दळणवळण
झगडे फाटा-वडगाव फाटा रस्त्याबाबत लक्ष घालणार-…या मंत्र्यांचे आश्वासन!
न्युजसेवा
कोपरगाव –
उत्तर भारतीयांना दक्षिण भारत व पुण्यास जाण्यास सर्वात जवळचा ठरणारा झगडे फाटा ते वडगाव पान या रस्त्याची दयनीय अवस्था दूर करण्यासाठी शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी नुकतीच केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट घेतली असून या मार्गाकडे लक्ष वेधून घेतले असून सदर मार्ग राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरीत करण्याची महत्वपूर्ण मागणी केली आहे.त्यामुळे जवळके, धोंडेवाडी,वेस-सोयगाव,बहादरपुर,अंजनापुर,तळेगाव दिघे आदी गावातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या रस्त्यांच्या कामाबाबत कोटींची उड्डाणे दिसत असली तरी वास्तव हे आहे की या रस्त्यांचा रस्ता निकृष्ट असून त्यांची वाट लागली आहे.त्या रस्त्याची दुरुस्ती करणे गरजेचं आहे.मात्र म्हणावा असा निधी मिळत नाही व तालुक्यातील रस्ते मात्र सुरळीत होत नाही हि तालुक्याची शोकांतिका आहे.नजीकच्या तालुक्यातील रस्ते मात्र मोठ्या प्रमाणावर चकाकताना दिसत आहे.त्यात मराठवाड्यातील तुलनेने मागास असलेल्या वैजापूर तालुका आणि येवला तालुका वरचढ ठरताना दिसत आहे.शेजारी संगमनेर,सिन्नर,निफाड तालुक्यातील कोणतेही रस्ते नादुरुस्त असल्याचे दिसत नाही.मात्र राजकारणात भलत्याच पुढारलेल्या अ.नगर जिल्ह्यातील प्रवेश केला की वाहतूकदारांना नगर जिल्ह्यात आल्याची चाहूल लागते ती मोठमोठ्या खड्डयांनी.त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांच्या तोंडी नेते आणि प्रशासन यांना देण्यासाठी शेलकी विशेषणे न आली तर नवल.अशीच अवस्था माजी नगराध्यक्ष वहाडणे यांच्या कार्यकाळापूर्वी कोपरगाव शहरातील रस्त्यांची होती.आता तीच अवस्था नगर-मनमाड रस्ता असो की तळेगाव मार्गे संगमनेर रस्ता असो की पढेगाव मार्गे वैजापूर,कोपरगाव-कोळपेवाडी रस्ता असो.त्या मुळे प्रवासी आणि प्रवासी वहांनासह अवजड वाहनचालक त्रस्त असल्याचे वारंवार दिसून येत आहे.मात्र त्यावर उतारा शोधायला कोणालाही वेळ असल्याचे दिसत नाही.गत उन्हाळ्यात दहा कोटी रुपये रस्त्याच्या कामावर खर्च होऊनही राज्य मार्ग क्रं.65 या रस्त्याची एका पावसाळ्यात वाट लागली आहे.झगडे फाटा,अंजनापूर,रांजणगाव देशमुख आदी शिवारात अद्याप या रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही तर झगडे फाटा ते जवळके हद्दी पर्यंत तो काम होऊनही उखडला आहे.मोठ्या प्रमाणावर खचला आहे.मात्र याबाबत शिर्डीचे नवोदित खा.भाऊसाहेब वाकचौरे यांचे नुकतेच जवळके जनमंगल ग्रामविकास संस्थेने लोकसभा निवडणुकीपूर्वी लक्ष वेधून घेतले ल्या या रस्त्याची गंभीर दखल घेतली असल्याचे लक्षात आले आहे.त्यांनी याबाबत नुकतीच केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांचे त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेऊन लक्ष वेधून घेतले आहे.व सदर रस्ता राष्ट्रीय महामार्गात रूपांतरित करण्याची मागणी केली आहे.त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.आता मंत्री यावर काय भूमिका घेणार याकडे या भागातील ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.
दरम्यान सावळीविहीर फाटा-येवला नाका (एन.एच.752 जी) रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आपल्या स्तरावर सूचना कराव्यात अशी विनंती नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.