जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

राजकीय अवकाशात रंगत वाढविणारे दोन दिवस !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
 
    महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकारणात अनेक घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीसह इतर पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात येत आहेत.आज २७ ऑक्टोबर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.या यादीमध्ये उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत ही यादी जाहीर केली आहे.या तिसऱ्या यादीमध्ये ९ जणांची उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.तत्पूर्वी त्यांनी दुसऱ्या यादीत कोपरगाव विधानसभा मतदार संघातील प्रदेश प्रवक्ते संदीप वर्पे यांच्या नावाची जोरदार घोषणा केली होती.त्यावर आता प्रतिक्रिया उमटू लागल्या असून शिवसेना (उबाठा)ने या जागेवर जोरदार दावा ठोकला असून मुंबईत तीन दिवस मुक्काम ठोकला असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.त्यामुळे वर्पे यांची उमेदवारी राहणार की जाणार असा सवाल निर्माण झाला आहे.

  

दरम्यान मराठा आंदोलक उमेदवारीसाठी अंतरवलित पायधूळ झाडत असून त्यांच्यातील काही जणांनी गुडघ्याला बाशिंग बांधून स्वतःचा आपल्या उमेदवाऱ्या जाहीर केल्या होत्या.मात्र नवीन माहितीनुसार यात ऍड.योगेश खालकर,बाळासाहेब जाधव,राजेंद्र कोल्हे,विनय भगत,विजय वडांगळे असे काही जण उच्छुक असल्याची माहिती हाती आली आहे.

 

आ.आशुतोष काळे,    संदीप वर्पे,     राजेंद्र झावरे,     विजय वहाडणे

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं घोडामैदान जवळ आलं आहे.महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे.तर २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहेत.या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.भाजपने उमेदवारी देताना विद्यमान आमदारांनाच पुन्हा मैदानात उतरवले आहे.तर काहींची उमेदवारी कापण्यात आली आहे.त्यांना उमदेवारी नाकारण्यात आली आहे.याबाबतही देवेंद्र फडणवीस यांनी मोठा खुलासा केला आहे.उमेदवारी देताना तीन प्रकारचा अभ्यास केला गेला.त्यानंतर उमेदवारी निश्चित करण्यात आली.त्यात विद्यमान आमदारांबाबत नाराजीचा अभ्यास केला गेला.शिवाय ज्यांच्या बाबतीत नाराजी जास्त त्यांना उमेदवारी नाही,ज्यांच्याबाबत नाराजी कमी त्यांना मात्र उमेदवारी देण्यात आली असल्याचे म्हटलं आहे.मात्र राष्ट्रवादीने  यासाठी कोणता निकष लावला हे समजायला मार्ग नाही ही.आक्षेप संदीप वर्पे यांच्या उमेदवारीला नाही तर राष्ट्रवादीचे कोपरगाव विधानसभा मतदार संघात किती कार्यकर्ते आणि मतदार आहे याला आहे.वर्पे हे शरद पवार यांचे विश्वासू आणि निष्ठावान सहकारी मानले जातात यातही शंका नाही.त्यांचा राजकीय अभ्यास चांगला आहे यातही कोणताही प्रत्यय नाही.कोपरगाव नगरपरिषदेत ते अभासून प्रकटत असत हे मी अनेक वेळा पाहिले आहे.त्यांच्या या अभ्यासाचा पालिकेच्या कारभारात निर्णय घेताना मोठा उपयोग आ.काळे यांचेसह शहराला झाला आहे यातही काही शंका नाही.मात्र मतदारांचा त्यांच्या व आ.आशुतोष काळे यांच्या संबंधावर आक्षेप आहे.त्यांची आणि आ.काळे यांची मैत्री सर्वश्रुत आहे.त्यांनी वर्पे यांना दिलेली ठेक्याची कामे मोठ्या प्रमाणावर शहरात चर्चेत आहेत.त्यांना रयत शिक्षण संस्थेत घेतले.स्थानिक महाविद्यालय सदस्य मंडळावर घेतले.त्यात आ.काळे यांनी शिफारस केली नसती तर त्यांचे अस्तित्व खरच असते का ? हा खरा प्रश्न आहे.यात शरद पवार यांचे आदेश आहेतच पण खाली आ.काळे यांची साथ ही उपयुक्त ठरली आहे हे सांगण्याची वेगळी गरज नाही.ते प्रथम दिलीप वळसे पाटील यांचे सहकारी मानले जात.त्यांचा संघर्ष सर्वश्रुत आहे.शून्यातून त्यांनी आपले अस्तित्व निर्माण केले आहे.त्याला तोड नाही.एक प्राचार्यांचा मुलगा ते थेट राष्ट्रवादीचे,’प्रदेश प्रवक्ते पद’ हा प्रवास सोपा नाही.म्हणूनच शरद पवार यांनी त्यांची विधानसभा निवडणूक प्रचाराची व सोशल मीडियाची टीम मतदार संघात पाठविली असल्याची बातमी आहे.मात्र संदीप वर्पे यांच्या उमेदवारीने आ.आशुतोष काळे यांची लढाई सोपी केली हे सांगण्यास कोण ज्योतिषाची गरज उरलेली नाही.त्यांचे नामनिर्देशन सादर करताना दिनांक २५ ऑक्टोबर रोजी झालेली गर्दी आणि शहरातील प्रमुख मान्यवरांची उपस्थिती बरीच बोलकी आहे.फक्त मताधिक्य किती एवढाच तो प्रश्न उरला आहे आणि ते राज्यात उच्चांकी असू शकतात असे स्पष्ट संकेत मिळत आहे.

