संपादकीय
…या महसूल मंत्र्यांचा पराभव निश्चित!
न्युजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
उत्तर नगर जिल्ह्यातील कोपरगाव,राहाता,संगमनेर या विधानसभा मतदार संघांची निवडणूक मोठ्या प्रतिष्ठेची गणली जात असून त्यासाठी सर्वच पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे मात्र आगामी काल हा विरोधी पक्षांना अत्यंत जोखमीचा असून उत्तर नगर जिल्ह्यातील नेते आपल्या विरोधकांची निवड स्वतः करत असल्याचा त्यांचा धोकादायक आणि विश्वासघातकी लौकिक असल्याने शेवटी ते आपली रसद थोपवू शकत असल्याची विश्वसनीय माहिती हाती आल्याने विरोधकांचे इमले आकाश पाताळ एक करूनही त्यांचे घोडे तेथे पेंड खाण्याचा धोका असल्याचे मानले जात असल्याने आगामी रात्र वैऱ्याची समजून काम करावे लागणार असल्याचे राजकिय निरीक्षकांचे म्हणणे आहे.
राज्यात गेल्या दोन-अडीच वर्षांपासून प्रचंड राजकीय उलथापालथी झाल्या आहेत.सत्ता पाडून नवं सरकार स्थापन करण्यासाठी पक्ष फोडेपर्यंत अनेक प्रयोग राजकारणात राबवले गेले.यामुळे भिन्न विचारधारा असलेली नेतेमंडळीही सत्तेसाठी एकत्र आलीत.पक्ष फोडून किंवा पक्षात दुफळी निर्माण करून जे नेते बाहेर पडले त्यांना पुन्हा पक्षात घेणार की नाही अशी चर्चाही वारंवार राजकारणात घडताना दिसते.अद्याप मतदानाची वीस नोव्हेंबर ही तारीख आणि निकालाची तेवीस तारीख दूर असताना या घडामोडी घडताना वा विचार करताना दिसत आहे.अर्थातच काही करून महायुती आणि महाआघाडी यांनी काही करून सत्तेत यायचे आहे.त्यासाठी त्यांनी उमेदवार निवडीपासून ते विरोधी उमेदवार कोण उभा करायचा याचे सोयीस्कर नियोजन केले असल्याचे आपल्याला बारकाईने पाहिले तर लक्षात येईल.राहाता विधानसभा मतदार संघाची निवडणूक आठवा याचा सहज अंदाज येईल संगमनेर तालुक्यातील वर्तमान उमेदवार कोणी कधी वर्तमानपत्रात नाव तरी वाचले होते का ? पण तो आज उमेदवार आहे.कोपरगाव विधानसभा मतदार संघातील सुरुवातीला ही चर्चा रंगली होती.आता येथील प्रचाराने वेग घेतला आहे.राउतांची गणती,नाल,मेख,तंगतोबरा,सिद्ध ठेवला आहे.सुस्ती अजिबात नको असा आदेश झाला आहे.अशी बरीच भवती न भवती झाली आहे.”जेवित असल्यास पाणी पिण्यास आम्हापाशी यावे” असे आदेश झाले आहे.या तिन्ही मतदार संघात संगमनेर वगळता दोन्ही जागा धोक्यात असल्याचे मतदारांत बोलले जात आहे.कोपरगाव तालुका त्याला अपवाद नाही.संदीप वपें यांनी प्रस्थापितांची गंभीर स्थिती निर्माण केली असल्याचा ग्रामीण भागात बातम्या आहेत.”यशात सर्वात मोठी भीती ही पराभवाची भीती ही असते” असे लाऊ हॉल्टस म्हणतो ते उगीच नाही.याला उत्तर नगर जिल्ह्यातील साखर सम्राट अपवाद नाही.मात्र याला काही प्रमाण देणे अवघड असले तरी आपली तर्कबुद्धी वापरली तरी याचे उत्तर सहज मिळू शकते.त्यामुळे याचा मतदारांना साकल्याने विचार करावा लागणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील मतदार पाच वर्षातील ५९ महिने २९ दिवस वर्तमान नेत्यांना शिव्या घालताना दिसून येईल मात्र शेवटच्या रात्री मात्र एक चपटी आणि पाचशे रुपयांची नोट बघितली की बेभान होऊन जातो व नको तेथे बटन दाबून आपल्या पायावर धोंडा पाडून घेताना दिसून येत असल्याने वारंवार दिऊन आले आहे.निवडणूक कधी येते असे या लाचारांना होऊन जाते.निवडणुकीशिवाय राज्य अथवा देश त्यांना बाणासुरा सारखी ” वाटत असते.ही निवडणूकही त्याला अपवाद असेल मानणे धाडसाचे ठरेल.निवडणूक लागली की मतदार भेभान होऊन जातात.