आंदोलन
बांगलादेशाची पुन्हा फाळणी करा-…यांची मागणी
न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानची फाळणी करून बांगलादेश निर्माण केला ते उपकार बांगलादेशवासी विसरले आहे तेथील हिंदूंवर अमानुष अत्याचार सुरू आहेत.आता पुन्हा एकदा धाडसी निर्णय घेऊन बांगलादेशची फाळणी करून दोन तुकडे करावेत अशी मागणी उद्धवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख व माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे.
बांगलादेशात हिंदूंवर अमानुष अत्याचार सुरू आहेत.महिलांचे चारित्र्यहनन होत आहेत.मारहाण व जाळपोळीत अबालवृद्ध भरडले जात आहेत.शेकडो मंदिरं जमिनध्वस्त करण्यात आली आहे.हिंदू धर्मगुरूंना लक्ष्य केले गेले आहे.त्यांचे वकीलपत्र घेणाऱ्या वकीलांनाही मारहाण झाली असून तेथील हिंदू वकिलांची सनद रद्द करण्याची मागणी देखील बांगलादेशात होतं आहे.
बांगलादेशातून हिंदूंना बाहेर काढण्याचे षडयंत्र सुरू आहेत.बांगलादेशातील शासनाला जर दुसऱ्या धार्मियांना तेथे राहू द्यायचे नसेल तर त्यांचे हे मनसुबे भारताच्या कणखर नेत्यांनी उधळून लावावेत व हिंदूंवरील अत्याचार रोखावेत,तीथेच त्यांना सन्मानजनक वागणूक मिळेल यासाठी प्रयत्न करावेत.पाकिस्तान पासून बांगलादेश वेगळा करण्याचे धाडसी पाऊल स्व.पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी उचलले होते.आताही पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह तसेच परराष्ट्रमंत्री सुब्रह्मण्यम जयशंकर देखील यांनी तशीच कठोर भुमिका घ्यावी.बांगलादेशाची फाळणी घडवून आणावी,हिंदूंसाठी स्वतंत्र भुभाग निर्माण करावा,अशी मागणी उद्धवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख राजेंद्र झावरे यांनी केली आहे.यावेळी राजेंद्र झावरे,कैलास जाधव आदिसह शिवसैनिक उपस्थित होते.
राहूल गांधींनी बांगलादेशात जाण्याचा आग्रह धरावा
उत्तर प्रदेशातील संभल येथे हिंसाचारामधील पिडितांना भेटण्याचा आग्रह राहुल गांधी धरत आहेत.राहुल गांधी यांनी संभलला जाण्यापेक्षा बांगलादेशात जाऊन तेथील पिडितांना भेट द्यावी असेही राजेंद्र झावरे यांचे म्हणणे आहे.