कोपरगाव शहर वृत्त
अतिक्रमणाच्या वादळात पुन्हा जनता दरबार ?

न्युजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव तहसीलमध्ये पुन्हा जनता दरबार ?
कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या महावितरण,राज्य परिवहन महामंडळ,रेल्वे विभाग व पोलीस प्रशासन आदी विभागा संदर्भात नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी शुक्रवार दि.२८ फेब्रुवारी रोजी दुपारी ०२ वाजता तहसील कार्यालय,कोपरगाव येथे आ.आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आ.काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून नागरिकांना देण्यात आली आहे.मात्र हा ‘जनता दरबार’ हा ‘गोंधळी दरबार’ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

या अतिक्रमण मोहिमेत अनेक राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचा (नगरपरिषद हद्दीत टपऱ्या ठेवून देऊन त्यातून हप्ते गोळा करण्याचा) फुकटचा रोजगार बुडाला आहे.त्यामुळे त्यांची कळकळ शहरातील जनतेचे समजून घेणे गरजेचे बनले आहे.मात्र श्रहरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतल्याने शहरातील अपघात आणि गुन्हेगारी नक्कीच कमी होणार आहे.
कोपरगाव शहरात मोठ्या फौजफाट्यासह नगरपालिका,महसूल प्रशासन व पोलिस पथकाने अतिक्रम हटाव मोहिमेला तब्बल चौदा वर्षांनी सुरुवात करण्यात आली होती.अनधिकृत बांधकामावर बुलडोजर लावून पत्राशेड बांधकाम काढून टाकण्याची कारवाईची सुरुवात गत शुक्रवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास केली होती ती अद्याप सुरूच आहे.त्यामुळे अनेक अतिक्रमण धारक धास्तावून गेले आहे.यात आतापर्यंत ७३५ व्यापारी आस्थापाने व घरे हटवली असून अद्याप उपनगरे बाकी आहेत.ही मोहीम एक वर्षापूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या दिलेल्या आदेशाने सुरू असल्याची व यापुढेही सुरूच राहणार असल्याची माहिती कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी दिली आहे.आता अद्याप दृष्टिपथात नगरपरिषदेसह कोणतीही निवडणूक नसल्याने यात राजकीय हस्तक्षेप होताना दिसत नाही.एरव्ही कळवळ्याच्या जाती कोपरगाव शहर आणि तालुक्यात काही कमी निर्माण होताना दिसत नाही.त्यांनी आता केवळ एखाद दुसरी बातमी देऊन आपला कळवळा (!) दाखवून दिला आहे.

चौदा वर्षापूर्वी कोपरगावात सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी केलेल्या पाठपुराव्याने दि.१० मार्च २०११ रोजी अतिक्रमण मोहीम सुरू झाली होती.त्यात जवळपास दोन हजारांहून अधिक अतिक्रमणे जमिनध्वस्त केली होती.त्यानंतर आलेल्या अनेक निवडणुकांत त्यांचे पुनर्वसन करण्याचे आश्वासन देऊन त्यांची बोळवण केली होती.पण विद्यमान आ.आशुतोष काळे यांनी पाठपुरावा करून कोपरगाव येथील राज्य परिवहन मंडळाच्या जागेत सुरू असलेले व्यापारी संकुल वगळता ते दिवास्वप्नच ठरले आहे.
दरम्यान एक मात्र खरे आहे की,बैल बाजार रोड,साईबाबा कॉर्नर,खडकी रोड कॉर्नर आदी ठिकाणासह अनेक उपनगरे आदीतील रस्ते आता मोकळा श्वास घेणार आहे.त्यामुळे रस्त्यावरील गुन्हेगारी आणि अपघात कमी होणार असल्याने नगरपालिकेचे अनेकांनी स्वागत केले आहे.मात्र यात अनेक राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचा (नगरपरिषद हद्दीत टपऱ्या ठेवून देऊन त्यातून हप्ते गोळा करण्याचा) फुकटचा रोजगार बुडाला आहे.त्यामुळे त्यांची कळकळ शहरातील जनतेचे समजून घेणे गरजेचे बनले आहे.मात्र पालिकेने निदान अग्रिम सूचना देऊन नागरिकांना आपले सामान काढण्याची संधी द्यायला हवी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे आणि ती वावगी नाही.त्यामुळे या पार्श्वभूमीवर हा जनता दरबार संपन्न होत असल्याचे वादळी होणार अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.मात्र महावितरण,महसूल आणि पोलिस कारभारात सुधारणा होणे अद्याप गरजेचे आहे.शेतकऱ्यांना दिवसा वीज हे दिवास्वप्न ठरताना दिसत आहे.जनता दरबाराचा अद्याप त्यांच्या बेताल कारभारावर कोणताही परिणाम होताना दिसत नाही हे विशेष ! मात्र सत्ताधारी आपला ऊरबडवे कमी करताना दिसत नाही हे एक आक्रित होताना दिसत आहे.या पार्श्वभूमीवर हा जनता दरबार गोंधळी दरबार व्हायला नको इतकेच या निमित्ताने.
चौदा वर्षापूर्वी कोपरगाव शहरात सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी नाशिक आयुक्तांकडे केलेल्या पाठपुराव्याने दि.१० मार्च २०११ रोजी अतिक्रमण मोहीम सुरू झाली होती.त्यावेळी जवळपास दोन हजारांहून अधिक अतिक्रमणे जमिनध्वस्त केली होती.त्यानंतर आलेल्या अनेक निवडणुकांत त्यांचे पुनर्वसन करण्याचे आश्वासन देऊन त्यांची बोळवण केली होती.पण विद्यमान आ.आशुतोष काळे यांनी पाठपुरावा करून कोपरगाव येथील राज्य परिवहन मंडळाच्या जागेत सुरू असलेले व्यापारी संकुल वगळता ते दिवास्वप्नच ठरले आहे.त्यामुळे काहींना आपल्या जन्मभूमि पासून परागंदा व्हावे लागले असल्याची अनेक उदाहरणे आहेत.’ती’.. जखम पुन्हा एकदा भळभळती झाली आहे.