स्वार्थ साधायचा असेल तर माणसे कशी वागतात याचे एका सुभाषितात वर्णन आले आहे,” उंटाच्या लग्नाला गाढवे मंगलाष्टके गातात,गाता गाता म्हणतात,”किती हे तुमचे सुंदर रूप;तर उंट त्यांना म्हणतात,”किती हो तुमचा गोड आवाज”असे चित्र या निधानसभा निवडणुकीत सार्वत्रिक झाले आहे.या स्थितीत मतदारांना मग त्याला नगर-मनमाड वा अन्य नादुरुस्त रस्ता आठवत नाही की;पिण्याच्या पाण्याची टंचाई कधी जाणवत नाही,सोयाबीन,दूध,गहू,ज्वारी,उसाला दर मिळाला नाही याची खंत वाटत नाही.बेरोजगारी हवेत विरून जाते,कोट्यवधी रुपये कमिशन मध्ये जिरून जातात याची चीड त्याला येत नाही.साई संस्थानमधील हार का बंद केले ? साई संस्थान मधील पंधरा वीस वर्षे कामगार कायम का होत नाही ? सहकारी कारखान्यात सेवानिवृत्तीच्या आदल्या दिवशीच कामगार कायम का होतात ? याची आठवण येत नाही.सोयाबीन,गहू,ज्वारीचे कोसळलेले दर त्याला दिसून येत नाही.त्यामुळे शेती सिंचनाचे पाणी तर फार दूरची गोष्ट ठरते.आता या निवडणुकीत त्यांना चांगले उमेदवार दिसून येणारं नाही कारण तसेच आहे.ढाबे,वाड्या वस्त्यावरील मटणाच्या जेवणावळ्या त्याला स्वतःवरील नियंत्रण गमावण्यास भाग पाडताना दिसून येताना हमखास दिसतात.स्वाभिमान नावाची चीज अस्तित्वात असते याचे भान त्याला राहत नाही.कार्यकर्त्यांना आदल्या रात्री येणारे घबाड खुणावत असते हे नेहमीचे सार्वत्रिक निवडणुकीतील चित्र आहे.
आचार संहिता लागण्याच्या आणि हळदीच्या आदल्या दिवशी आहेराच्या पेट्या विश्वासू कार्यकर्त्यांच्या घरी पोहच झालेल्या असतात यात नवीन काही राहिले नाही.लोकसभा निवडणुकीत तर विमानतळावर असलेल्या थैल्या थेट पोलिसांना इच्छित स्थळी पोहच कराव्या लागल्या याला फार काही दिवस झालेले नाही.इतकी राजकीय पातळी नीचांकी घसरली आहे.आताही वेगळे चित्र राहणार नाही.आधीच मतदारांना लाडकी बहिण,तीर्थयात्रा,घरघंट्या,शिलाई मशीन पोहच झालेल्या आहेत हे नव्याने सांगण्याची गरज नाही ती मतदारांची सवयच झालेली आहे.लाचार मतदार आणि गुलाम हे वेगळे असू शकतं नाही याचा दाहक अनुभव यावेळी येणार आहे.मात्र यापलीकडे आता खेळ होणार असल्याच्या आतील गोटातून बातम्या आहेत.त्या धक्कादायक आहेत.त्यात विशेषत्वाने राहाता मतदार संघात सर्व काही नियोजित चालू असल्याच्या बातम्या आहेत.जशी नाटकाची स्क्रिफ्ट असते त्या प्रमाणे नाटक सुरू असते तशीच ही स्थिती असल्याचे बोलले जात आहे.महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांची शिट कधी नव्हे एवढी धोक्यात असून ती का असू नये ? असा प्रश्न विचारला तर योग्य होईल अशी स्थिती आहे.त्यांचे युवराज थेट आपल्या आजोबा बरोबर काम केलेल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना,” आरे…कारे…”ने बोलत असतील तर अशा विषारी वृक्षाला गोड फळे येण्याची अपेक्षा तरी कशी करणार ? तिसऱ्या पिढीतील तर दबंगशाही हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क बनला असल्याचे वारंवार दिसून आले आहे.कार्यकर्ते दादासाहेब पवार,सचिन चौगुले,श्रीकांत मापारी आदी वरील हल्ले त्यांची साक्ष देत आहे तर आडगाव येथील शेळके हे लोणीतून बालंबाल बचावले होते.एट्रोसिटीचा कार्यकर्त्यांचे दमन करण्याचे यशस्वी हत्यार म्हणून ही नेते मंडळी मराठा समाजावर सर्रास वापर करताना दिसून येत आहे.पिंपरी निर्मळ हे अलीकडील ताजे उदाहरण म्हणून पाहता येईल.मात्र तेथील काँग्रेसचे उमेदवार प्रतिभाताई घोगरे यांनी त्यांची पळता भुई थोडी केली आहे.
