कोपरगाव तालुका
…या पोलिस ठाण्यात शांतता समितीची बैठक संपन्न !
न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी )
आगामी काळात येणारे गणेशोत्सव आणि ईद -ए मिलाद आदी हिंदू-मुस्लिम सण येत असून त्या पर्वात कोपरगाव तालुक्यात शांतता नांदावी या साठी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांनी सर्वधर्मीय शांतता समितीची बैठक बोलावली होती.सदर बैठक मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.
वर्तमानात बांगलादेश मधील हिंदुंवर होत असलेल्या अन्यायाच्या विरुद्ध व विविध ठिकाणी अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराबाबत भारतभर संतप्त वातावरण निर्माण झालेले आहे.त्यातच सरला बेटाचे महंत रामगिरीजी महाराज यांनी सिन्नर तालुक्यातील पंचाळे येथे वादग्रस्त विधान केलं असा आरोपआहे.त्यावरून दोन समाजात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.अनेक ठिकाणी रामगिरिजी महाराज यांचे विरुद्ध गुन्हे दाखल झालेले आहे.तर धोत्रे येथे सदर गुन्हे मागे घ्यावे म्हणून कोपरगावसह तीन दिवसापूर्वी हिंदू समाजाने ‘हिंदू आक्रोश मोर्चाचे’ आयोजन केले होते.त्यासाठी कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील सर्व गावात मोठ्या प्रमाणावर बंद पाळण्यात आला होता.अद्यापही हिंदुत्ववादी संघटना आक्रमक असल्याचे दिसून आहे.त्यातच दोन दिवसापूर्वी तीन वाजेच्या सुमारास भोजडे हद्दीत भोजडे चौकी येथे दोन संशयित बिहारी मौलाना संशयास्पद स्थितीत फिरताना आढळुन आले आहे.त्यांना दोन अज्ञात इसमांनी बेदम मारहाण केली असल्याची बातमी आहे.त्यामुळे समाजात शांतता अबाधित राहावी यासाठी पोलिसांसह समाजातील विविध समाजातील ज्येष्ठ मान्यवरांची मोठी निर्णायक भूमिका राहत आली आहे.आगामी काळात गणेशोत्सव व ईद-ए-मीलाद आदी सण आले आहे.त्यामुळे आगामी काळ इतर वेळेपेक्षा आव्हानात्मक असल्याचे मानले जात आहे.या पार्श्वभूमीवर कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांनी शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन केले होते.
सदर प्रसंगी कोळपेवाडी येथील सरपंच सूर्यभान बबन कोळपे,कोपरगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती वाल्मिक कोळपे,पोलिस उपनिरीक्षक वैशाली मुकणे,कोळगाव थडी येथील सरपंच सुनील चव्हाण,मौलाना रिजवान सय्यद,मौलाना आदिल शाहजापूर,विलास एकनाथ वाबळे,शकील गुलाब पटेल,दिलीप गोरे,पुंजाजी राऊत,वसंत आभाळे,मढी,सिद्धार्थ मेहरखाम यांचेसह कोळपेवाडी दुरक्षेत्र हद्दीतील सर्व गावातील श्री गणेश मंडळांचे अध्यक्ष,हिंदू-मुस्लीम समाजातील प्रतिष्ठीत नागरीक व पोलीस पाटील व बीट अंमलदार बहुसंख्येने उपस्थित होते.
सदर प्रसंगी पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांनी मार्गदर्शन करताना म्हटले आहे की,”सर्वांनी जातीय सलोखा राखणेबाबत मदत करण्याचे आवाहन करून,धार्मिक,जातीय तेढ निर्माण होणार नाही दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.या शिवाय सामाजिक संकेतस्थळाचे माध्यमातुन धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन करून तरुणांनी गावात आक्षेपार्ह बॅनर,देखावे तयार होणार नाही याची काळजी घ्यावी,कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार बाबत सुचना देवुन गणेशोत्सव व ईद- ए-मिलाद सण उत्सव शांततेत साजरा करणे बाबत मार्गदर्शन केले आहे.
दरम्यान आगामी काळात,”एक गाव एक गणपती’ बसवण्याबाबत ग्रामस्थांना आवाहन केलं आहे.त्यासाठी सर्व गणेश मंडळाना ऑनलाईन परवानगी अर्ज भरून परवानगी घेणे बाबत सूचना दिल्या व परवानगी घेण्याचे आवाहन केले आहे.
सदर बैठकीचे प्रास्ताविक पोलिस उपनिरीक्षक महेश कुसारे यांनी केले आहे.तर उपस्थितांचे आभार पो.हे. कॉ.संदीप बोटे यांनी मानले आहे.