निवडणूक
..या उमेदवाराचा महायुतीच्या उमेदवारास पाठींबा !
न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर आ.आशुतोष काळेंच्या प्रचारार्थ नुकत्याच पार पडलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेला झालेल्या मोठ्या गर्दीने मतदार संघात झालेल्या विकासालां गृहीत धरून वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार शकील चोपदार यांनी देखील विधानसभा निवडणुकीतून माघार घेवून उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या साक्षीने आ.काळेंना पाठिंबा दिला आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक- २०२४ ची रणधुमाळी मोठ्या उत्साहात सुरु झाली आहे.राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे.प्रचार अंतिम टप्प्यात आला असून आगामी २३ नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे.राज्यात एकीकडे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी सामना रंगणार आहे.त्यासाठी पवार गटाच्या दोन्ही बाजूंनी जोर लावला जात असून ग्रामीण व शहरी भागात प्रभाग सभा आणि फेऱ्याना ऊत आला आहे.कोपरगाव शहरात नुकतीच अजित पवार यांची आ.काळे यांची प्रचार सभा संपन्न झाली आहे.त्यावेळी हा पाठिंबा दिला आहे.
त्यावेळी चोपदार यांनी सांगितले की,”मुस्लीम व बहुजन समाजाचे प्रश्न सुटावे व कोपरगावचा विकास व्हावा या दूरदृष्टीतून वंचित बहुजन आघाडी पक्षाचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी मला उमेदवारी दिली होती.त्यांनी मला ज्या उद्देशातून उमेदवारी दिली ते प्रश्न आणि मुद्दे व विकासाच्या प्रश्नांवर त्यांच्याशी माझी चर्चा होवून हे प्रश्न सोडविण्याचे आ.काळे यांनी आश्वासन दिलेले आहे.त्यांनी पाच वर्षात केलेला मतदार संघाचा विकास आणि त्यांच्याकडे असलेले विकासाचे व्हिजन याबाबत खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील कौतुक करून मतदार संघाच्या विकासाला निधी कमी पडू न देण्याची ग्वाही दिलेली आहे.दरम्यान बाळासाहेब आंबेडकर यांना आपण समक्ष भेटून माझी भूमिका स्पष्ट करणार आहे व यापुढे देखील हे प्रश्न आ. काळे यांच्या सहकार्यातून लवकरात लवकर कसे सोडवून घेता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शकील चोपदार यांनी सांगितले आहे.