निवडणूक
कोपरगावात,’आगामी दिवस राजकीय उलथापालथी’ चे
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
राष्ट्रवादी अजित पवार गटाने राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीचे जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने कोपरगाव शहरात निवडणुकीचे बिगुल वाजलेले असताना नुकत्याच संपन्न झालेल्या या जनयात्रेत आ.आशुतोष काळे यांना मानणारे मुस्लिम समाजाचे पदाधिकारी,कार्यकर्ते गैरहजर असल्याची धक्कादायक घटना उघड झालेली असताना त्यांना सावरण्यास त्यांनी गौतम सहकारी बँकेत तातडीची बैठक आयोजित केली होती त्यात त्यांनी आ.काळे यांना भाजपसह महायुतीला नाकारण्याचा व महाआघाडीत जाण्याचा सल्ला देण्यात आल्याची खात्रीलायक माहिती हाती आल्याने आता विद्यमान आ.काळे हे नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे राष्ट्रवादी (अजित पवार गटाच्या) कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत तसेच आ.आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली आज रविवार दि.२८ जुलै रोजी दुपारी ०५ वा ‘कृष्णाई बॅक्वेट हॉल’ कोपरगाव येथे मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याची ‘जनसंवाद यात्रा’ आयोजित केली त्यासाठी राज्यातील राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर,युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.त्यात ज्यांना गेली पाच वर्ष आ.आशुतोष काळे यांनी मोठ्या प्रमाणावर मदत केली ते अल्पसंख्याक समाजाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते नव्याने प्रवेश केलेले अपवाद वगळता सर्वजण गैरहजर राहिल्याने मोठे वादंग उभे राहिले असून हा आ.आशुतोष काळे यांना मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.या संबंधी आमच्या प्रतिनिधीने ‘न्यूजसेवा ‘ या पोर्टलवर सविस्तर वाचा फोडली असता कोपरगाव विधानसभा मतदार संघात खळबळ उडाली होती.त्यावर आ.काळे यांनी सावध होऊन तातडीने कोपरगाव शहरात असलेल्या गौतम सहकारी बँकेच्या सभागृहात संबधित कार्यकर्त्यांची तातडीने बैठक घेऊन त्यात त्यांची कानउघडणी केली होती.व त्यांचे मनोगत जाणून घेतले होते.त्यास दुजोरा मिळाला असून त्यात त्यांनी आपण गत पाच वर्षात मुस्लिम समाजासाठी केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कामांचा जेखाजोखा मांडला असून 8.50 कोटींचा आगामीसर्वाधिक निधी दिला असल्याचे स्मरण करून दिले आहे.व आगामी काळात होत असलेल्या विधान सभेसाठी मदत करण्याचे आवाहन केले होते.तरीही त्यावेळी उपस्थित पदाधिकारी यांनी आ.काळे यांना आपण भाजप महायुती सोडून आपण शरद पवार यांची तुतारी हाती घेण्याची गळ घातल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.त्यामुळे आता त्यांचे पुढे दुहेरी संकट उभे राहिले असून,’ इकडे आड,’ तिकडे विहीर’ अशी स्थिती झाली आहे.कारण उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी आ.काळे यांना सर्वाधिक निधी मतदारसंघासाठी दिला आहे हे सर्वश्रुत आहे.अशा स्थितीत त्यांना सोडून दिले तर काळे यांच्यावर आगामी काळात कोणीही विश्वास ठेवणार नाही हे उघड गुपित आहे.त्यामुळे त्यांच्या मनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सोडण्याची बाब विचारधीन नाही.नव्हे तर तो विचारही आज रोजी त्यांना शिवत नाही ते अर्थमंत्री अजित पवार यांना सोडण्याची सुतराम शक्यता नाही हे सूर्य प्रकाशाइतके स्वच्छ आहे.अशा स्थितीत त्यांना त्यांच्याच कार्यकर्त्यांनी अडचणीत आणले असून,”भरवषाच्या म्हशीला टोणगा” अशी त्यांची स्थिती ओढवली आहे.त्यामुळे या गटाला आपल्यात ओढण्यास माजी आ.कोल्हे गट न सरसावला तर नवल आहे.त्यांचा डोळा त्यावर आधी पासूनच असून माजी आ.कोल्हे यांनी तसा गळ आधीच टाकून ठेवला असून ईशान्य गडावरील नेते तुतारी हाती येण्याची शक्यता वाढली आहे.व त्यासाठी तीन दिवसापासून मुंबईत ठाण मांडले असल्याची विश्वसनीय माहिती आहे.कोल्हे यांची भाजप मधून उचलबांगडी ठरलेली आहे.त्यांचे माजी महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे सख्य भाजप नेत्यांना डोळ्यातील कुसळा सारखे आधीच सलत आहेच.गणेश सहकारी साखर कारखाना निवडणूक ही त्याची सुरुवात होती.त्यानंतर त्यांनी विधानपरिषद नाशिक शिक्षक मतदार संघ निवडणूक लढवून हे दुसरे संकट ओढवून घेतले होते.त्यात अपयश आल्याने व त्यात जळगाव येथे मोठी पंचाईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्याने मोठा अनर्थ ओढवून घेतलेला आहेच.शिक्षण संस्था आणि कारखाना चौकशी यांचे संकट उभे राहिले होते.त्यातून ते अद्याप सावरलेले नाही.त्यामुळे त्यांनी भाजप सोडल्यात जमा आहे.केवळ औपचारिकता बाकी आहे.त्यामुळे त्यांना दुसरा घरोबा शोधणे गरजचे बनले असून आता हीच योग्य वेळ असल्याने तो घरोबा शोधण्याचे काम त्यांनी वेगाने सुरू केले आहे.आचार संहिता सुरू होण्याचे आत ही घोषणा होऊ शकत असल्याचे बोलले जात आहे.त्यासाठी शरद पवार यांची राष्ट्रवादी हा एक पर्याय आहे.
