जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

…या रुग्णालयात होणार मोफत उपचार!

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी )

आज गुरुवार दि.१२ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ११.०० वा. श्री साईबाबा संस्‍थानचे श्री साईनाथ रुग्‍णालय येथे महात्‍मा ज्‍योतीराव फुले जन आरोगय  योजना व आयुष्‍मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्‍य योजनेतुन उपचाराची सुरुवात करणेत आली. सदर कार्यक्रमाचा शुभारंभ श्री साईबाबा संस्‍थानचे प्र. मुख्‍य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांच्‍या हस्‍ते रुग्‍णांची नोंदणी करुन करण्यात आला. श्री साईनाथ रुग्‍णालयात सर्व उपचार मोफत होतात. त्‍याच धर्तीवर शासनाने सुरु केलेल्‍या महात्‍मा ज्‍योतीराव फुले जन आरोग्‍य योजनेच्‍या माध्‍यमातुन पात्र रुग्‍णांवर मोफत उपचार दिले जाणार आहे.

श्री साईबाबा हॉस्पिटल हे महात्‍मा ज्‍योतीराव फुले जन आरोग्‍य योजनेच्‍या अमंलबजावणीच्‍या बाबतीत राज्‍यात प्रथम क्रमांकावर असुन श्री साईनाथ रुग्‍णालय सुद्धा त्‍याच धर्तीवर राज्‍यात योजनेच्‍या बाबतीत अग्रगण्‍य बनवावे”- बाळासाहेब कोळेकर,अपर जिल्हाधिकारी,शिर्डी.

  श्री साईबाबा संस्‍थानचे श्री साईबाबा हॉस्पिटल येथे सदरील योजना सन -२०१३ पासुन सुरु करणेत आलेली आहे या योजनेच्‍या मार्फत हृदयाच्‍या,मेंदुच्‍या तसेच इतर विविध आजाराचे उपचार मोफत केले जातात.श्री साईबाबा हॉस्पिटल हे महात्‍मा ज्‍योतीराव फुले जन आरोग्‍य योजनेच्‍या अमंलबजावणीच्‍या बाबतीत राज्‍यात प्रथम क्रमांकावर असुन श्री साईनाथ रुग्‍णालय सुद्धा त्‍याच धर्तीवर राज्‍यात योजनेच्‍या बाबतीत अग्रगण्‍य बनवावे असे आवाहन मा.मुख्‍य कार्यकारी अधिकारी यांनी या प्रसंगी केले.

गुरुवार दिनांक १२ डिसेंबर २०२४ रोजी नविन दर्शन रांग संकुलातील सशुल्‍क दर्शनपास काऊंटर येथे साईभक्‍तांकरीता जनसंपर्क विभागाअंतर्गत  सुरु करणेत आलेल्‍या सशुल्‍क दर्शन पास वितरण प्रणाली कियॉस्‍क मशिन सुविधेचे (कार्ड / UPI) उद्घाटन श्री साईबाबा संस्‍थानचे प्र.मुख्‍य कार्यकारी अधिकारी  बाळासाहेब कोळेकर यांचे हस्‍ते करण्‍यात आले.सदर कियॉस्‍क मशिनव्‍दारे साईभक्‍तांना स्‍वतः सशुल्‍क दर्शन पास काढता येणार आहे.

  यावेळी प्र.वैद्यकीय संचालक डॉ.प्रितम वडगावे,प्र.वैद्यकीय अधिक्षक डॉ.मैथिली पितांबरे,जनसंपर्क अधिकारी सुरेश टोलमारे,प्र.अधिसेविका नजमा सय्यद ई. डी. पी. मॅनेजर अनिल शिंदे, साईप्रसाद जोरी यांचेसह आरोग्‍य मित्र तसेच रुग्‍णालयातील डॉक्‍टर्स,नर्सिंग स्‍टाफ व इतर कर्मचारी उपस्‍थीत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close