शैक्षणिक
पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर…या शाळेचा ९२.८५ टक्के निकाल

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी )
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेली पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यात कोपरगाव तालुक्यातील जवळके येथील जिल्हा परिषद शाळेचा निकाल जाहीर झाला असून यात २८ पैकी २६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण निकाल ९२.८५ टक्के लागला असल्याची माहिती मुख्याध्यापक दत्तात्रय मैड यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

दरम्यान यशस्वी विद्यार्थ्याना मुख्याध्यापक दत्तात्रय मैड,वर्गशिक्षक रवींद्र गोसावी,निवृत्ती बढे,जानका देवकर,सुरेखा उगले,कोमल बागुल आदी शिक्षकांचे मार्गदर्शन केले होते.त्यांनी विशेष परिश्रम घेतले होते.त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेली पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा-२०२५,ही दि.०९ फेब्रुवारी रोजी घेण्यात आली होती,तिचा अंतरिम निकाल नुकताच जाहीर झाला आहे.विद्यार्थी त्यांचे स्कोअरकार्ड (mscepune.in) वरून डाउनलोड करण्यात आले असून या परीक्षेसाठी राज्यभरातून ०५ लाख ४६ हजार ८७४ विद्यार्थी सहभागी झाले होते.त्यात कोपरगाव तालुक्यातील जवळके येथील जिल्हा परिषद शाळेचे २८ पैकी २६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण निकाल ९२.८५ टक्के लागला असल्याची माहिती मुख्याध्यापक दत्तात्रय मैड यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
सदर परीक्षेत विद्यार्थ्याचे नाव व पुढे ३०० पैकी मिळालेले गुण दर्शवले आहे.थोरात कांचन कानिफनाथ-२५०,दरेकर आयुष गणेश-२४८,थोरात अमिता जालिंदर -२४०,थोरात ईश्वरी वैभव-२३२,वाकचौरे अविनाश मच्छिंद्र-२३०,दरेकर जय देविदास-२२८,थोरात शुभम भाऊसाहेब-२२६,थोरात कृष्णा राजेंद्र-२२४ आदींचा समावेश आहे.यात २४२-२६० श्रेणीत गुण मिळालेले विद्यार्थी दोन असून त्यात थोरात कांचन कानिफनाथ,दरेकर आयुष गणेश या दोघांचा समावेश आहे.
दरम्यान यशस्वी विद्यार्थ्यांचे शेतकरी संघटनेचे प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नानासाहेब जवरे,जलसंपदा विभागाचे माजी उपभियंता एस.के.थोरात,माजी सरपंच वसंत थोरात,बाळासाहेब थोरात,दत्तात्रय थोरात,जवळके ग्रामपंचायतीच्या सरपंच सारिका विजय थोरात,उपसरपंच सुनील थोरात,सदस्य भाऊसाहेब थोरात,इंदुबाई नवनाथ शिंदे,वनिता रखमा थोरात,मीना विठ्ठल थोरात,रोहिणी गोरक्षनाथ वाकचौरे,सोमनाथ थोरात,माजी उपसरपंच डी.के.थोरात,विजय थोरात,गोरक्षनाथ थोरात,विश्वनाथ थोरात,नवनाथ थोरात,गोरक्षनाथ शिंदे,उत्तमराव थोरात,अशोक शिंदे,चंद्रकांत थोरात,रामनाथ थोरात,अरुण थोरात,गणेश थोरात आदींनी केले आहे.