जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

महंत रामगिरीजी वादंग,…येथील दोन गट आमने सामने,एकाचा मृत्यू ?

न्यूजसेवा

कोपरगाव – (नानासाहेब जवरे )

   कोपरगाव शहरातील गोरक्षक समितीचे अध्यक्ष मयूर विधाटे याचे घरावर हल्ला झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी सामाजिक संकेत स्थळावर एका अल्पवयीन मुलाने श्री क्षेत्र सरला बेटाचे महंत रामगिरिजी महाराज यांचे विरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने त्याबाबत कोपरगाव तालुक्यातील धोत्रे येथे तीव्र प्रतिक्रिया उमटली होती.मात्र त्यात जेष्ठ नागरिक आणि पोलीस अधिकारी यांनी दोन्ही गटात समेट घडवून आणला असताना दोन गट नमाजाच्या वेळी आमनेसामने असताना तेथील एक नागरिक युनूस अकबर शहा (वय -58 )यास हृदय विकाराचा झ्टका आला असता त्यात त्यांना उपचारार्थ वैजापूर येथे खाजगी रुग्णालयात भरती केले असता त्यात ठिकाणी त्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केल्याने याबाबत परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.मात्र पोलिसांनी या प्रकरणी कोणताही वाद राहिला नाही असे स्पष्टीकरण दिल्याने वाद निवळला असल्याने मानले जात आहे.तरीही कोपरगाव तालुका पोलीस या बाबत दक्षता घेत आहे.

धोत्रे येथील एका अल्पवयीन युवकाने महंत रामगिरीजी महाराज यांनी केलेल्या विधानावर आपल्या ‘व्हॉट्सअप स्टेटस’वर आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती.त्याचे पडसाद उमटण्यास वेळ लागला नाही.त्याबाबत एका रामगिरीजी महाराज समर्थक इसमाने याचे कान उपटले असता त्या अल्पसंख्याक समाजाच्या मुलास त्याच्या समाजाच्या एका ज्येष्ठ इसमाने याबाबत त्या मुलास समज दिली होती.मात्र त्याने नमाजास आलेल्या अन्य समाज बांधवांना वैयक्तिक वादाचे रूपांतर सामाजिक करून,” तुम्हा सर्वांना शिवीगाळ केली” असे केले होते.त्यातून हा वाद चिघळला होता. तो आता मिटला आहे.

   नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील पंचाळे गावात एका धार्मिक कार्यक्रमात प्रवचन करताना नगर जिल्ह्यातील सरला बेटाचे महंत मठाधिपती रामगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्मीयांच्या भावना दुखावणारे वक्तव्य केले असल्याचा आरोप आहे.मोहंमद पैगंबर यांच्यासंबंधी आक्षेपार्ह विधान केल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे.त्यावरून मुस्लिम सामाजात संताप व्यक्त होत आहे.नाशिक,छत्रपती संभाजीनगर नंतर आज नगर जिल्ह्यातही मुस्लिमांनी आंदोलन केले.नगर शहर व राहाता येथे शुक्रवारी दुपारी शेकडो मुस्लिमांनी रस्त्यावर येत ‘रास्तो रोको’ आंदोलन केले आहे.राहाता,वैजापूर आदी ठिकाणी महंत रामगिरी महाराज यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला असल्याच्या बातम्या आहेत.कोपरगाव तालुका त्यास अपवाद ठरला नाही.आज सकाळी तालुक्यातील धोत्रे येथील एका अल्पवयीन युवकाने महंत रामगिरीजी महाराज यांनी केलेल्या विधानावर आपल्या ‘व्हॉट्सअप स्टेटस’वर आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती.त्याचे पडसाद उमटण्यास वेळ लागला नाही.त्याबाबत एका रामगिरीजी महाराज समर्थक इसमाने याचे कान उपटले असता त्या अल्पसंख्याक समाजाच्या मुलास त्याच्या समाजाच्या एका ज्येष्ठ इसमाने याबाबत त्या मुलास समज दिली होती.मात्र त्याने नमाजास आलेल्या अन्य समाज बांधवांना वैयक्तिक वादाचे रूपांतर सामाजिक करून,” तुम्हा सर्वांना शिवीगाळ केली” असे केले होते.त्यातून हा वाद चिघळला होता.मात्र त्याची तत्काळ दखल घेत घटनास्थळी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी व त्यांचे सहकारी गेले व दोन्ही समाजाच्या ज्येष्ठ नागरिकांना एकत्र करत हा वाद तातडीने जागेवर मिटवला होता.

    दरम्यान त्या ठिकाणी मयत इसम युनूस शहा हे घटनास्थळी हा घटनाक्रम पाहत उभे होते.त्याच वेळी त्यांना हृदय विकाराचा मोठा झटका आला असता ते अत्यवस्थ झाले होते.त्यांना तेथील नागरिकांनी तातडीने उपचारार्थ वैजापूर येथील खाजगी रुग्णालयात भरती केले होते.मात्र तेथे उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले आहे.दरम्यान याबाबत तेथील अनेक नागरिकांना आमच्या प्रतिनिधीने विचारणा केली असता सदर घटनेचा वरील वादाशी काही एक संबंध नाही असा दावा केला आहे.त्यास पोलिस अधिकारी संदीप कोळी यांनी दुजोरा दिला आहे.त्यामुळे सदरचा वाद मिटला असल्याचे मानले जात आहे.याबाबत पोलीस अधिकारी आणि नागरिकांचे स्वागत होत आहे.

दरम्यान मयत इसम युनूस शहा यांच्या पश्चात दोन मुले,तीन मुली असा परिवार आहे.त्यांच्यावर सायंकाळी आज अंत्यसंस्कार करण्यात आले असल्याची माहिती आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close