धार्मिक
ध्यान म्हणजे आत्म्यावर प्रेम करणे होय- …या महाराजांचे प्रतिपादन
न्युजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
मानवाला ८४ लक्ष योनीतून मनुष्य जन्म प्राप्त होतो त्याला संपत्ती,प्रतिष्ठा आपल्याला आनंद देतात परंतु तो आनंद क्षणिक असतो.त्यापासून मिळणारा आनंद हा केवळ एक दिखावा असतो.आपल्याला जर शाश्वत आनंद मिळवायचा असेल तर तो ध्यानातूनच शक्य असल्याचे प्रतिपादन जंगली महाराज आश्रमाचे कार्याध्यक्ष परमानंद महाराज यांनी नुकतेच कोकमठाण येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
जागतिक ध्यान दिवस दरवर्षी जागरुकता वाढवण्यासाठी आणि दैनंदिन ध्यानाच्या महत्त्वावर जोर देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.व्यस्त जीवनशैली आणि धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला शांतता हवी असते.अशा स्थितीत ध्यान केल्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो.आजचे आपले आयुष्य शाश्वत नाही कारण ते बाह्य जगाच्या अधीन आहे.आपण जर ध्यानाने आपल्या आत्म्याला जाणवून घेण्याचा प्रयत्न केला तर,आपण ही संतांसारखे विमुक्त होऊ अस्तित्व म्हणजे आपले शरीर नाही तर आत्मा आहे. आपल्या सर्व क्रिया ह्या आत्म्यामुळेच ठरतात.त्यासाठी हा दिवस साजरा केला जातो कोपरगाव तालुक्यातील कोकम ठाण येथे जंगली महाराज येथे तो मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.त्यावेळी ते बोलत होते.
त्यावेळी पुढे बोलताना म्हणाले की,’आत्मा हा जिवंतपणाचा झरा आहे.जर आत्मा नसेल तर शरीरात जीवंतपणा राहत नाही.म्हणून ध्यानाद्वारे आत्मा जाणून घेणे गरजेचे आहे. आपल्या मानवी जन्माचे खरे स्वरुप हे बाहेरुन दिसणारे शरीर नसून त्या शरीराच्या आत नांदणारा आत्मा हा आहे.आत्म्याच्या अस्तित्वामुळेच आपल्या देहातील सर्व क्रिया सुरुळीत चालतात.निराकार आत्म्याने अनेक देवीदेवतांच्या रुपात अवतार धारण केलेला आहे.देवळांमध्ये या सर्व देवी-देवतांच्या मुर्त्या आहेत.परंतू खरा देव म्हणजेच आत्मा हा देहरुपी मंदीरात निवास करतो.आत्म्याची अनुभूती व ज्ञान प्राप्त करण्यासाठी नियमित ध्यान करणे गरजेचे आहे.तुम्ही कोणत्याही मंदीर,चर्च,मस्जिद,गुरुद्वारा अथवा प्रार्थना गृहात गेल्यानंतर तेथे डोळे बंद करुन शांत बसा व देवाला (आत्म्याला) हृदयात पाहण्याचा प्रयत्न करा यालाच ध्यान असे म्हणतात.
जगातील वेगवेगळे देश,वेगवेगळे धर्म,जाती,पंथ यात जन्म घेणाऱ्या सर्व व्यक्तींच्या हृदयात एक आत्माच निवास करतो.आत्मा विश्वाचा निर्माता,संचालक,चालक,मालक आहे. म्हणून प.पू.गुरुदेवांनी विश्वात्मक संदेश दिलेला आहे.तो म्हणजे ‘सबका मालिक आत्मा’ परंतू या संदेशाच्या अनुभूतीसाठी सद्गुरुंच्या चरणी आपला भाव समर्पित करुन श्रध्दा ठेवणे गरजेचे आहे.नररुपी जीवन नारायण स्वरुप बनविण्यासाठी सद्गुरूंचे मार्गदर्शन गरजेचे असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले आहे.