आरोग्य
…या शहरात रक्तदान शिबिर संपन्न !
न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून कोपरगाव तालुका शिवसेना युवासेनेच्या वतीने मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सदर प्रसंगी माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.शिबिरात मोठ्या प्रमाणावर रक्तदात्यांनी रक्तदान करून शिबिर यशस्वी केले.या शिबिरासाठी भाकरे हॉस्पिटल व प्रसूतीगृह तसेच संजीवनी ब्लड बँकेचे सहकार्य लाभले.सर्व रक्तदात्यांना कोपरगाव शिवसेना युवासेनेच्या व संजीवनी ब्लड बँकेच्या वतीने प्रशस्तपत्र व डोनर कार्ड देण्यात आले.
यावेळी राजेंद्र झावरे म्हणाले की,”हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिना निमित्त कोपरगाव शिवसेनेच्या वतीने दरवर्षी सामाजिक उपक्रम राबविले जातात.परंतु यावेळेस विधानसभा निवडणूक असल्याने हा कार्यक्रम घेण्यास विलंब झाला.कोपरगाव तालुक्यात रक्ताचा प्रचंड तुटवडा असल्याने तालुक्यातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत रक्ताची अडचण भासल्यास समस्या निर्माण होऊ शकते ही बाब लक्षात घेऊन रक्तदान शिबिर घेण्याचे ठरवले व आमच्या आवाहनाला देखील कोपरगावातील शिवसैनिकांनी व नागरिकांनी प्रतिसाद दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो.
यावेळी उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव,शहरप्रमुख सनी वाघ,माजी नगरसेवक अनिल अव्हाड,डॉ.विरेश भाकरे,निता पाटील,कलविंदरसिंग दडीयाल,मनोज कपोते,प्रफुल्ल शिंगाडे,विशाल झावरे,सुनील कुंढारे,विकास शर्मा,दिलीप अरगडे,दिलीप सोनवणे,बाळासाहेब साळुंके,राहुल देशपांडे,मधुकर पवार,दिपक बरदे,राहुल देवरे,अविनाश धोक्रट,विक्रांत झावरे,सतीश शिंगाने,अभिजीत जाधव,भीमाशंकर औताडे,सचिन मोरे,विजय शिंदे,संदीप दळवी,निशांत झावरे,आशुतोष दळवी,बंटी दरुंटे,सनी काळे,विजय सोनवणे,अंबादास वाघ,बंटी बोर्ड,रवी आठरे,आदित्य ठोंबरे,अक्षय नन्नवरे,रवी पवार,कार्तिक बागुल,सागर शिंदे,वेदांत कर्पे,गोरख शेजवळ,सतीश लोळगे,चंद्रहांस पाबळे,परेश डागा आदीसह मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक व रक्तदाते उपस्थित होते.