निवडणूक
वाहनावरील बोध चिन्हाबाबत जिल्हाधिकाऱ्यांचा…हा आदेश !
न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
भारत निवडणूक आयोगाने सार्वत्रिक विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी निवडणूक कालावधीत खाजगी वाहनावर सक्षम प्राधिकारणाच्या पूर्वपरवानगीशिवाय पक्षाचे बोधचिन्ह लावण्यास निर्बंधाचे आदेश दिले आहेत.
अहील्यानगर जिल्ह्यात सक्षम प्राधिकरणाच्या पूर्वपरवानगी शिवाय ऑटोरिक्षा,टेम्पो,मोटार सायकल व इतर खाजगी वाहनांवर पक्षाचे बोधचिन्ह,झेंडे व इतर घोषवाक्य लिहीणे इत्यादींवर या आदेशान्वये निर्बंध घालण्यात आले आहेत.आदेशाचा भंग करण्याऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३ प्रमाणे कारवाई केली जाईल,तसेच हे आदेश २५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत जिल्ह्यात लागू राहतील,असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.