ऊर्जा विभाग
…या तालुक्यात नवीन विद्युत रोहित्रांना मंजुरी !

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव मतदार संघाच्या विविध गावातील शेतकऱ्यांनी केलेल्या वीज रोहीत्रांच्या मागणीनुसार उर्जा विभागाकडे केलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव मतदार संघाची वीज रोहीत्रांची मागणी पूर्ण करण्यात यश मिळाले असून स्थानिक विकास निधी अंतर्गत २.६८ कोटीच्या नवीन वीज रोहीत्रांना तसेच वीज वाहिन्या स्थलांतरीत करणे व नवीन पोल टाकण्याच्या कामाला मंजुरी मिळाली असल्याची माहीती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.त्यामुळे वीज रोहीत्रांच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळनार आहे.

नुकताच महावितरण विभागाचा आ.आशुतोष काळे यांनी जनता दरबार घेतला होता.त्यात संबधित अधिकाऱ्यांवर आरोप होऊन मोठा गदारोळ उडाला होता.या सर्व बाबींचा विपरीत परिणाम रब्बी पिकांच्या उत्पादनावर होत असतो.या पार्श्वभूमीवर आ.काळे यांनी विद्युत रोहित्र मंजूर करण्याची पाठ पुरावा सुरू केला होता.त्या पार्श्वभूमीवर तालुक्यात अनेक ठिकाणी विद्युत रोहीत्रे मंजूर झाली आहे.त्याबाबत शेतकऱ्यांत समाधान व्यक्त होत आहे.
कोपरगाव तालुक्यात रब्बी हंगामात वीज कमी दाबाने मिळून शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसत असतो.त्यातच अनेक ठिकाणी विद्युत रोहित्र जळत असल्याने त्या संकटात मोठी भर पडत असते.त्यातच अधिकारी आपले हात ओले केल्याशिवाय रोहित्रे देत नसल्याने शेतकरी संतप्त होत असताना नुकताच महावितरण विभागाचा आ.आशुतोष काळे यांनी जनता दरबार घेतला होता.त्यात संबधित अधिकाऱ्यांवर आरोप होऊन मोठा गदारोळ उडाला होता.या सर्व बाबींचा विपरीत परिणाम रब्बी पिकांच्या उत्पादनावर होत असतो.या पार्श्वभूमीवर आ.काळे यांनी विद्युत रोहित्र मंजूर करण्याची पाठ पुरावा सुरू केला होता.त्या पार्श्वभूमीवर तालुक्यात अनेक ठिकाणी विद्युत रोहीत्रे मंजूर झाली असल्याची माहिती त्यांच्या प्रसिध्दी कार्यालयाने दिली आहे.
त्यात चास नळी येथील जुना गावठाण डी.पी.पोहेगाव येथील पाटील मळा डी.पी,बक्तरपूर येथील गावठाण उगले डी.पी.मौजे भोजडे येथील मंचरे डी.पी.मढी बु.येथील खळगा डी.पी.मुर्शतपूर येथील म्हसोबा नगर एच.टी.व एल.टी.वीज वाहिनी स्थलांतरीत करणे,वारी येथील रामेश्वर विद्यालय येथील डी.पी.स्थलांतरीत करणे,कडू कानडे वस्ती येथे पाच ते सहा नवीन पोल टाकणे तसेच वारी येथील सोमय्या डी.पी.सोनेवाडी येथील लांडबले डी.पी.टाकळी येथील आव्हाड डी.पी.देर्डे चांदवड येथील प्रितम मेहेत्रे डी.पी.,धोत्रे येथील डी.पी.वेळापूर येथील बिरोबा डी.पी.तसेच मंडलिक डी.पी.,करंजी येथील माऊलाई येथील डी.पी.,कासली येथील भंडारी डी.पी.,कोकमठाण कारवाडी येथील रोहोम डी.पी.,खिर्डी गणेश येथील वसंत लोखंडे डी.पी.,चांदगव्हाण येथे सानप डी.पी.,धामोरी येथील गलांडे डी.पी.,मायगाव देवी येथील गावठाण डी.पी.,माहेगाव देशमुख येथील काळे डी.पी.तसेच चिकू बाग डी.पी.,संवत्सर येथील गायकवाड डी.पी.तसेच रामवाडी-भीमवाडी येथे चार ते पाच पोल टाकणे व दशरथवाडी येथील डी.पी.सडे येथील देठे डी.पी.,हिंगणी येथील म्हसोबा मंदिर डी.पी.,अंचलगाव येथे एनडाइत शेख वस्ती डी.पी.,धामोरी येथील कुऱ्हाडे डी.पी.,शहाजापूर येथील शिंदे डी.पी.,येसगाव येथील बशीरभाई नाटेगाव रोड डी.पी.आदींचा समावेश आहे.
या शिवाय कोपरगाव मतदार संघातील राहाता तालुक्यातील पुणतांबा येथील कवठे डी.पी.,नपावाडी येथील निर्मळ डी.पी.,जळगाव येथील लोहोकरे डी.पी.,चितळी येथील दीपक वाघ डी.पी.सह ५ पोल टाकणे,धनगरवाडी येथील सरपंच डी.पी.सह ५ पोल टाकणे, रामपूरवाडी येथील थोरात डी.पी.सह ४ पोल टाकणे तसेच गमे डीपीसह ७ पोल नवीन टाकणे आदी ठिकाणी नवीन डी.पी. बसविण्यात येणार आहे.
कोपरगाव मतदार संघातील अन्य कामात नवीन सबस्टेशनची निर्मिती तसेच सबस्टेशनची क्षमतावाढ हे प्रश्न सुटले असल्याचा दावा केला आहे.कोपरगाव मतदार संघातील चासनळी,सुरेगाव,पोहेगाव हे सबस्टेशन शहा येथील १३२ के.व्ही.उपकेंद्राला जोडली जाणार आहेत.त्यामुळे कोपरगाव सबस्टेशनवर येणारा भार कमी होणार आहे तसेच आ. काळे यांनी मतदार संघातील दहा गावांसाठी नुकतीच सौर उर्जा सबस्टेशनला मंजुरी मिळविली आहे व २.६८ कोटी निधीतून उभारले जाणारे नवीन वीज रोहित्र व विविध कामे त्यामुळे येत्या काळात कोपरगाव मतदार संघातील विजेच्या समस्या संपुष्टात येण्यास मदत होणार असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.