  

माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे.

दरम्यान दुसरीकडे माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांनी आपली ओळख प्रस्थापित काळे कोल्हे यांचे कट्टर विरोधक अशी केली असून आपले नामनिर्देशन दाखल करून त्यातून त्यांनी आपला,’बिन पैशाचा उमेदवार ‘असा प्रचार सुरू केला असून रान पेटविण्यासाठी सुरुवात केली आहे.

  

  त्यानंतर दोन वर्षापूर्वी शरद पवार आणि अजित पवार यांच्या दोन चुली निर्माण झाल्या त्यात त्यांनी शरद पवार यांची तळी उचलली होती.मात्र कोपरगाव विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी अथवा काँग्रेसला मानणारा मुस्लिम आणि दलीत वर्ग आता त्यांच्या सोबत नाही.सन-२०१४ क्या लोकसभा निवडणुकीनंतर हा वर्ग मुस्लिम वगळता भाजप बरोबर गेला होता.त्यामुळे ही हक्काची मतपेढी आता राष्ट्रवादी बरोबर राहिलेली नाही.त्यातच महाआघाडी बरोबर असल्याने मुस्लिम मतदार भाजप विरोधी म्हणून गणला जात आहे.त्यामुळे त्याचा फायदा त्यांनी होऊ शकतो पण एम.आय.एम.चे खा.असुद्दिन ओवेसी यांनी महाआघाडीने जागा वाटपात त्यांना योग्य सन्मान न दिल्याने त्यांनी आजच दंडाच्या बेटकुळ्या फुगवून स्वतंत्र लढण्याची तयारी चालवली आहे.त्यामुळे त्या मतदारांवर त्यांची मदार असेल तर तीही धोक्यात आहे.त्यामुळे या संधीचा फायदा ऊबाठा शिवसेनेने न उचलला तर नवल.त्यांनी तात्काळ जवळपास २५-३० गाड्यांचा ताफा आणि १२५-१५० पदाधिकारी आणि कार्यकर्ते घेऊन थेट मातोश्री गाठली होती व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे.खा.देसाई,खा.संजय राऊत,राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदींची गुरूवार दि.२४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता भेट घेतली आहे.त्यात त्यांनी या बाबी उघड केल्याची विश्वसनीय बातमी आहे.त्यामुळे संदीप वर्पे यांच्या उमेदवारीवर टांगती तलवार लटकली आहे ते त्याचा सामना कसा करणार याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून आहे.

  

दरम्यान भाजप निष्ठावान असलेल्या विजय वहाडणे यांच्या गोटात अद्याप स्मशान शांतता दिसत असून त्यांची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही तरीही एका माहितीनुसार ते आपले नामनिर्देशन भरू शकतील अशी माहिती आहे.

