आदिवासी विकास विभाग
आदिवासीसाठी ८.८१ कोटी निधी मंजूर- माहिती

न्यूजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी )
कोपरगाव मतदार संघातील सर्वच गावांना समसमान न्याय देवून प्रत्येक गावाला विकासासाठी निधी दिला आहे.त्याप्रमाणेच मतदार संघातील प्रत्येक गावातील आदिवासी समाज बांधवांच्या विकासासाठी निधी मिळावा यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजने अंतर्गत कोपरगाव मतदार संघातील आदिवासी बांधवांच्या विकासासाठी ८.८१ कोटी निधी मंजूर झाला असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.

“कोपरगाव तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या विकासासाठी ८.८१ कोटी निधी मंजूर केला आहे.यामध्ये आदिवासी वस्तीत पेव्हिंग ब्लॉक बसविणे,रस्ते कॉंक्रीटीकारण करणे,बंदिस्त गटार बांधणे,समाज मंदिर बांधणे,पिण्याच्या पाण्याची टाकी बांधणे,सामाजिक सभागृह बांधणे,सांस्कृतिक भवन बांधणे,विविध मंदिर सुशोभिकरण करणे,स्मशानभूमी सुशोभिकरण करणे आदी कामांचा समावेश आहे”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव.
महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचा मुख्य उद्देश राज्यातील आदिवासींची आर्थिक पिळवणूक थांबवून त्यांचा विकास घडवून आणणे हा आहे.या उद्देशाच्या अनुषंगाने कार्य करण्यासाठी प्रभावी साधन म्हणून महाराष्ट्र शासनाद्वारे २२ मार्च १९७२ मध्ये महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० अन्वये महामंडळाची स्थापना करण्यात आली.त्याद्वारे राज्यातील आदिवासी साठी विविध योजना राबविण्यात येत आहे.कोपरगाव मतदार संघात मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव वाड्या वस्त्यावर राहत असून अतिशय कष्टाळू समाज म्हणून या समाजाकडे पाहिले जाते.या समाजाला महायुती शासनाने आदिवासी बांधवांच्या विकासासाठी ८.८१ कोटी निधी मंजूर केला आहे.यामध्ये मतदार संघातील सर्वच गावांचा समावेश असून प्रत्येक गावात विविध विकास कामे केली जाणार आहेत यामध्ये आदिवासी वस्तीत पेव्हिंग ब्लॉक बसविणे,रस्ते कॉंक्रीटीकारण करणे,बंदिस्त गटार बांधणे,समाज मंदिर बांधणे,पिण्याच्या पाण्याची टाकी बांधणे,सामाजिक सभागृह बांधणे,सांस्कृतिक भवन बांधणे,विविध मंदिर सुशोभिकरण करणे, स्मशानभूमी सुशोभिकरण करणे आदी कामांचा समावेश असून मतदार संघातील प्रत्येक गावातील आदिवसी वस्तीत हि कामे होणार आहेत.त्यामुळे आदिवासी वस्तीत वास्तव्य करणाऱ्या समाज बांधवांच्या अडचणी दूर होणार आहेत.यामुळे मतदार संघातील हजारो समाज बांधवांनी आ.आशुतोष काळे यांचेसह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार,पालकमंत्री राधाकृष्ण विखे,आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांचे आभार मानले आहे.