निवड
रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्य पदी…यांची निवड

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
रयत शिक्षण संस्था,सातारा यांचे मॅनेजिंग कौन्सिलच्या नुकत्याच संपन्न झालेल्या बैठकीमध्ये सुरेश विठ्ठलराव बोळीज यांची सेवानिवृत्त आजीव सभासादांमधून जनरल बॉडी सदस्यपदी निवड करणेत आली आहे.त्यांच्या या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.

सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक श्री सुरेश बोळीज यांच्या शिक्षण क्षेत्रातील दीर्घ अनुभवाचा आणि योगदानाचा हा संस्थेने केलेला सन्मान केला असल्याचे मानले जात आहे.
कर्मवीर भाऊराव पाटील उर्फ अण्णांनी बहुजनांसाठी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेचा शाळा,माध्यमिक विद्यालये,महाविद्यालय इत्यादी माध्यमातून प्रचंड मोठा शाखा विस्तार आहे.सुरेश बोळीज यांच्या शिक्षण क्षेत्रातील दीर्घ अनुभवाचा आणि योगदानाचा हा संस्थेने केलेला सन्मान केला असल्याचे मानले जात आहे.
त्यांच्या निवडीबद्दल रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य तथा संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे,सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे,अमृत संजीवनीचे अध्यक्ष परागजी संधान,रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ता ॲड.संदीप वर्पे तसेच कोपरगाव तालुक्यातील आजी माजी रयत सेवकांनी,रयत सेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी,विशेषतः विविध सामाजिक,राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर नागरिकांनी त्यांचे निवडीबद्दल अभिनंदन केले आहे.