जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

…या उपनगरातील कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

  कोपरगाव शहरातील उपनगर असलेल्या खडकी    येथील अनेक महिलांनी आ.आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. त्या सर्व महिला भाजप कोल्हे गटाच्या मानल्या जात आहे.

“आम्ही जे स्वप्न पाहिले होते ते स्वप्न आ.काळे यांनी सत्यात उतरवून दाखविले आहे.ज्याच्याशिवाय महिला भगिनींची कोणतीच कामे होवू शकत नाही तो पाणी प्रश्न सुटला आहे व कोपरगाव शहराचा देखील विकास झाल्यामुळे आमच्याकडे जे नातेवाईक यायचे बंद झाले होते ते आता पुन्हा येणार आहेत”-पक्षांतरित महिला.

   लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्यानंतर,भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.त्यासाठी राज्यांमधील मतदार याद्या अद्ययावत करण्याचा कार्यक्रम घोषीत केलेला आहे.भारत निवडणूक आयोगाने  1 जुलै 2024  नुसार राज्यात मतदारयाद्यांचा “विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम (दुसरा)” राबविला आहे. त्यानुसार हा कार्यक्रम राज्यभरात 25 जूलै ते 20 ऑगस्ट 2024 या कालावधीत राबवण्यात आला आहे.आता आगामी काही दिवसात निवडणूक जाहीर होऊ शकत असल्याने जिल्ह्यात व राज्यात पक्षातरे होत आहे.कोपरगाव तालुक्यात याचा महापूर आला आहे.शहरात याचा अनुभव आला आहे.खडकी उपनगरातील महिलांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात नुकताच गौतम बँकेच्या परिसरात प्रवेश केला आहे.त्यात मूळे आ.काळे गटात आनंदाचे वातावरण आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

सदर प्रसंगी आ.आशुतोष काळे यांनी सर्वांचे स्वागत करून शुभेच्छा देतांना ते म्हणाले की,”ज्या विश्वासाने जनतेने माझ्यावर विश्वास दाखविला त्या विश्वासाला सार्थ ठरवून मतदार संघासह कोपरगाव शहराचा देखील विकास करून दाखविला आहे.नागरिकांना विकास अपेक्षित असतो.त्यामुळे त्या विकासाच्या अपेक्षा पूर्ण करणे हि लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी पार पाडतांना पाणी प्रश्न सोडविण्याच्या दिलेल्या वचनांची पूर्तता करून तो प्रश्न सोडविला आहे.त्यामुळे असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची वाट धरली आहे याचा विशेष आनंद होत असून त्यामुळे विकास कामे करतांना अधिकची उर्जा प्राप्त होणार आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या कोल्हे गटाच्या कार्यकर्त्यांनी विशेषत: महिलांनी सांगितले की,”आम्ही जे स्वप्न पाहिले होते ते स्वप्न आ.काळे यांनी सत्यात उतरवून दाखविले आहे.ज्याच्याशिवाय महिला भगिनींची कोणतीच कामे होवू शकत नाही तो पाणी प्रश्न सुटला आहे व कोपरगाव शहराचा देखील विकास झाल्यामुळे आमच्याकडे जे नातेवाईक यायचे बंद झाले होते ते आता पुन्हा येणार आहेत.त्यामुळे कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न किती महत्वाचा होता याचे महत्व आम्हाला आहे.त्यामुळे आम्ही स्वखुशीने आ.आशुतोष काळे यांना पुन्हा आमदार करण्यासाठी राष्ट्रावादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close