दरम्यान ही केवळ येथील स्थिती नाही संगमनेर तालुका त्याला अपवाद नाही.सन-२०१५ साली तळेगाव दिघे येथील निळवंडे धरणाच्या आंदोलनात सहकार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना व ग्रामस्थांना याच दिव्यातून जावे लागले आहे.३० जुलै २०१४ साली झालेल्या “रास्ता रोको”आंदोलनात लाठ्या-काठ्या याच काँग्रेसी मंडळीनी आणून ठेवल्या होत्या.याचा मासलेवाईक नमुना हा दिनांक १० ऑगस्ट २०१४ ला निळवंडे कालवा कृती समितीला राहाता तालुक्यात अनुभवयास मिळाला होता.त्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे खडकेवाके येथे फळप्रक्रिया उद्योगाच्या उद्घाटनाला येणार होते.त्यावेळी साई संस्थानच्या हजार रुमच्या उद्घाटनाच्या प्रसंगी त्यांनी कालव्यांच्या कामास निधी द्यावा अशी विनंती नव्हे आदेश विखे यांना दिले होते.त्यामुळे शेतकरी मोठ्या अपेक्षेने घटनास्थळी जमले होते.मात्र ‘चोराच्या मनात चांदणे’या न्यायाने ही मंडळी दुष्काळी १८२ गावातील निळवंडे कालवा कृती समितीच्या कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांना पाहून अस्वस्थ झाली होती.त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील या फेकल्या तुकड्यावर जगणाऱ्या लाचार व मुजोर अधिकाऱ्यास आदेश देऊन उपस्थित पोलिसांकरवी थेट निशस्त्र शेतकऱ्यांवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला चढवला होता.या नेत्यांच्या विकारांनी त्यावेळी म्हणा की,”सहस्र भुजा धारण केल्या होत्या.तो हल्ला उभ्या देशाने व राज्याने पाहिला होता.तो दिवस राखी पौर्णिमेचा होता.त्यामुळे टी.व्ही वाहिन्यांनी ‘ तो ‘ हल्ला काही दिवस चर्चासत्राच्या रूपाने जवळपास तीन ते चार दिवस आपापल्या चॅनेलवर चालवला होता.समितीचे कार्यकर्ते नानासाहेब जवरे,रुपेंद्र काले आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अटक झाली होती.त्यांनी जामीन घेण्यास नकार दिला होता.त्यावेळी याच विखेंना बुडबुडा आला होता.त्यावेळी त्यांचा घडा भरला होता.त्यांनी एका सेनेच्या जिल्हा पातळीवर असलेल्या नेत्यास आणि महिला पोलिस अधिकाऱ्यास विनवणी करून त्यांना सोडून द्या;”माझे शीट पाडायचे आहे का ? अशी विनवणी करूनही समिती कार्यकर्ते माघार घेत नसल्याने मात्र निळवंडे प्रकल्पाच्या कालव्यांच्या कामास मदत करणारे डॉ.एकनाथ गोंदकर,डॉ.राजेंद्र पीपाडा आदींनी मध्यस्थी करून हे आंदोलन स्थगित केल्याने विखे यांना दिलासा मिळाला होता.यातील सर्वात महत्वाची बाब राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री चव्हाण यांनी विखे यांची कान उपटले होते व आधी कालवे का केले नाही ? अशी थेट विचारणा करून कालवा कृती समितीची माफी मागितली होती.त्यावेळी राधाकृष्ण विखे यांना पश्चात बुध्दी होऊन त्यांनीही समितीची ‘ऑनकॅमेरा’ माफीनामा कबूल केला होता हे ते नक्कीच विसरले नसतील.यानंतरही या महाशयांनी कालव्यांच्या कामास आडवे येण्याची एकही संधी सोडली नाही.संबधित मंत्र्यांना दबाव आणून काम बंद कसे राहील याची वेळोवेळी तजवीज केली होती.ते केवळ आपल्या दारू कारखान्यांना पाणी चोरून वापरण्यास मिळावे या साठी हे उद्योग केल्याचे समितीने उच्च न्यायालयात सप्रमाण उघड केले होते.यांचा दांभिकपणा इतका पराकोटीला गेला आहे की यावेळी त्यांचा मतपेटीतून मतदारांनी बंदोबस्त केला नाही तर हे भूत सर्व मतदारांच्या पाठीशी हमखास बसणार आहे हे वेगळे सांगण्याची गरज उरत नाही.
