यापूर्वी सेनेचे कोपरगाव शहर प्रमुख म्हणून आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे.तर संजय दंडवते हेही शिवसेना उबाठा गटाचे निष्ठावान सैनिक म्हणून परिचित आहेत.

   दरम्यान त्यांच्या निवडीचे शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खा.भाऊसाहेब वाकचौरे,तालुका संपर्क नेते आ.सुहास शिंदे,कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष राजेंद्र झावरे,सेनेचे शेतकरी संघटनेचे जिल्हा प्रमख सुहास वहाडणे,माजी उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव आदींनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close