   या उलट नगर शहर शिवसेनेनंतर कोपरगाव तालुक्यात शिवसेना राजकीयदृष्ट्या बलाढ्य मानली जाते शिवसेनेकडे संघटना मजबूत असून त्यांना आजपर्यंत वरिष्ठ नेत्यांनी त्यांना ज्यांच्या विरुध्द लढले त्या साखर आणि सहकार सम्राटांचे पायतान उचलण्यास भाग पाडल्याच्या दुर्दैवी घटना वारंवार घडल्या आहेत.सन-२००२ साली शिवसेनेने या पूर्वी राजेंद्र झावरे यांच्या रूपाने नगराध्यक्ष दिला आहे.विशेष म्हणजे त्यांनी धडाडीने काम केले आहे.मात्र त्यानंतर शिवसेनेने शिर्डी लोकसभेसाठी चार वेळा खासदार दिला आहे.कोपरगाव विधानसभेसाठी दोन वेळा आमदार दिला आहे.अनेक वेळा दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली आहे.बाजार समिती,पंचायत समिती,जिल्हा परिषद आदी ठिकाणी आपले अस्तित्व दाखवले आहे.मात्र त्या तुलनेत येथील पदाधिकाऱ्यांना सेनेने न्याय दिलेला नाही हे विशेष.या वेळी कट्टर विरोधक व वर्तमानात भाजप मध्ये असलेले माजी आ.स्नेहलता कोल्हे यांना व त्यांच्या युवराजांना कोणत्याही कारणाने असो भाजपने उमेदवारी नाकारली आहे.त्यामुळे नैसर्गिकरीत्या सेनेचा उमेदवारीसाठी मोठा अधिकार आहे.मात्र त्या पातळीवर सेनेचे पदाधिकारी झोपलेले होते हे विशेष ! भाजपने जेंव्हा माजी आ.कोल्हे यांना थांबवले त्यावेळी ही मंडळी जागी झाली असल्याचे दिसून आले आहे.या पूर्वी आमच्या प्रतिनिधीने कोपरगावच्या राजकीय अवकाशात मोठी पोकळी निर्माण झाली असल्याचे व ‘गुलामीच्या साखळ्या तोडण्याची वेळ ‘ असल्याचे म्हटले होते.पन्नास वर्षांच्या कालखंडात पहिल्यांदा अशी संधी त्यांना प्राप्त झाली आहे.आणि नेमक्या त्याच वेळी ही अवखळ मंडळी शितनिद्रेत गेलेली दिसून आली आहे.त्यामुळे सर्व घोळ झाला आहे.त्याला कारण अथवा दोष सर्वस्वी त्यांना देता येणार नाही त्यासाठी पक्षीय धोरण कारणीभूत आहे.ज्याज्या वेळी पक्षाकडे यांनी उमेदवारी मागितली त्या त्या वेळी पक्षांच्या संपर्क नेत्यांनी अथवा वरिष्ठ नेत्यांनी त्यांना डावलले आहे.ऐनवेळी पक्षात केवळ तिकिटासाठी आलेले साखर सम्राट यांना लाल गालिचा अंथरूण त्यांचे केवळ अर्थकारणासाठी स्वागत केले असल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे त्यांची अवस्था,’न घर का,ना घटका’ अशी केली होती व आजही आहे.त्यात तसूभरही फरक पडलेला नाही.त्यामुळे आयुष्यभर ज्यांच्या विरुध्द रान उठवले,संघर्ष केला,कारागृह सोसून सामान्य जनतेला न्याय दिला,त्यांच्या सतरंज्या उचलण्याचे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी व पक्षांने सोपवले होते.त्याईतके शिवसेनेच्या भाळी कोणतेही मोठे दुर्दैव नाही.त्यामुळे सत्तेची आयतीच संधी साखर सम्राटांना मिळाली होती.त्यांनी वरही वरिष्ठ नेत्यांना पक्षनिधीच्या नावाखाली पॅकेज द्यायचे आणि खालच्या लोकांना गळाला लावायचे षडयंत्र आखून त्यांची अंमलबजावणी केली होती.त्यामुळे शिवसेनेचा भाजप व्हायला वेळ लागला नाही.मध्यंतरी तर मासिक टोल चालू करून मध्येच बंद करून त्यांना तोंडघशी पाडले असल्याच्या बातम्या आहेत.याला वरिष्ठ नेते आणि पक्ष जबाबदार आहे.मात्र आता पुन्हा एकदा सेनेस उभारी घेण्याची वेळ आली आहे.यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे एका नावावर एकमत झाले आहे हे विशेष ते नाव म्हणजे माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे.त्यामुळे आता सेनेला एक संधी पुन्हा एकदा प्रारब्धाने दिली आहे.तिचे संधीत रूपांतर कसे करायचे हे सर्वस्वी त्यांच्यावर आणि त्यांच्या नेत्यावर अवलंबून आहे.झावरे या नावाला शिंदे सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांचे समर्थन असल्याची बातमी आहे.शिवाय सर्वच त्यावर मदत करण्यास एकमत झाले असल्याने ऊबाठा सेनेची मोठी संधी वाढली असल्याचे बोलले जात आहे.दरम्यान या उलाढालीत झावरे यांना राष्ट्रवादीतून लढण्याची क्लृप्ती एका कार्यकर्त्याने दिली होती.मात्र त्यास वरिष्ठ नेत्यांनी विरोध केला असून त्यासाठी त्यांनी एक लघु कथा सांगून,’अमेरिकेतून आपण लढावू विमाने आयात करतो पण वैमानिक नाही” असे सांगून त्यास विरोध केल्याची माहिती आहे.मुंबई दौऱ्यावर गेलेल्या शिष्टमंडळास आश्र्वासित केले आहे.त्यामुळे सेनेत चैतन्य निर्माण झाले असल्याच्या बातम्या आहेत.आगामी ४८ तासात कोपरगाव विधानसभेचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

