धार्मिक
…या गावात नवनाथ कथासार पारायण सोहळा

न्युजसेवा
सिन्नर: (प्रतिनिधी )
चैतन्य कानिफनाथ महाराज यांच्या यात्रोत्सवानिमित्त पंचाळे याठिकाणी सलग तिसऱ्या वर्षी श्री नवनाथ कथासार सामुदायिक पारायण सोहळ्याची सुरवात झाली आहे. पंचाळे तसेच पंचक्रोशीतील गावांमधील सुमारे ३०० नाथ भक्तांनी या सोहळ्यात सहभाग घेतला आहे.

श्री क्षेत्र पंचाळे येथे सलग ९ दिवस चालणाऱ्या या पारायण सोहळ्याच्या सांगता समारंभ दिवशी ५१ पवित्र नद्यांच्या पाण्याने कानिफनाथ महाराज यांना अभिषेक आणि महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे.
होळी ते रंगपंचमी असा सलग सहा दिवसांचा यात्रोत्सव पंचाळे याठिकाणी भरत असतो.६ दिवस लोकनाट्य तमाशा,होळी,धुलीवंदन,वीर मिरवणूक,काठी मिरवणूक, गोपाळकाला,रंगोत्सव,शोभेच्या दारूची आतिषबाजी,टांगे, कुस्त्या अशा अनेक कार्यक्रमांच्या सहभागाने पंचाळे यात्रा मोठ्या उत्साहात पार पडते.

मागील ३ वर्षांपासून सामुदायिक पारायण सोहळ्याची नवीन परंपरा यात्रेनिमित्त सुरू झाली आहे,त्यामुळे पंचक्रोशीतील नाथ भक्तांमध्ये भक्तिभावाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे.सलग ९ दिवस चालणाऱ्या या पारायण सोहळ्याच्या सांगता समारंभ दिवशी ५१ पवित्र नद्यांच्या पाण्याने कानिफनाथ महाराज यांना अभिषेक आणि महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे.