जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

…’त्या’ नराधमांना कठोर शिक्षा द्या- मागणी

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतीनिधी)

       संपूर्ण देशभरातच मुली-भगिनी-महिला सुरक्षित नसल्याच्या घटना वारंवार उघड होत असून त्या विरोधात वातावरण तयार झालेले आहे.सर्वच पक्ष अशा दुर्दैवी घटनांचा आधार घेऊन राजकारण करत असल्याचे दुर्दैवी चित्र असताना या घटनांचा प्रतिबंध करण्यासाठी शरीयत सारखी शिक्षा आवश्यक असल्याचे प्रतिपादन कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष विजय वहाडणे यांनी केली आहे.

   

‘लव्ह जिहाद’ प्रकरणात एका हिंदू मुलीला फूस लावून-जादूटोणा करून पळवून नेण्यात आले असल्याचा दावा करून या मुलीच्या बॅगमध्ये एक काळा दोरा बांधलेली अत्तराची बाटली व उर्दू-हिंदी भाषेतील मजकूर असलेली चिठ्ठीही सापडली आहे”-विजय वहाडणे,माजी अध्यक्ष,कोपरगाव नगरपरिषद.

उरण येथे एका २० वर्षीय तरुणीची अत्यंत क्रूरपणे हत्या करुन तिचा मृतदेह उरणच्या एका पेट्रोल पंपाशेजारी फेकण्यात आला होता.तिचा चेहरा आणि गुप्तांग चिरडण्यात आले होते.या प्रकणात संशयित आरोपी दाऊद शेख हा गेल्या पाच दिवसांपासून फरार होता.अखेर नवी मुंबई पोलिसांच्या पथकाने त्यास जेरबंद केले असले तरी या प्रकरणी उठलेला धुराळा खाली बसण्याचे नाव घेताना दिसत नाही.पश्चिम बंगाल मधील घटनाही अशीच लाजिरवाणी असून डॉक्टर असलेल्या विद्यार्थिनीचे दशावतार दिसत असताना त्यावर राजकारणी आपल्या पोळ्या भाजताना दिसत असून यावर समाजात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.या पार्श्वभूमीवर विजय वाहाडणे यांनी हे  प्रसिध्दी पत्रक प्रसिद्धीस दिले असून त्यात ही मागणी केली आहे.

    आपल्या प्रसिध्दी पत्रकात त्यांनी पुढे म्हंटले आहे की,” छेडछाड-बलात्कार-लव्ह जिहाद-विटंबना-खून करणाऱ्या नराधमांना कायद्याचा धाकच वाटत नसल्याने मुली व महिलांमध्ये घबराट निर्माण झालेली आहे.अशा दुर्दैवी घटनांचा बंदोबस्त करण्यासाठी,आता या लिंगपिसाट नराधमांना शरियत मधील शिक्षाच देणे योग्य ठरेल असे वाटायला लागले आहे.या गुन्ह्यात आरोपीला दगडांनी ठेचून मारणे,हातपाय व लिंग छाटून टाकणे-फाशी देणे-गोळया घालून यमसदनी पाठविणे याच शिक्षा आजतरी आवश्यक आहेत.निदान महिलांच्या सुरक्षिततेसाठी तरी-अपवाद- म्हणून शरियत मधील शिक्षाच द्या’अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.शिवाय हा शिक्षेच्या या मागणीला सर्वधर्मीय पाठिंबा देतील असे वाटत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.राजकारण्यांनी मतांचा हिशोब न करता सर्वधर्मीय महिला-मुलींच्या संरक्षणासाठी तरी कठोर कायद्याच्या अंमलबजावणीची मागणी केली पाहिजे.आज महिला अत्याचाराविरोधात कंठ फुटलेल्या पुढाऱ्यांनी ‘लव्ह जिहाद’ विरोधातही वेळोवेळी आवाज उठविला असता तर बऱ्याच मुली सुरक्षित राहिल्या असत्या.नेत्यांनो सतत मतांचे राजकारण करू नका,अन्यथा या नराधमांपासून आपल्या कुटुंबालाही धोका निर्माण होऊ शकतो याचे भान ठेवा.नराधम गुन्हेगार कुठल्याही जातीधर्माचे असोत त्यांचा नायनाट केलाच पाहिजे अशी आग्रही मागणी वहाडणे यांनी शेवटी केली आहे.

दरम्यान त्यांनी,’लव्ह जिहाद’ प्रकरणात एका हिंदू मुलीला फूस लावून-जादूटोणा करून पळवून नेण्यात आले असल्याचा दावा करून या मुलीच्या बॅगमध्ये एक काळा दोरा बांधलेली अत्तराची बाटली व उर्दू-हिंदी भाषेतील मजकूर असलेली चिठ्ठीही सापडली असल्याचा दावा केला आहे.त्यामुळे कोपरगावसह जिल्ह्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close