गुन्हे विषयक
अल्पवयीन मुलीची छेड,पोस्को गुन्हा दाखल
न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहिवासी असलेल्या अल्पवयीन मुलगी आपल्या मैत्रिणीसह शाळेतून घरी जाताना आरोपी योगेश नवनाथ खडांगळे रा.इंदिरानगर याने काल सकाळी 11.40 वाजेच्या सुमारास इंदिरापथ मार्गावर त्यांचा पाठलाग केला व तिच्याकडे वाईट नजरेने पाहून हात केला व “मला तुझ्याशी बोलायचे आहे” असे म्हणून तिचा विनयभंग केल्याने त्याचे विरुद्ध शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत विनयभंगासह पोस्कोचा गुन्हा दाखल केल्याने कोपरगाव शहरातील अल्पवयीन मुली सुरक्षित नसल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे शहरातील पालकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
संपूर्ण देशभरातच मुली-भगिनी-महिला सुरक्षित नसल्याच्या घटना वारंवार उघड होत असून त्या विरोधात वातावरण तयार झालेले आहे.सर्वच पक्ष अशा दुर्दैवी घटनांचा आधार घेऊन राजकारण करत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे त्यावरून राज्यात रणकंदन माजले असताना कोपरगाव शहरात अशीच एक घटना उघड झाली असून यात फिर्यादी मुलगी ही शाळेत जाणारी विद्यार्थिनी आहे.ती दि.27 ऑगस्ट रोजी सकाळी 11.40 ते दुपारी 12.15 वाजता आपल्या शाळेतून घरी जात असताना आरोपी तरुण योगेश खडांगळे याने शहरातील जयहिंद सायकल मार्ट ते छत्रपती संभाजी महाराज पुतळा चौकाच्या पुढे रसराज मेडिकल जवळ या दरम्यान फिर्यादी अल्पवयीन मुलीस आरोपी याने सदर मुलगी व तिच्या मैत्रिणीचा पाठलाग केला होता व फिर्यादिकडे वाईट नजरेने पाहून हात पुढे केला होता.त्यानंतर सदर मुली या पुढे जात असताना आरोपी याने,” मला तुझ्याशी बोलायचे आहे” अशी बतावणी करून त्यांना त्रास दिला असल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे सदर अल्पवयीन मुलीने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणी शहर पोलिसांनी तत्परतेने दखल घेऊन व घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.368/2024 भारतीय दंड संहिता सन- 2023 चे कलम 78,79 सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा कलम 1912 चे कलम 12 प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान घटनास्थळी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांचेसह सहाय्यक पोलीस पोलिस निरीक्षक किशोर पवार,पोलिस उपनिरीक्षक भूषण हांडोरे आदींनी भेट दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक मथुरे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार हे करीत आहेत.