आंदोलन
महंत रामगिरींचे समर्थनार्थ…या गावात मोठा मोर्चा !
न्युजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
श्रीरामपूर तालुक्यातील सरला बेटाचे महंत रामगिरीजी महाराज यांनी श्री क्षेत्र पांचाळे येथील अखंड हरिनाम सप्ताहात वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्याचे पडसाद धोत्रे येथे उमटले होते त्यानंतर वारकरी संप्रदायाने नुकतेच त्या ठिकाणी हजारोंच्या संख्येने एकत्र येत ह.भ.प.परशुराम अनर्थे यांचे नेतृत्वाखाली,’जनआक्रोश मोर्चा’ आयोजित करत आपले शक्ती प्रदर्शन करून महंत रामगिरीजी महाराज यांचे वरील गुन्हे मागे घेण्याचा इशारा असामाजिक तत्वांना इशारा दिला आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील सरला बेटाचे महंत रामगिरीजी महाराज यांनी सिन्नर तालुक्यातील श्री क्षेत्र पांचाळे येथील अखंड हरिनाम सप्ताहात वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप आहे.मोहंमद पैगंबर यांच्यासंबंधी आक्षेपार्ह विधान केल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला होता त्यानंतर मुस्लिम समाजातील काही नागरिकांनी त्याचा एकत्र येत निषेध व्यक्त केला होता तर श्रीरामपूर राहाता,वैजापूर,छत्रपती संभाजीनगर आदी ठिकाणी त्यांचे विरुद्ध पोलिस ठाण्यात दबाव आणून गुन्हे दाखल झाल्याने वारकरी समाजात त्याचे तीव्र प्रडसाद उमटले होते.
दरम्यान कोपरगाव शहरात तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते आ.अमोल अमोल मिटकरी यांचे विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.त्यानी एका वृत वाहिनीवर महंत रामगिरिजी महाराज यांचेवर वादग्रस्त विधाने करत आगीत तेल ओतले होते.परिणामी त्याचे पडसाद कोपरगाव तालुक्यात महंत रामगिरिजी महाराज यांचे शिष्य वर्गात व वारकरी वर्गात न उमटले तर नवल होते.त्यातून काल सकाळी कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागतील धोत्रे ग्रामपंचायत हद्दीत तालुक्यातील वारकरी समाज ह.भ.प.परशुराम महाराज अनर्थे यांचे मार्गदर्शनाखाली एकत्र एकवटला होता.त्यांनी धोत्रे येथील असामाजिक तत्वांना इशारा दिला आहे.व वेळीच सावध होण्यास बजावले आहे.त्या ठिकाणी सामाजिक संकेतस्थळावर वादग्रस्त टिपणी केली होती.मात्र गावातील सर्वधर्मीय ज्येष्ठ नागरिकांनी सदरचा वाद सामज्यस्याने मिटवला होता.
त्यानंतर वारकऱ्यानी धोत्रे येथे एकत्र येत,”जनआक्रोश” मोर्चा काढून संबंधितांना इशारा दिला आहे.सदर ठिकाणी कोपरगाव तालुका पोलिसांनी चोख व मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला होता.त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.सदर ठिकाणी तहसिलदार महेश सावंत,पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांनी वारकरी व संत समुदायाकडून निवेदन स्वीकारले आहे.त्यानंतर सदर वारकरी आल्या ठिकाणी निघून गेले असल्याची माहिती मिळाली आहे.या निषेध मोर्चात किमान अडीच ते तीन हजार वारकरी सहभागी झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
दरम्यान गोदाधामचे महंत रामगिरिजी महराज यांचे समर्थनार्थ कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागतील ग्रामस्थांनी आपली व्यापारी आस्थापने पूर्ण दिवस बंद ठेवून आपला पाठींबा दर्शविला होता.मात्र या दिवशी कुठेही अनुचित प्रकार घडला नाही अशी माहिती कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांनी आमच्या प्रतिनिधीस दिला आहे.