दरम्यान संगमनेर येथील आ.बाळासाहेब थोरात हे वरिष्ठ काँग्रेसी नेतेही अपवाद नाही हे विशेष ! सुसंस्कृतपणाचा आव आणून नगर मनमाड रस्त्याच्या पश्चिमेकडील नेते गुळाने मारतात आणि पूर्वेकडील विषाने इतकाच काय तो फरक.साखर सम्राट सत्तेत कोणीही येवो जनतेचे मरण मात्र नक्की आहे.जनतेची जिरावयाला यांचे सर्वांचे एकमत होते ही सर्व साखर सम्राट नेत्यांची खासियत राहीली आहे.निळवंडे कालवा कृती समितीने १८ वर्षे विविध आंदोलन करून आणि सलग ०८ वर्षे न्यायिक लढा देऊन जलसंपदा विभागाचे आर्थिक अधिकार गोठवून हे पाणी गतवर्षी आणले आहे मात्र ही उलट काळजाची हि मंडळी आपल्या जनतेच्या लुटीच्या पैशातून ‘बॅनर’बाजी करून कालवा कृती समितीचे श्रेय घ्यायला मुळीच विसरली नाही.गेली ५४ वर्षे आडवे येणारे,कोणी,’ जलदुत’ ,कोणी,’जलनायक’ झाले आणि जनतेला फसवत राहिले.यांचे मित्र असलेले माजी मंत्री मधुकर पिचड यांनी अकोलेतील कि.मी.० ते २८ मधील काम ३८ वर्षे भूसंपादन होऊनही होऊ दिले नव्हते.आजही कालव्यांचे साईड गटारीला मुहूर्त लाभत नाही.अकोले तालुक्यातील अस्तरिकरण वेग घेत नाही.०३ मे सन-२०१९ ला उच्च न्यायालयाने समितीच्या याचिकेवर आदेश देऊन सव्वा दोनशे पोलिसांचा ताफा दिला त्यावेळी कार्यकारी अभियंता भारत शिंगाडे यांनी ते काम पूर्ण केले.त्यावेळी ही नेते मंडळी कोणत्या बिळात जावून लपली होती हे अद्याप सांगितलेले नाही.संगमनेर तालुक्यातील निळवंडे आणि सहकारी कारखान्यानजीक,भूसंपादन होऊ दिले नव्हते हे समितीला विसरता येणार नाही असो. मुद्दा हा ‘निळवंडे’चा नाही यांच्या अपप्रवृत्तीचा आहे.ही सारी मंडळी एकजात आहे.वर्तमान सत्ताधाऱ्यांना आपली संस्थाने सांभाळण्यासाठी त्यांना संरक्षण कवच पुरविण्यासाठी आमदारकी आणि खासदारकी हवी आहे.पण येथील मतदारांचा दुर्दैवाने गोड गैरसमज झाला आहे व होत आहे की,’ही मंडळी आपल्यासाठी निवडणूक लढवत आहे.या गोड गैरसमजातून मतदारांनी पहिले बाहेर येणे महत्त्वाचे आहे.तरच आगामी २० नोव्हेंबर ची क्रांती होऊ शकणार आहे.
काळजी करणारे शोधा कारण गरजेपुरता वापर करणारे तुम्हाला निवडणूक काळात तुम्हाला शोधत येणार आहे हे उघड आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे नेहमी म्हणत मी राजकारणात सुख भोगण्यासाठी आलेलो नाही;तर आपल्या सर्व शोषित आणि दलीत बांधवांना त्यांचा हक्क मिळवून देण्यास आलो आहे.हे वाक्य दुष्काळी १८२ गावातील कार्यकर्त्यांनी विसरता कामा नये.आपला मतलब साधण्यासाठी निवडणूक काळात गोड आवाजाला भुलण्याची चूक कदापि करू नये हे उत्तम.मतलब साधल्यावर प्रत्येक नेता अनोळखी होऊन जातो याचा विसर पडू देऊ नका.जर्मन विचारवंत ब्रेस्त म्हणाला होता की,”राजकीय निरक्षर हा सर्वात वाईट निरक्षर असतो.सुम्ही मतदार राजकीय साक्षर आहे याचा पुरावा देण्याची वेळ आगामी २० नोव्हेंबर रोजी आहे.गर्दीमध्ये हरवलेल्या माणसाचा शोध घेता येतो;मात्र विचारांच्या गर्दीत भरकटलेल्या माणसाचे संपूर्ण जीवन अंधकारमय होऊन जात असते’ याचे भान उत्तरेतील मतदारांनी ठेवले तो सुदिन !
मो.9423 43 9946.