जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
उद्योग

कोपरगाव तालुक्यात होणार औद्योगिक शहर ?

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

    कोपरगाव तालुक्यातील व वैजापूर सीमेवर असलेल्या नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गावरील इंटरचेंजलगत धोत्रेसह सुमारे बावीस ठिकाणी औद्योगिक शहर (इंडस्ट्रियल टाऊनशिप) उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला होता मात्र त्यास धोत्रे आणि परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीला योग्य भाव मिळत नाही असा आरोप करत उपोषण करून सदर काम थांबवले होते.मात्र या प्रकरणी नुकतीच शेतकऱ्यांच्या एका गटाने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यावर मार्ग काढला असून त्या ठिकाणी हे औद्योगिक शहर उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची विश्वसनीय माहिती उपलब्ध झाली आहे.त्यामुळे तालुक्यातील तरुणांचा रोजगार मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

“ज्या शेतकऱ्यांनी या पूर्वी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे या औद्योगिक शहरास हरकत घेतली आहे त्यांच्या बागायती जमिनी वळगुन सदर औद्योगिक वसाहत राज्य सरकार करणार असेल तर त्यास आमची कोणतीही हरकत नाही”- पंडित शिंदे,शेतकरी कार्यकर्ते,धोत्रे,त.कोपरगाव.

     

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची धोत्रे येथील शेतकऱ्यांनी नुकतीच मुंबईत भेट घेऊन हा प्रकल्प पुन्हा एकदा सुरू करावा अशी गळ घातली आहे.

समृद्धी महामार्गावरील नाशिक जिल्ह्यातील सिन्नर व इगतपुरी या तालुक्यांमधील तीन इंटरचेंजलगत औद्योगिक शहरे उभारण्याबाबत रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक यांचेसह अन्य अधि काऱ्यांनी निमा हाउस येथे नाशिक येथील उद्योजकांसोबत बैठक घेतली होती.यावेळी संभाव्य टाऊनशिपचे सादरीकरण करण्यात आले होते.यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील धोत्रे,सावळीविहीर,नाशिक जिल्ह्यात सिन्नर तालुक्यातील गोंदे,इगतपुरी तालुक्यात घोटीजवळ टाऊनशिप उभारण्यात येणार असल्याची माहिती कैलास जाधव यांनी दिली होती.त्यानंतर नगर कोपरगाव तालुक्यातील धोत्रे,वैजापूर तालुक्यातील लाखगंगा,बापतरा,पुरणगाव आदी ठिकाणच्या साडेतीन हजार एकर क्षेत्रातील शेतकऱ्यांनी पंडित शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सन-2021 साली एक आंदोलन करून त्यास जोरदार विरोध केला होता.व सदर क्षेत्र मराठवाडा जलद कालव्याच्या खाली सिंचनाखाली असल्याचा दावा केला होता व सदर क्षेत्र वगळण्यासाठी मोठा दबाव निर्माण केला होता. सदरचे क्षेत्र नगरविकास विभागाकडून वगळण्यासाठी मागणी केली होती.त्या आंदोलनाची दखल महामंडळाचे अध्यक्ष व कृषी मंत्री दादा भुसे व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दखल घेऊन महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाला शेतकऱ्यांशी वैजापूर येथे चर्चा करून त्यांचे म्हणणे निमूटपणे ऐकून घ्यावे लागले होते.सदर बैठकीत त्यांनी एकूण क्षेत्राच्या पासष्ट टक्के शेतकऱ्यांना विरोध पाहून अखेर शेतकऱ्यांना आपल्या संमतीशिवाय हा प्रस्ताव होणार नाही असे लेखी आश्वासन दिले होते.

   दरम्यान धोत्रे या ठिकाणी औद्योगिक शहर व्हावे अशा एका विचाराच्या काही शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा उचल खाल्ली असून त्यांनी नुकतीच दिनांक 31 जुलै रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच मुंबईत भेट घेऊन हा प्रकल्प पुन्हा एकदा सुरू करावा अशी गळ घातली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यामुळे सदर औद्योगिक शहर व्हावे या विचाराच्या शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला असून पुन्हा एकदा या ठिकाणी संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.त्यात त्यांनी प्रामुख्याने तीन मागण्या केल्या असून त्यात सर्व क्षेत्र बागायती गृहीत धरावे,जलवाहिण्यांच्या फरक द्यावा अशा तीन मागण्या केल्या आहेत.दरम्यान,”आपण उपसमितीद्वारे मागण्या मंजूर करून लवकरात लवकर शेतकऱ्यांशी करार करणार असल्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या बातम्या हाती आल्या आहेत.त्यामुळे औद्योगिक शहर समर्थन करणाऱ्या शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.मात्र या प्रकल्पासाठी संपन्न होणाऱ्या जमिनी जुन्या आहेत की नव्या याचा खुलासा मिळू शकला नाही.

    सदर शिष्टमंडळात चिंतामण धोत्रे,केशव मोरे,सचिन वैद्य,गोरख वैद्य,युवराज खतोडे आदींचा समावेश असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यामुळे सदर गावी गुंतवणूक म्हणून ज्यांनी चढ्या भावाने जमिनी घेऊन ठेवल्या असून त्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.त्यामुळे हा विकास मार्ग आता कोणत्या बाजूस वळण घेणार याकडे नगर,संभाजीनगर येथील शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.

    दरम्यान या संबंधी पूर्वी आंदोलन केलेले कार्यकर्ते पंडित शिंदे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी, नसल्याची म्हटले आहे.त्यामुळे हा औद्योगिक वसाहतीचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हे आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close