निवडणूक
तलावाचे श्रेय एकट्याने घेताना वहाडणे यांची मदत घेण्याची नामुष्की !
न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
जनतेला विकासाची जी काही आश्वासने दिली त्यापैकी बहुतांश आश्वासने पूर्ण झाली असून उर्वरित कामे पूर्णत्वाच्या मार्गावर असून पुढील काळात पूर्ण होणार असल्याचा काळे गटाचा दावा आहे.त्यामुळे मतदार संघातील शहरी भागात मतदारांचा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.मात्र पाच क्रमांकाच्या तलवाचे एकट्याने श्रेय घेणाऱ्या आ.काळे यांना माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांना बरोबर घेण्याची नामुष्की ओढवली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक- २०२४ ची रणधुमाळी मोठ्या उत्साहात सुरु झाली आहे.राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे.राज्यात एकीकडे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी सामना रंगणार आहे.त्यासाठी पवार गटाच्या दोन्ही बाजूंनी जोर लावला जात असून ग्रामीण व शहरी भागात प्रभाग सभा आणि फेऱ्याना ऊत आला आहे.
दरम्यान आज सकाळी अकरा वाजता आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरात प्रचार फेरी काढली यावेळी या प्रचार फेरीत महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते बहु संख्येने सहभागी झाले होते.यावेळी या प्रचार फेरीमध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती.सर्व कार्यकर्त्यांनी आ.आशुतोष काळे यांचे कटआउटस हातात घेवून त्यावर लिहिलेले ‘एक नंबर’, ‘आमचं ठरलंय’ हे घोषवाक्य नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते.
सदर प्रसंगी आ.आशुतोष काळे म्हणाले की,”सत्ताधारी पक्षाचा लोकप्रतिनिधी या नात्याने माझी विकासाची जबाबदारी पार पाडतांना मतदार संघातील जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण केली.मतदार संघातील रस्ते,वीज,पाणी,आरोग्य हि मुलभूत प्रश्न सोडवला आहे.या पाच वर्षात केलेल्या विकास कामांना जनतेसमोर घेवून जात आहे आणि विकासाच्या मुद्द्यावरच निवडणुकीला सामोरे जात आहे.कोपरगाव शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविला आहे.असे सांगताना त्यांनी विजय वहाडणे व कोल्हे समर्थक नगरसेवक यांचे योगदान सांगण्याचे टाळले आहे.कोपरगाव शहरासह मतदार संघातील रस्त्यांचा प्रश्न बहुतांशी सुटला असून भविष्यात मतदार संघात सिमेंटच्या रस्त्यांचे जाळे उभारायचे असल्याचा दावा केला आहे.उपजिल्हा रुग्णालयाचे काम प्रगतीपथावर असून त्या माध्यमातून आरोग्याचा प्रश्न सुटणार आहे.या पाच वर्षात जनतेला माझ्याकडून विकासाच्या ज्या काही अपेक्षा होत्या त्या अपेक्षा पूर्ण केल्यामुळे जनता समाधानी आहे त्यामुळे मतदारांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे.
तत्पूर्वी प्रचार फेरीला सुरुवात करतांना कोपरगाव शहरातील हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आदी महापुरुषांच्या स्मारकांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी रस्त्याने ठिकठिकाणी महिलानी आ.काळे यांचे औक्षण केले व नागरिकांनी देखील हस्तांदोलन करून त्यांना सदिष्छा दिल्या आहेत.