जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

नगर जिल्ह्यात…या नेत्यांची,’तुतारी’ झाली आता पक्की !

न्युजसेवा

कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
  
   महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची प्रतीक्षा संपत आली आहे.लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत चांगलं यश मिळालं,पण अलिकडच्या काळात लाडकी बहीण आणि अन्य शेतीसह अनेक योजना आणत महायुतीही आक्रमकपणे विधानसभेच्या तयारीला लागलेली दिसून आली असताना कोपरगाव तालुक्यातील  युवा नेते विवेक कोल्हे यांनी पुण्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन आपला प्रवेश निश्चित केला असल्याचे मानले जात असून आगामी काळात पक्ष प्रवेश,मुलाखती आणि थेट निवडणूक तिकीट असा प्रवास निश्चित झाला असल्याची माहिती हाती आली आहे.त्यामुळे आ.आशुतोष काळे गटास हा धक्का मानला जात आहे.

  

दरम्यान या सन -2014 पूर्वी पूर्वी माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे व बिपिन कोल्हे हे राष्ट्रवादीत असताना त्यांना सर्वाधिक त्रास वर्तमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा झाला होता.त्यांनी आता भाजपचे बोट धरल्याने कोल्हे कुटुंबाचा रस्ता सुकर झाला असल्याचे मानले जात आहे.

   आगामी विधानसभा तोंडावर आली असून या निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे.अशातच महायुतीतील अनेक नेते शरद पवारांच्या पक्षात येणार असल्याच्या चर्चा गत तीन महिन्यापासून सुरू आहेत.नगर जिल्ह्यात शरद पवार मोठा राजकीय भूकंप करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. भाजपचा युवा नेता तुतारी हाती घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.या बाबत आमच्या,’न्युजसेवा’ पोर्टलने सर्व प्रथम बातमी छापली होती हे अनेकांच्या स्मरणात असेल.या दरम्यान 27 ऑगस्ट रोजी भाजप नेते विवेक कोल्हे यांनी शरद पवारांची भेट घेतल्याची व त्यांनी शरद पवार यांच्या गाडीतून प्रवास केल्याची माहिती समोर आली होती.त्यांचा कोपरगाव शहर आणि तालुक्यातील मुस्लिम मतांवर डोळा आहे.त्यामुळे ही मते त्यांना झोप येऊ देत नसल्याची बातमी आहे.त्यामुळे ते भाजपला बाय-बाय करणार हे उघड आहे.त्यामुळे भाजपचे माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी त्यांच्यावर प्रखर टीका करून त्यांची हकालपट्टी करावी अशी रास्त मागणी केली होती व त्यांनी माजी महसूलमंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचेशी गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आघाडी करून आपल्या आगामी राजकीय प्रवासाची दिशा स्पष्ट केली होती.त्यानंतर लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपचे माजी खा.सुजय विखे यांच्या विरोधात दंड थोपटले होते.त्यानंतर त्यांनी विधानपरिषद शिक्षक मतदार संघात भाजपच्या विरुध्द जाऊन अपक्ष निवडणूक लढवून काँग्रेसची मदत मिळवली होती हे झाकून राहिले नाही.आता भाजप महायुतीत आपली उमेदवारीची डाळ शिजणार नाही हे जवळपास स्पष्ट झाल्याने त्यांनी आपल्या राजकीय उलथापालथीस सुरुवात केली आहे हे उघड आहे.

   आता आचारसंहिता लागण्यास काही दिवसांचा अवधी बाकी असताना त्यांची पावले आता आपल्या ध्येय्याकडे वळली आहे आणि त्यांनी शरद पवार यांना गाठले आहे.आता अर्थातच निवडणुकीचा उलाढालीचा अंतिम कालखंड आला असून इडी,सी.बी.आय.आदी संस्थाची इडापिडा व ससेमिरा लागणार नाही याची खात्री करून त्यांनी धाडस केले आहे.
   सदर बैठकीत त्यांना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी हिरवा कंदील दाखवला असल्याची माहिती हाती आली आहे.एक दोन दिवसात याची अधिकृत घोषणा होऊ शकते.आधीच जिल्हा अध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी त्याचे सूतोवाच केले आहे ते बरोबर असून विवेक कोल्हे यांनी गुरुवार दिनांक 03 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पुण्याकडे प्रस्थान केले होते.आणि काल सकाळी त्यांनी पुण्यात ही भेट घेतली असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.त्यामुळे भाजपचा काडीमोडाची अधिकृत घोषणा केवळ बाकी असल्याचे मानले जात आहे.त्यामुळे आता विद्यमान आ.आशुतोष काळे यांनी शहरातील आणि तालुक्यातील अल्पसंख्याक समाजाला जी सेवा रुजू केली तिचे सर्व मुसळ केरात जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

   दरम्यान या पूर्वी माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे व बिपिन कोल्हे हे राष्ट्रवादीत असताना त्यांना सर्वाधिक त्रास वर्तमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा झाला होता.त्यांनी आता  भाजपचे बोट धरल्याने कोल्हे कुटुंबाचा रस्ता सुकर झाला असल्याचे मानले जात आहे.

   दरम्यान याआधी कोपरगाव राष्ट्रवादीत प्रवक्ते संदीप वर्पे,अड.दिलीप लासुरे आदी मंडळी आधीच विधानसभा निवडणुकीचे उमेदवारीसाठी गळ टाकून बसलेले असताना त्यांना हा अधिकचा आहेर पक्षात येणार असल्याचे ही मंडळी नेमकी काय भूमिका घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.कारण या पूर्वी याच पक्षात असताना संदीप वर्पे यांची पक्षात प्रदेश सचिव म्हणून निवड झाल्यावर ती ईशान्य गडावरील नेत्यांच्या पचनी पडली नव्हती.त्यांना चोवीस तासाच्या आत ‘बॅनर’ची शाई वाळण्याच्या आत ते काढून घेण्याची नामुष्की ओढवली होती.तरीही त्याच्या पाठीशी मोठ्या मतदानाचा टक्का नसल्याने त्यांना ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा जो आदेश असेल तोच पाळावा लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.मात्र त्यांच्यासाठी ते अरण्यरुदन ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close