शिवसेनेने शिर्डी लोकसभेसाठी चार वेळा खासदार दिला आहे.कोपरगाव विधानसभेसाठी दोन वेळा आमदार दिला आहे.अनेक वेळा दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली आहे.बाजार समिती,पंचायत समिती,जिल्हा परिषद आदी ठिकाणी आपले अस्तित्व दाखवले आहे.मात्र त्या तुलनेत येथील पदाधिकाऱ्यांना सेनेने न्याय दिलेला नाही हे विशेष.

   दरम्यान दुसरीकडे मराठा आंदोलक उमेदवारीसाठी अंतरवलित पायधूळ झाडत असून त्यांच्यातील काही जणांनी गुडघ्याला बाशिंग बांधून स्वतःचा आपल्या उमेदवारी जाहीर केल्या होत्या.मात्र नवीन माहितीनुसार यात ऍड.योगेश खालकर,बाळासाहेब जाधव,राजेंद्र कोल्हे,विनय भगत,विजय वडांगळे असे काही जण उच्छुक असल्याची माहिती असून उद्या यातील काही जणांचे अर्ज माघार घेण्याच्या बोलीवर दाखल होऊ शकत असल्याची माहिती आहे.तर अपक्ष म्हणून याधीच आ.काळे यांचेवर नाराज शिंदे सेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन औताडे हेही आपली उमेदवारी दाखल करणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे.त्यामुळे आगामी दोन दिवस कोपरगावच्या राजकीय अवकाशात रंगत वाढविणारे ठरणार आहे.

संदीप वर्पे यांच्या उमेदवारीने आ.आशुतोष काळे यांची लढाई सोपी केली हे सांगण्यास कोण ज्योतिषाची गरज उरलेली नाही.त्यांचे नामनिर्देशन सादर करताना दिनांक २५ ऑक्टोबर रोजी झालेली गर्दी आणि शहरातील प्रमुख मान्यवरांची उपस्थिती बरीच बोलकी आहे.फक्त मताधिक्य किती एवढाच तो प्रश्न उरला आहे.

   दरम्यान दुसरीकडे माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांनी आपली ओळख प्रस्थापित काळे कोल्हे यांचे कट्टर विरोधक अशी केली असून आपले नामनिर्देशन दाखल करून त्यातून त्यांनी आपला,’बिन पैशाचा उमेदवार ‘असा प्रचार सुरू केला असून रान पेटविण्यासाठी सुरुवात केली आहे.त्यामुळे कोपरगाव मतदार संघातील मतदार यातील कोणाला आपलेसे करणार हे आगामी काळच ठरवणार आहे.

   दरम्यान भाजप निष्ठावान असलेल्या विजय वहाडणे यांच्या गोटात अद्याप स्मशान शांतता दिसत असून त्यांची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही तरीही एका माहितीनुसार ते आपले नामनिर्देशन भरू शकतील अशी माहिती आहे.मात्र दोन दिवसात त्यांची दिशा समजणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close