जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

मतीमंद मुलींवर शारिरीक अत्याचार,कोपरगाव तालुक्यात खळबळ !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव -(नानासाहेब जवरे)

कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिनांक ०७ सप्टेंबर २०२४ रोजी घरी अज्ञात व्यक्तीने मतीमंद २२ वर्षीय मुलीवर अज्ञात इसमाने ८-९ महिने शारीरिक अत्याचार करून त्या पासून एक अपत्य प्राप्त झाले होते.त्यानंतर या प्रकरणी वाचा फुटली असता पोलिस अधिकाऱ्यांनी तपासाची सूत्रे फिरवली असता त्या गुन्ह्यात संशयित आरोपीची डी.एन.ए.तपासणी केली असता त्या गुन्ह्यात पीडित तरुणीचा अल्पवयीन सख्खा भाऊच निघाला असल्याची धक्कादायक व काळीमा फासणारी घटना उघड आली आहे.त्यातील आरोपीस पोलिसांनी अटक करून त्याची रवानगी बाल सुधारगृहात केली असल्याची माहिती हाती आली आहे.

   

सदर पीडित मुलीचा,संशयित तरुणाचा व बाळाचा डी.एन.ए.तपासणीसाठी नाशिक येथील न्याय वैधानिक प्रयोग शाळेत पाठवला होता.त्याचा अहवाल नुकताच पोलिस अधिकारी यांचे हाती आला असून त्यात आरोपी हा १७ वर्षीय असून तो आरोपी पीडित तरुणीचा सख्खा भाऊ असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.

   सदरचे सविस्तर वृत्त असे की,”शिर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक फिर्यादी महिलेनं (वय-२५) आपल्या बहिणीवर (वय २२) अज्ञात इसमाने ती मतीमंद असल्याचा गैरफायदा घेत तिच्यावर नैऋतेकडील हद्दीत शेतात शारीरिक अत्याचार केल्याचा गुन्हा दिनाक ०७ सप्टेंबर २०२४ रोजी म्हणजेच तीन महिन्यांपूर्वी दाखल केला होता.त्यातून तिने कोपरगाव शहराच्या साधारण दहा कि.मी.अंतरावर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात एक नवजात शिशु जन्माला घातले होते.बाळाच्या जन्मानंतर पीडित तरुणी टाके टाकून देत नव्हती.म्हणून तिला प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते.

   सदर गुन्हा त्यामुळे शिर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला होता त्यामुळे पोलिस अधिकारी चक्रावून गेले होते.या प्रकरणी पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी तपास सुरू केला होता.सदरचा गुन्हा कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांनी तो इकडे वर्ग केला होता.त्यानुसार तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रमांक ३१०/२०२४ भारतीय दंड संहिता कलम ३७६,३७६(२),(j)(l) प्रमाणे अज्ञात व्यक्ती विरुध्द दाखल केला होता.

   दरम्यान दि.०४ सप्टेंबर २०२४ रोजी सदर घटनास्थळी शिर्डी पोलीस उपविभागीय अधिकारी शिरीष वमने,शिर्डी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार,सहाय्यक पोलीस निरीक्षक बलैय्या,कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या तपासी पोलिस उपनिरीक्षक वैशाली मुकणे आदींनी भेट दिली होती.

   दरम्यान हा गुन्हा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांनी तो तपास पोलीस उपनिरीक्षक वैशाली मुकणे यांचेकडे सोपवला होता.त्यांनी सदर पीडित मुलीचा,संशयित तरुणाचा व बाळाचा डी.एन.ए.तपासणीसाठी नाशिक येथील न्याय वैधानिक प्रयोग शाळेत पाठवला होता.त्याचा अहवाल नुकताच पोलिस अधिकारी यांचे हाती आला असून त्यात आरोपी हा १७ वर्षीय असून तो आरोपी पीडित तरुणीचा सख्खा भाऊ असल्याची धक्कादायक माहिती हाती दिली आहे.त्याने आपली मतिमंद २२ वर्षीय बहिणीवर तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत शारीरिक अत्याचार केला होता.

  दरम्यान कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैशाली मुकणे यांनी तपास करून आरोपीचा डी.एन.ए.वरून तपास केला.दरम्यान सदर पीडित तरुणीला अपत्य झाले होते.घटना अंदाजे डिसेंबर २०२३ दरम्यान घडली होती.नाशिक न्याय वैधानिक प्रयोग शाळेत केली असता सदर अहवाल नुकताच कोपरगाव तालुका पोलिसांना प्राप्त झाला आहे.त्यावरून ही घटना उघड झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close