त्यामुळे नवी सोयरिकीचा त्यांनी शोध सुरू करून बरेच आठवले उलटले आहे.त्यात त्यांनी पहिला पर्याय म्हणून त्यांनी आधी शिवसेनेकडे (उद्धव गटाकडे) आपली पायधूळ या आधीच झाडली असून त्यासाठी स्थानिक पातळीवर आपले हितचिंतक शिवसेनेत मुजऱ्याला सोडले असल्याचे वृत्त आहे.मात्र स्थानिक शिवसेनेत त्यांची डाळ शिजली नाही.उद्धव सेनेने आपला खरा बाणा जागृत केला असल्याने त्यांची खरी पंचाईत झाली आहे.यात शक्यता ही ही असून शकते की,’स्थानिक शिवसेना आपला वाटाघाटीची शक्ती (बार्गेनिंग पॉवर) वाढवून नगरपरिषद आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत सत्तेचा हिस्सा वाढवून घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.मात्र तरीही त्यांना मुंबईस्थित वरिष्ठ नेत्याकडून आशा आहे.(नव्हे त्यांना अर्थपूर्ण पटविण्याचा चांगला अनुभव आहे) तरीही ‘ब’ पर्याय म्हणून राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची अर्थात शरद पवारांची तुतारी सोपी वाटू लागली असून मुस्लिम मते खुणावू लागली आहे.त्यासाठी त्यांनी आकाश पातळ करण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान त्या आधी त्यांनी पेरलेले त्या ठिकाणी उगविण्याची भीती असून त्या ठिकाणी त्यांची जागा आधीच प्रदेश प्रवक्ते म्हणून नियुक्ती झालेले संदीप वर्पे यांनी भरून काढली असून त्यांची या आधी प्रदेश सचिवपदी निवड झाल्यावर त्यांना त्या पदावरून अवघ्या चोवीस तासाच्या आत त्यांची उचलबांगडी केली होती.ती कोणी केली हे नव्याने सांगण्याची गरज नाही.त्यांचे कोपरगाव गांधी चौकातील फ्लेक्स कोणी उतरवले हे त्यांना चांगलेच माहिती आहे.त्यात ईशान्य गडाची मोठी भूमिका होती हे जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांना चांगलेच माहिती आहे.त्यामुळे त्या मार्गावरील त्यांची वाट खडतर दिसत आहे.तरीही त्यांना त्यातून काही मार्ग नक्कीच निघेल यावर विश्वास आहे.अर्थात त्यात स्थानिक मुस्लिम आघाडीचे त्यांना मिळालेले पाठबळ त्यांच्या शिडात हवा भरण्यास कारणीभूत आहे हे वेगळे सांगणे न लगे ! मात्र यात राष्ट्रवादीची तुतारी आधीच आपण वाजविणारा असल्याचे ऍड.संदीप वर्पे यांनी जाहीर केले आहे.त्यांची प्रतिमा अभ्यासू,निष्ठावान अशीच शरद पवार यांचे बाबत राहिली असल्याने नव्या फळीत नव्या तरुण नेतृत्वाला संधी देण्याचे धोरण शरद पवार यांनी घेतले असल्याने दक्षिण नगर मध्ये निलेश लंके यांना त्यांनी खासदार केले असल्याने त्यांची चुणूक नुकतीच पहावयास मिळाली आहे.त्यामुळे त्यांचे नशीब या नवीन धोरणात फळफळून आल्यास नवल नको.त्यामुळे तो धोरण त्यांच्या अडचणीत भर घालू शकत असल्याचे बोलले जात आहे.मात्र आ.काळे यांना अनेक धोके निर्माण झाले आहे हे वेगळे सांगणे न लगे.