शैक्षणिक
…या ठिकाणी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र सुरू !

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील आत्मा मालिक ध्यानपीठ व आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुला अंतर्गत एप्रिल 2024 मध्ये आत्मा मालिक भरतीपुर्व प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे.

सदर भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राच्या सहा महिन्यांच्या कालावधीत 09 विद्यार्थी भारतीय थलसेनेत व नौसेनेत, 01 विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत अन्न पुरवठा निरीक्षक पदावर, 01 विद्यार्थी यूपीएससी पूर्व परीक्षा उत्तीर्ण व 13 विद्यार्थी यांची महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अंतर्गत निवड झाली आहे.थोड्या कालावधीत मिळालेल्या यशाच्या जोरावर आत्मा मालिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र अंतर्गत संस्थेचे अध्यक्ष माजी उपजिल्हाधिकारी नंदकुमार सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून कमवा व शिका योजना सुरू करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना एकाच छताखाली शिक्षण,प्रशिक्षण व रोजगार उपलब्ध देण्यात करून देण्याच्या उद्देशाने तसेच त्या विद्यार्थ्यांचे भारतीय सेनेत,महाराष्ट्र पोलीस दलात तसेच इतर प्रशासकीय सेवेत जाण्याच्या प्रयत्नांना चालना देण्यासाठी सदर कमवा व शिका योजना सुरू करण्यात येणार आहे.
सदर योजनेअंतर्गत दिनांक 22 ते 25 ऑक्टोबर 2024 दरम्यान गरजू विद्यार्थ्यांना आत्मा मालिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राच्या संकेतस्थळावर किंवा आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलात समक्ष येऊन किंवा जाहिरात प्रत्राकावर दिलेल्या संपर्क क्रमांकार फोन करून रजिस्ट्रेशन करून मात्र 200 रु फी शुल्क भरून भरती प्रक्रियेसाठी आपला सहभाग नोंदवता येईल.सदर भरती पूर्व प्रशिक्षण केंद्रात कमवा व शिका योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यात इच्छुक असल्यास सदर विद्यार्थी हे दिलेल्या तारखेला आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलातील ॲथलेटिक्स ग्राउंड वर मैदानी चाचणी व लेखी परीक्षेसाठी उपस्थित राहतील.
सदर मैदानी चाचणी अंतर्गत विद्यार्थ्यांना 1600 मीटर रनिंग,100 मीटर रनिंग व गोळा फेक या मैदानी चाचणी पात्र करून निवड प्रक्रियेत आलेल्या विद्यार्थ्यांची 100 गुणांची लेखी परिक्षा सरळ सेवेअंतर्गत अभ्यासक्रमानुसार घेण्यात येईल.सदर दोन्ही मैदानी व लेखी चाचणी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची पारदर्शक पद्धतीने गुणवत्ता यादी प्रसिद्ध करून त्या अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना आत्मा मालिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रा अंतर्गत कमवा व शिका योजनेसाठी एकाच छताखाली शिक्षण,प्रशिक्षण व रोजगार उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने प्रशिक्षण दिले जाईल.
सदर कमवा व शिका योजने अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थाना आत्मा मालिक ध्यान पीठ अंतर्गत मोफत प्रशिक्षणाच्या बदल्यात आठवड्यातून एक दिवस किंवा 03 दिवस सेवा द्यायची आहे. ज्या विद्यार्थाना पूर्ण मोफत प्रशिक्षण हवे आहे.त्यांनी आठवड्यातून तीन दिवस सेवा द्यायची आहे व ज्या विध्यार्थाना एक दिवस सेवा द्यायची आहे. त्यांच्यासाठी मात्र 3000 (तीन हजार रुपये ) फी शुल्क आकारण्यात येणार आहे.
आत्मा मालिक कमवा व शिका योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील हुशार व गरजू विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य प्रशासनातील विविध भरती प्रक्रिया तसेच आर्मी,नेव्ही,एअर फोर्स व इतर प्रशासकीय भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने शारीरिक व शैक्षणिक प्रशिक्षण दिले जाईल तसेच आत्मा मलिक भरतीपूर्वक केंद्र व आत्मा मलिक करिअर अकॅडमी अंतर्गत सरळ सेवा व एमपीएससी परीक्षेच्या संदर्भात देखील मार्गर्दर्शन करून तयारी करून घेतली जाईल.
आत्मा मालिक सिव्हिल व मेंटेनन्स विभागाअंतर्गत विविध तांत्रिक कौशल्य,सॉफ्ट स्किल्स व लाईफ स्किल्स याबाबत देखील प्रशिक्षण देण्यात येणार असून त्या अनुषंगाने प्रशिक्षणार्थी विद्यार्थी यांना प्रशिक्षणाबरोबरच वेल्डर,कारपेंटर,प्लंबिंग,इलेक्ट्रिशियन, टेलर,लाईफ गार्ड,लाईफ सेवर व इतर कौशल्य अंतर्गत देखील तयारी करून प्राविण्य हस्तगत करण्यासंदर्भात तयारी करून घेतली जाणार आहे.