लोकसभा कामकाज
तीन वर्षात साखर कारखान्याना १६२.१२ कोटी वितरीत- माहिती
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
साखर विकास निधी कायदा-१९८२ अंतर्गत साखर कारखान्याचे आधुनिकीकरण आणि विस्तार यासाठी तीन वर्षात साखर कारखान्याना १६२.१२ कोटी रुपये वितरीत करण्यात आल्याची माहिती लोकसभेत ग्राहक व्यवहार,अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी शिर्डी लोक्सभेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नास उत्तर देताना दिली आहे.
शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी गेल्या तीन वर्षात आणि आजपर्यंत साखर कारखान्यांच्या विस्तारीकरणासाठी आणि अधुनिकीकरणासाठी खास करून महाराष्ट्रासह प्राप्त झालेल्या राज्यवार प्रस्तावांचा तपशील विचारला होता त्यात,’गेल्या तीन वर्षात प्रत्येकी साखर कारखान्यांनी मिळालेल्या निधीचा पूर्णपणे वापर केला आहे अशी विचारणा केली होती.या शिवाय साखर विकास निधी कायदा-1982 अंतर्गत साखर कारखान्यांचे आधुनिकीकरण आणि विस्तार,ऊस विकास, बगॅसे-आधारित सह-उत्पादन ऊर्जा प्रकल्प,निर्जल अल्कोहोल किंवा इथेनॉल झिरो लिक्विड डिस्चार्ज (ZLD) प्लांटसाठी साखर कारखान्यांना किती कर्जे दिले.तथापि; दिनांक 21 सप्टेंबर 2021 च्या आदेशानुसार,साखर कारखानदारांना आर्थिक सहाय्य देण्याची योजना बंद करण्यात आली का अशी विचारणा केली होती.
गेल्या तीन वर्षात आणि आजतागायत साखर कारखान्यांच्या विस्तारीकरणासाठी आणि आधुनिकीकरणासाठी साखर विकास निधीतून अर्थसाहाय्य मिळविण्यासाठी कोणताही प्रस्ताव प्राप्त झालेला नाही”असे ग्राहक व्यवहार,अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगून 2021-22 या वर्षात ज्या साखर कारखान्यांना आर्थिक सहाय्य देण्यात आले होते त्यांचा तपशील दिला आहे.त्यात मेसर्स सदाशिराव मंडलिक कागल तालुका-एस.एस.के.लिमिटेड,सदाशिवनगर,हमीदवाडा- कौलगे,तालुका- कागल,जिल्हा- कोल्हापूर,इथेनॉल/झेड.एल.डी.900,29,600 रु. इथेणाल /झेड.एल.डी.,मेसर्स बन्नरी अम्मान शुगर्स लिमिटेड,गाव-अलगगांची,तालुका-नंजनगुड, जिल्हा-म्हैसूर, थेनॉल/झेड.एल.डी.कर्नाटक 14,99,70,400 रु.इथेणाल /झेड.एल.डी.मेसर्स बन्नरी अम्मान शुगर्स लिमिटेड,गाव अलगगंची,तालुका-नंजनगुड,जिल्… ३१,०१,७९,६०० रु.इथेणाल /झेड.एल.डी.,में नदी सहकारी सक्कारे कारखाना नियमित कृष्णानगर कर्नाटक-१३,९८,२०,४००/- सह उत्पादन,में.नदी सहकारी सक्कारे कारखाना नियमित कृष्णानगर कर्नाटक-३,८६,१२,१००/- सह उत्पादन,मे.नर्मदा खंड उद्याग सहकारी मंडळी धारीखेडा नर्मदा गुजरात १५,९०,०८,०००/- इथेणाल /झेड.एल.डी.,में कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना अन्कुश्नगर तालुका अंबड,२२,३३,७९,९००/- इथेणाल /झेड.एल.डी,एकूण १,२१,कोटी १० लाख,
सन २०२२-२०२३,मे.डी.सी.एम.श्रीराम लिमिटेड हरियाना हरडोई ३६,३१,३७,०००/- सह उत्पादन,मे.खटाव माण तालुका एंग्रो प्रोसेसिंग प्रा.लिमिटेड सातारा ४,२५,००,०००
, में कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना अन्कुश नगर तालुका अंबड ४५,९६,१००/एकून -४१,०२,३३,१००/-सन २०२३-२४ या वर्षात साखर कारखाना कोणतीही मदत दिली नसल्याची माहिती खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी शेवटी आपल्या उत्तरात मिळालेल्या माहितीतून शेवटी दिली आहे.