जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

समन्वय समितीची बैठक का घेतली नाही -…या नेत्यांचा सवाल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

     
    लव्ह जिहाद व गोहत्ये-मुळेच शहरातील सलोखा बिघडू शकतो असा इशाराच आपण दि.१८ जुलैला जाहीरपणे दिला होता.प्रशासन,धार्मिक नेते व प्रमुख कार्यकर्त्यांनी जराही गांभीर्याने न घेतल्याने दुर्दैवाने शहरात एक बळी जाऊन काही परिवारही उघड्यावर पडले असून शहर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी समन्वय समितीची बैठक का घेतली नाही असा सवाल भाजप नेते व कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष विजय वहाडणे यांनी विचारला आहे.

“शहरात हिंदू-मुस्लिम समाजातील व राजकीय पक्ष-संघटनातील समजदार प्रतिनिधी बोलावून विचारविनिमय करणे सर्वांच्याच हिताचे आहे.हे शहर आपल्या सर्वांचेच आहे म्हणून सर्वांनीच एकत्रितपणे विचार केला पाहिजे.वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक होणे अत्यावश्यक आहे”- विजय वहाडने,माजी अध्यक्ष,कोपरगाव नगरपरिषद.

   कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कर्मवीरनगर जवळ सोयेल हरून पटेल याचा अनैतिक संबंधाच्या कारणावरून निर्घृण खून केल्या प्रकरणातील अटक आरोपी मच्छिंद्र सोनवणे,योगेश जाधव,महेश कट्टे यांना नुकतीच अटक केली असून यातील आणखी एक आरोपी विकी गोपाळ परदेशी यास आज पोलिसांनी जेरबंद केला असून त्यास न्यायालयासमोर हजर केले होते.त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असताना त्याचे पडसाद आता उमटू लागले असून या पार्श्वभूमीवर विजय वहाडणे यांची ही प्रतिक्रिया समोर आली आहे.

       दरम्यान वहाडणे यांनी आपल्या प्रसिध्दी पत्रकार  म्हटले आहे की,”या घटनेचे गांभीर्य ओळखून शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांनी का दुर्लक्ष केले ? अनेकदा सांगूनही शांतता समितीची मिटिंग का घेतली नाही ? केवळ शासकीय उपचार म्हणून काही बैठका होतात.पण त्याही बैठकांना फक्त ठराविक लोकांना बोलाविले जाते.खरे तर विविध पक्ष-संघटना-धर्मांचे प्रतिनिधी,समाजसेवक यांना निमंत्रण देणे गरजेचे आहे.अधूनमधून अशा बैठका घेतल्यास वेळच्या वेळी चर्चा-विचारविनिमय होऊन मतभेद-असंतोष नक्की कमी होऊ शकतो.गणेशोत्सव-ईद ए मिलाद-नवरात्रोत्सव,मोहरम आदी प्रसंगी घेतल्या जाणाऱ्या बैठका सर्वसमावेशक नसल्याने वादग्रस्त विषयावर विचारविनिमय-चर्चा न झाल्याने,व्यक्त होता न आल्याने असंतोष वाढत जातो.या बाबी संबंधित अधिकाऱ्यांच्या लक्षात येत नाहीत का ? कोपरगाव शहरातील सलोखा धोक्यात येत असतांना आता तरी प्रशासनाने जागे व्हावे.वाढती गुन्हेगारी,अवैध व्यवसाय रोखणार तरी कसे ?अवैध व्यवसाय करणाऱ्यांपेक्षा त्यांच्याकडून हप्ते घेणारे काही पोलीस व काही तथाकथित कार्यकर्तेच शहरातील कायदा-सुव्यवस्था बिघडविण्यासाठी जबाबदार आहेत.यात सुधारणा होणार नसल्यास होणाऱ्या परिणामांची जबाबदारी प्रशासनावर राहिल हे लक्षात घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
  
   दरम्यान शहरात हिंदू-मुस्लिम समाजातील व राजकीय पक्ष-संघटनातील समजदार प्रतिनिधी बोलावून विचारविनिमय करणे सर्वांच्याच हिताचे आहे.हे शहर आपल्या सर्वांचेच आहे म्हणून सर्वांनीच एकत्रितपणे विचार केला पाहिजे.वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक होणे अत्यावश्यक आहे.चुकीच्या प्रवृत्ती तर सर्वत्रच आहेत.पण आपल्या शहरात अशा चुकीच्या प्रवृत्ती फोफावून कायदा-सुव्यवस्था धोक्यात येणे मोठे घातक असल्याचे विजय वहाडणे यांनी शेवटी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close