जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
अपघात

अपघातात एक ठार,एक महिला एक पुरुष जखमी !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

    मुंबई-नागपूर महामार्गावरील एस.जे.एस.हॉस्पिटलजवळ आज सकाळी ११ वाजता भीषण अपघात झाला असून यात भरधाव असलेली महिंद्रा स्कॉर्पिओ (एम.एच.१२ एन.झेड.००५७ ) ही मुंबईकडून नागपूरच्या दिशेने जात असताना तिच्यावर चालकाचे असलेले नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात सदर वाहन साई जनार्दन हॉटेलजवळील गोदावरी स्टॉलमध्ये घुसली आहे.या दुर्घटनेत सुनंदा साबळे नावची एक महिला (वय -५६)मृत तर एक जण ह.भ.प.सुदाम काशिनाथ साबळे व त्यांची भावजय अलका वसंत साबळे हे दोन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.

छायाचित्रात दुर्घटनाग्रस्त स्कॉर्पिओ दिसत आहे.

  

दरम्यान मयत सुनंदा साबळे व सुदाम साबळे हे एकच घरातील असून कार्यकर्ते मधुकर साबळे यांचे भाऊ आणि भावजय असल्याची माहिती आमचे प्रतिनिधी शिवाजी गायकवाड यांनी दिली आहे.हे कुटुंब शिर्डी येथील साईबाबा रुग्णालयात आपल्या नातवाला भेटण्यासाठी जात असताना ही दुर्घटना घडली आहे.

   समृध्दी महामार्ग पूर्ण झाल्याने त्यामार्गावर अवजड वाहनांची गर्दी वाढली आहे.तर त्या त्यापाठोपाठ जुना मुंबई-नागपूर राज्य  मार्गाचे काम पूर्ण झाल्याने व त्यावर अवजड वाहनांची वर्दळ कमी झाल्याने या मार्गावरील छोट्या वाहानांची वर्दळ वाढली असली तरी ती फार या संज्ञेत मोडत नाही परिणामी या मार्गावर छोटी वाहने भरधाव वेगाने धावत असतात.त्यामुळे अपघातांची संख्या वाढली आहे.अशीच घटना आज सकाळी कोपरगाव बेट भागात घडली आहे.यातील वरील क्रमांकांची पांढऱ्या रंगाची महिंद्रा स्कॉर्पिओ ही गाडी सकाळी ११ वाजेच्या सुमारास नागपूरच्या दिशेने भरधाव वेगाने जात असताना एका क्षणी त्यावरील चालकाचे तिच्यावरील नियंत्रण सुटले असुंत सदर गाडी थेट रस्त्यालगत असलेल्या साई जनार्दन हॉटेल जवळ असलेल्या एका टपरीत घुसली आहे.त्यावेळी त्या टपरित असेलल्या टपरी चालक आकाश विलास गोंदकर याने सावधानता दाखवत तात्काळ दुकानातून उडी मारून आपला जीव वाचवला आहे.त्याची अवस्था काळ आला होता पण वेळ आली नव्हती अशी होऊन त्याचा जीव वाचला आहे.मात्र या अपघातात एक महिला सुनंदा साबळे या संवत्सर येथील महिला उपचारा दरम्यान मयत झाली असल्याची माहिती हाती आली आहे.त्यावेळी तिचा फिर्यादी मुलगा हा कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करताना ही खबर त्याला मिळाल्याने त्याला सदर फिर्याद सोडून आई कडे धाव घ्यावी लागली असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.

अपघातात दुचाकीची झालेली दुरावस्था दिसत आहे.

 

दरम्यान या अपघाताची संपूर्ण दृश्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून,फुटेजमध्ये गाडीचा वेग खूप जास्त असल्याचे स्पष्ट दिसत आहे.अचानक गाडी स्टॉलमध्ये घुसल्याने मोठा आवाज आणि गोंधळ उडाला.त्यावेळी अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली होती.प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार सदर चालक हा मद्यधुंद अवस्थेत होता त्यातून त्याचे नियंत्रण सुटले असल्याचे म्हटले आहे.दरम्यान मयत सुनंदा साबळे व सुदाम साबळे हे एकच घरातील असून कार्यकर्ते मधुकर साबळे यांचे भाऊ आणि भावजय असल्याची माहिती आमचे प्रतिनिधी शिवाजी गायकवाड यांनी दिली आहे.हे कुटुंब शिर्डी येथील साईबाबा रुग्णालयात आपल्या नातवाला भेटण्यासाठी जात असताना ही दुर्घटना घडली आहे.त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

मयत महिला सुनंदा साबळे यांचे छायाचित्र.

    दरम्यान या अपघातामुळे स्टॉल मालक आकाश विलास गोंदकर यांचे किमान तीन ते चार लाख रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असल्याचा दावा केला आहे.त्याने आपल्या नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.मयतांवर आज रात्री ०८ वाजता अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

   दरम्यान अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य हाती घेतले होते.जखमींना नजीकच्या जनार्दन स्वामी रुग्णालयात उपचारार्थ भरती केले आहे.दरम्यान यातील एक महिला उपचार सुरू असताना मयत झाली असल्याची माहिती हाती आली आहे.कोपरगाव शहर पोलिसांनी वाहनचालकाला ताब्यात घेतले असून,पुढील चौकशी सुरू आहे.या प्रकरणाचा अधिकचा सखोल तपास कोपरगाव शहर पोलीस हे करत आहेत.मात्र गुन्हा अद्याप दाखल झालेला नाही.

बातमी अद्यावत होत आहे…..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close