गुन्हे विषयक
विविध दोन गुन्ह्यात १.५५ लाखांचा ऐवज जप्त,गुन्हे दाखल
न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात एकीकडे गावठी कट्टा सापडला असताना दुसरीकडे विविध दोन चोऱ्यांत ०१ लाख ५५ हजारांचा चोरट्यांनी डल्ला मारला असून एका चोरीत महीलेचा गळा दाबून सुमारे ८० हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या साखळ्या लंपास केल्या असून दुसऱ्या घटनेत बस मधून प्रवास करताना महिलेच्या गळ्यातील ७५ हजारांची पोत गायब केल्याने खळबळ उडाली आहे.या प्रकरणी ब्रिजलाल नगर येथील शिवनाथ विश्वनाथ लोंगानी (वय-४३) व सूरेगाव येथील मंदाकिनी आबासाहेब रहाणे (वय-५३) यांच्या बॅग मधील सोन्याची पोत गायब केली आहे.या प्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहे.त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
वर्तमानात विधानसभा निवडणुका संपन्न होत आहे.राजकीय पक्ष आणि प्रशासन त्यात गर्क असताना चोरट्यांनी आपली कला दाखविण्यास सुरुवात केली आहे.त्यामुळे आधीच कायदा सुव्यवस्था धोक्यात आली असताना तालुका आणि शहर पोलिसांची दोकेदुखित वाढ झाली आहे.अशीच घटना आज उघड झाली असून पहिल्या घटनेत ब्रिजलाल नगर येथील रहिवासी शिवनाथ लोंगाणी हे आपल्या घरी झोपी गेलेले असताना चार अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश केला होता व त्यांना अज्ञात लोखंडी हत्याराने त्यांना धमकावले होते.त्यात त्यांनी फिर्यादी इसम लोंगाणी यांच्या पत्नीचा गळा दाबून तर त्यांच्या आईच्या गळ्यातील सोन्याची साखळी चोरून नेली आहे.त्यात ५५ हजारांची ११ ग्रॅम वजनाची व दुसरी ०५ ग्रॅम वजनाची अशा दोन सोन्याच्या पोती लंपास केल्या आहेत.या प्रकरणी त्यांनी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
तर दुसऱ्या घटनेत सुरेगाव येथील फिर्यादी महिला मंदाकिनी रहाणे या दुपारी तीनच्या सुमारास येवला ते कोपरगाव बस ने प्रवास करत असताना त्यांच्या बॅग मधून अज्ञात चोरट्याने त्यांची१५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत चोरून नेली आहे.
या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक-493 व 494/2024 भारतीय न्याय संहिता सन-2023 चे कलम 305(क) व 311प्रमाणे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी शिर्डी पोलिस अधिकारी किशोर वमने व पोलिस निरीक्षक भगवान मथुरे,सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार,पो.हे.को.आर.पी.पुंड यांनी भेट दिली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक पवार, पो.हे.कॉ.आर.पी.पुंड आदी करीत आहेत.