जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

मतदारांना चॉकलेट वाटप होणार-माहिती

न्युजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   कोपरगाव विधानसभा निवडणूक प्रचार काल संपला असला तरी खरे आव्हान शेवटच्या रात्रीचे असून त्यावेळी मतदारांना चॉकलेट वाटप होणार असून मतदारांनी त्यापासून सावध राहण्याची गरज आहे आणि चॉकलेट जरी दिले तरी ते आपलेच असून ते घेऊन मतदारांनी आपल्या तुतारीला मतदान करावे असे आवाहन थोरल्या राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप वर्पे यांनी नुकतेच केले आहे.त्याची सर्वदूर चर्चा होत आहे.

  

“ज्यांनी निवडून आणण्यासाठी शरद पवार यांनी सभा घेतली त्यांना मतदारांनी विजयी केले आहे.पवार यांना ज्यांनी सोडून दिले ते पडले आहे.आ.काळे हे कायम दलबदलू नेते म्हणून त्यांची ओळख निर्माण केली आहे.तालुक्यात मोठा प्रतिसाद मिळाला आहे.आपण नक्कीच विजयी होणार आहे “- संदीप वर्पे,उमेदवार,राष्ट्रवादी.

  संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाला अवघे काही तास उरले आहेत.या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेल्या प्रचाराच्या तोफा सोमवारी सायंकाळी थंडावल्या आहेत.कोपरगाव विधानसभा मतदार संघ त्याला अपवाद नाही.यातील धाकट्या पवारांचे उमेदवार आशुतोष काळे आणि आपली पूर्ण ताकद पणाला लावली असल्याचे दिसून आले आहे.आधी हलक्यात घेतलेली निवडणुकीने थोरल्या पवारांचे उमेदवार संदीप वर्पे यांनी दाखवलेल्या चपळाईने त्यांची नंतर चांगलीच दमछाक झाली असल्याचे दिसून आले आहे.त्यांनी प्रचार फेरी काढून नंतर आपली विर सावरकर चौकात आपली सांगता सभा घेतली त्यावेळी त्या सभेत ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे हे होते.

  

दरम्यान थोरल्या राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप वर्पे  यांच्या प्रचार फेरीत माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे छायाचित्र झळकावले असल्याने तर्ककुतर्कांना उधाण आले आहे.याचा संदेश मतदारांपर्यंत पोहचला असल्याचे बोलले जात आहे.

   सदर प्रसंगी कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष राजेंद्र झावरे,संजय सातभाई,माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल,माजी जिल्हाध्यक्ष प्रमोद लबडे,शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुहास वहाडणे,उपजिल्हा प्रमुख कैलास जाधव,माजी तालुकाध्यक्ष शिवाजी ठाकरे,श्रीरंग चांदगुडे,ऍड.दिलीप लासुरें,उबाठाचे शहर प्रमुख सनी वाघ,माजी शहराध्यक्ष भरत मोरे,कलविंदर दडियाल,आर.पी.आय.चे.जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड,माजी शहराध्यक्ष जितेंद्र रणशुर,रावसाहेब टेके,शब्बीर शेख,आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

  

“माजी आ.कोल्हे गटाचा चांगुलपणा काही कामाचा नाही असे आवाहन करून या उलट स्थिती असती आणि माजी आ.कोल्हे उभे असत्या तर तुमचे काम आ.काळे यांच्या कार्यकर्त्यांनी केले असते का ?- संदीप वर्पे,उमेदवार राष्ट्रवादी शरद पवार गट.

  त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”लोकसभा निवडणुकीप्रमाणे यावेळी विधानसभेला उमेदवाराला निवडून द्यावे लागेल.ज्यांनी निवडून आणण्यासाठी शरद पवार यांनी सभा घेतली त्यांना मतदारांनी विजयी केले आहे.आज त्या नेत्यास त्यांनी सोडून दिले आहे.कायम दलबदलू नेते म्हणून त्यांची ओळख निर्माण केली आहे.तालुक्यात मोठा प्रतिसाद मिळाला आहे.आपण नक्कीच विजयी होणार असा दावा केला आहे.

  भाजप येथील कार्यकर्त्यांची मोठी ससेहोलपट होत आहे.त्यांच्या फलकावर साधा पंतप्रधान मोदी यांचा फोटो नाही याचा जाब का विचारला जात नाही.केंद्राच्या ०१ हजार ५०० कोटींचा हिशेब स्वतःच्या नावावर खपवता.मग त्यांचा फोटो का वापरत नाही असा सवाल केला आहे.माजी आ.कोल्हे गटाचा चांगुलपणा काही कामाचा नाही असे आवाहन करून या उलट स्थिती असती आणि कोल्हे उभे असते तर तुमचे काम आ.काळे यांच्या कार्यकर्त्यांनी केले असते का असा सवाल केला आहे.तालुक्यातील रस्त्यांची वाट लागली आहे.पिण्याच्या पाण्याची शहरात दुरवस्था आहे.कोपरगाव तालुक्याच्या विकासाची जबाबदारी शरद पवार यांनी घेतली आहे.पीक विमा शेजारच्या तालुक्यांना ३०० रुपयांनी मिळाला तर कोपरगाव तालुक्याला १०० रुपयांनी मिळाला असल्याचा आरोप त्यांनी शेवटी केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close