संपादकीय
लाच लुचपत विभागाचा सापळा,तीन जणांवर गुन्हा!
न्यूजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
तक्रारदार यांचा वाळू वाहतुकीचा व्यवसाय असून ते सदरील व्यवसायासाठी वापर करीत असलेल्या ट्रॅक्टर वर कारवाई न करण्यासाठी कोपरगाव तहसील कार्यालयातील आरोपी लिपिक चंद्रकांत नानासाहेब चांडे व योगेश दत्तात्रय पालवे यांनी आरोपी खाजगी इसम प्रतीक कोळपे यांचे मार्फत तक्रारदार यास दरमहा १५ हजार रुपये लाचेची मागणी केली व आपल्या खाजगी हस्तका मार्फत स्वीकारताना रंगेहाथ अटक केली असल्याने खळबळ उडाली आहे.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग हा महाराष्ट्र राज्य हा महाराष्ट्र शासनाचा महत्वाचा विभाग मानला जातो.भ्रष्टाचार मुक्त पारदर्शक कारभार हे महाराष्ट्र शासनाचे धोरण आहे.तेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे ध्येय असल्याचे मानले जाते.शासन नागरिकांना अनेक सेवा पुरवित आहे.जर कोणत्याही शासकीय कामाकरीता शासकीय लोकसेवकांनी लाचेची मागणी केली तर नागरिकांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन हा विभाग वारंवार करतो.लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सदैव अशा नागरिकांच्या बाजुने ठामपणे उभे राहिल आणि लाचखोरांविरूद्ध कारवाई करेल असा विश्वासही दिला जात असतो.भ्रष्टाचार मुक्त समाज राज्याला प्रगती,समृद्धी आणि सुशासनाच्या युगामध्ये घेऊन जाईल.हे केवळ नागरिकांच्या सक्रिय सहभागाने व सहकार्यानेच शक्य होऊ शकेल.समाजाला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी व विकासाला गती देण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला सहकार्य करा.लाचलुचपत प्रतिबंधक विभाग प्रत्येक ठिकाणी आपल्या मदतसाठी सज्ज आहे.असे आवाहन हा विभाग वारंवार करत असला तरी मात्र सामान्य नागरिक मात्र या विभागाकडून जरा फटकुनच वागत असतो.मात्र एखाद्या प्रकरणात मात्र लोकसेवकानी जास्तीची अपेक्षा वाढली तर वैतागलेला नागरिक मात्र अखेरच्या क्षणी या जाचातून मुक्त होण्यासाठी या विभागाचा दरवाजा खटखटावतात.याचे उदाहरण नुकतेच कोळपेवाडी या ठिकाणी उघड झाले आहे.यातील फिर्यादी तथा तक्रारदार (वय -३६)याचा वाळू व्यवसाय आहे.त्यामुळे त्याचा तहसील कार्यालयाशी नेहमी संपर्क येत असतो.त्यातून तेथील अधिकारी अनेकांना लाच देण्यास भाग पाडत असल्याचे वारंवार उघड झाले आहे.यापूर्वी अनेक घटना तालुक्यात घडल्या आहेत.या पूर्वी तहसीलदार,अव्वल कारकून,तीन तलाठी याचे बळी गेले आहे.मात्र आतून ही मंडळी अद्याप बोध घेण्याचे नाव घेत नाही अशीच घटना नुकतीच दिनाक ०६ डिसेंबर २०२४ रोजी घडली आहे.
यातील तक्रारदार यांचा तक्रारदार यांचा वाळू वाहतुकीचा व्यवसाय असून तो त्या व्यवसायासाठी वापर करीत असलेल्या ट्रॅक्टर वर कारवाई न करण्यासाठी चंद्रकांत चांडे रा.कलासाई बंगला सम्यकनगर कोपरगाव व योगेश पालवे अव्वल कारकून,तहसिल कार्यालय कोपरगाव यांनी आरोपी खाजगी इसम प्रतीक कोळपे यांचे मार्फत तक्रारदार यास दरमहा पंधरा हजार रुपये लाचेची मागणी केली होती.
दरम्यान यातील तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने चपळाई दाखवत नाशिक येथील लाचलूचपत प्रतिबंधक विभाग यांचेकडे तक्रार केली होती.त्यावरून दिनांक ०६ डिसेंबर २०२४ रोजी पंचा समक्ष केलेल्या पडताळणी कारवाईत आरोपी चंद्रकांत चांडे यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचांसमक्ष पंधरा हजार रुपये लाचेची मागणी केली व मागणी केलेली लाचेची रक्कम खाजगी आरोपी इसम प्रतीक कोळपे याचेकडे देण्यास सांगितले होते.त्यामुळे तक्रारदार यांनी खाजगी ईसम प्रतीक कोळपे यास संपर्क केला असता त्याने चंद्रकांत चांडे यांनी मागणी केलेली लाचेची रक्कम स्वीकारली होती.त्यानंतर आरोपी पालवे व आरोपी चांडे यांना फोनद्वारे आरोपीने खाजगी इसम प्रतीक कोळपे यांनी १५ हजार रुप्यांची लाचेची रक्कम स्वीकारण्यास सांगितले होते.
दरम्यान चंद्रकांत चांडे व योगेश पालवे यांनी खाजगी इसम प्रतीक कोळपे यास सदर लाचेची रक्कम स्वीकारण्यास संमती दिली असल्याचे उघड झाले होते.त्यातून या दोन्ही आरोपींना लाच लुचपत विभागाचे मार्गदर्शक पोलिस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप घुगे,पोलिस हवालदार दिनेश खैरनार,पोलीस हवालदार गणेश निंबाळकर,पोलीस नाईक अविनाश पवार,पोलीस शिपाई नितीन नेटारे आदींनी त्या तिघांना रंगेहाथ पकडले आहे.त्यांचे विरुध्द कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७, ७ अ व १२ अन्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू असल्याची माहिती यातील मार्गदर्शक पोलिस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे यांनी दिली आहे.दरम्यान या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे.दरम्यान महसूल विभागातील पुरवठा विभागात मोठा सावळा गोंधळ सुरू असून त्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे तालुक्यातील नागरिकांत बोलले जात आहे.