शैक्षणिक
कोपरगाव येथील…या महाविद्यालयात कार्यशाळा संपन्न

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील स्थानिक के.जे.सोमैया महाविद्यालय येथे वाणिज्य विभाग व सी.डी.एस.एल.व सेबी या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने बेसिक्स ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड डिपॉझिटरी सर्विसेस या विषयावर एक दिवसीय ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले होते.

अश्विनी थोरात-खेडकर यांनी से.बी.व सी.डी.एस.एल.संस्थेची कार्यप्रणाली समजावून सांगतानाच भाग बाजारात गुंतवणूक करतांना अभ्यासपूर्ण पद्धतीने गुंतवणूक करावी असे आवाहन केले आहे.
या कार्यशाळेसाठी मार्गदर्शक म्हणून सी.डी.एस.एल.संस्थेच्या व्यवसाय विस्तार व्यवस्थापक अश्विनी थोरात-खेडकर यांना आमंत्रित करण्यात आले होते.यावेळी से.बी.च्या अवेअरनेस कार्यक्रमाचे मार्गदर्शक डॉ.रवी आहुजा हेही उपस्थित होते.

सदर कार्यशाळेच्या प्रास्ताविकेत वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.संतोष पगारे यांनी मान्यवरांचे स्वागत करतांनाच या कार्यशाळेचा उद्देश नमूद केला आहे.तर सेबीचे इन्वेस्टर अवेअरनेस प्रोग्राम हे वाणिज्य च्या विद्यार्थ्यांना स्टॉक मार्केटमध्ये सुशिक्षित करण्याचा प्लॅटफॉर्म असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले आहे.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना अश्विनी थोरात-खेडकर यांनी से.बी.व सी.डी.एस.एल.संस्थेची कार्यप्रणाली समजावून सांगतानाच भाग बाजारात गुंतवणूक करतांना अभ्यासपूर्ण पद्धतीने गुंतवणूक करावी असे आवाहन केले आहे.भाग बाजार हा सट्टा नसुन या बाजारात गुंतवणूक करताना घ्यावयाची काळजी,विविध पोर्टल यावर मार्गदर्शन त्यांनी केले आहे.
याप्रसंगी विद्यार्थ्यांच्या वतीने कु.मेघा सोनवणे हीने विचारलेल्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तरे त्यांनी दिली आहे.
सदर कार्यशाळेचे समन्वयक डॉ.रवींद्र जाधव यांनी सूत्रसंचालन तर आभार प्रदर्शन प्रा.संजय अरगडे यांनी केले आहे.कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रा.विजय सोमासे,प्रा.अजित धनवटे,प्रा.सोनाली आव्हाड,प्रा.सुनील गुंजाळ,प्रा.स्वागत रणधीर आदींनी प्रयत्न केले आहे.