विशेष दिन
…या बँकेने सामाजिक उपक्रमानी केला स्वातंत्र्य दिन साजरा
न्यूजसेवा
कोपरगाव – (प्रतिनिधी)
कोपरगांव शहरातील कोपरगांव पिपल्स बँकेमध्ये सालाबाद प्रमाणे याही वर्षी १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.बँकेच्या इमारतीवर बँकेच्या व्हा. चेअरमन त्रिशाला सुनिलकुमार गंगवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे.
१५ ऑगस्ट २०२४ रोजी भारत आपला ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला आहे.हा दिवस १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटीश राजवटीपासून भारताच्या स्वातंत्र्याचे स्मरण करतो.या वर्षीच्या स्वातंत्र्य दिनाची थीम ‘विकसित भारत’ आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक घरामध्ये राष्ट्रध्वज फडकवण्यास प्रोत्साहन देत ‘हर घर तिरंगा’ मोहीम सुरू ठेवण्याचे आवाहन नागरिकांना केले होते.दरवर्षी पंतप्रधान लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करतात यावर्षीही त्यांनी हे भाषण केले आहे.या दिवशी राष्ट्रीय सुट्टी जाहीर करून संपूर्ण देश हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला आहे.त्याला कोपरगाव तालुका अपवाद नव्हता.या ठिकाणी कोपरगाव पीपल्स बँकेने हा दिन उत्साहात संपन्न केला आहे.बँकेने दरवर्षी प्रमाणे सामाजिक उपक्रम व सामाजिक बांधीलकीतुन आयोजित केलेल्या बक्षीस व गणवेश वाटपाचा कार्यक्रम पार पडला.प्रथमतः बँकेचे चेअरमन राजेंद्र शिंगी यांनी सर्वांचे स्वागत करून बँके विषयी बोलतांना सांगितले की,”कोपरगांव पिपल्स को-ऑप बँकेने अमृत महोत्सव वर्षानिमित्त बँकेने मोबाईल बँकींग,क्यु.आर.कोड, गुगल पे,फोन पे,नॅच या सारख्या डिजिटल सुविधेचा शुभारंभ केलेला आहे.
त्यानंतर कोपरगावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच कोपरगांव शहरातील व परिसरातील एकुण २५ शाळांमधील गरजु व होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप व शालेय उपयोगी वस्तुमध्ये वायरलेस साउंड सिस्टीम,मुलांना बसण्यासाठी पी.व्ही.सी.मॅट,सतरंज्या,लेझीम पथकासाठी ढोल व सिलींग फॅन अशा शालेय उपयोगी वस्तुचे वाटप करण्यात कार्यक्रम पार पडला.यावेळी के.जे.सोमैय्या व एस.एस.जी.एम.या महाविद्यालयातील कला,वाणिज्य व विज्ञान शाखे मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना बँकेचे संचालक व अधिकारी यांच्या हस्ते बक्षीस देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
दरम्यान कोपरगांव शहरातील के.बी.पी.माध्यमिक विद्यालय,एस.जी.विद्यालय,सेवानिकेतन विद्यालय,कन्या विद्या मंदीर,शारदा इंग्लीश मेडियम स्कुल,विश्वात्मक जंगली महाराज गुरूकुल व इतर सर्व माध्यमीक विद्यालयातील १० वी व १२ मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.तसेच बँकेच्या सेवकांच्या पाल्यांनी विविध क्षेत्रात मिळविलेल्या यशा बद्दल त्यांचाही गौरव करण्यात आला. शहरातील सर्व माध्यमीक व प्राथमिक विद्यालयातील गरजू विद्यार्थी व विद्यार्थीनीना गणवेशाचे वाटप व शालेय उपयोगी वस्तु संचालक व सेवक वर्गाचे हस्ते देण्यात येऊन सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.
यावेळी संचालक कैलासचंद ठोळे,रविंद्र लोहाडे,धरमकुमार बागरेचा,कल्पेश शहा,अतुल काले,सत्येन मुंदडा,सुनिल बंब,रविंद्र ठोळे,दिपक पांडे,सुनिल बोरा,हेमंत बोरावके, वसंत आव्हाड,अनिल कंगले,भाऊसाहेब लोहकरे व संचालीका प्रतिभा शिलेदार आदींसह शहरातील सर्व शाळेतील शिक्षक,पालक,विद्यार्थी व बँकेचे सेवक वर्ग मोठ्या संख्येने हजर होते.
सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बँकेचे कर्मचारी पुजा पापडीवाल व राहुल लांडे यांनी केले.बँकेच्या या उपक्रमाबद्दल सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.