जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

शिष्यवृत्ती परीक्षा गुणवत्ता यादीत…या संस्थेचे ४८ विद्यार्थी !

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

    महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयोजित पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाच्या आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकु‌लाच्या ४८ विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीत निवड झाली आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

  

  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या  पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत तीन विद्यार्थी तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ४५ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.आदिती हुले ही राज्य गुणवत्ता यादीत १५ वी आली आहे.

  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार दि.१८ फेब्रुवारी २०२४ रोजी पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक (इयत्ता आठवी) शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती.तिचे निकाल नुकतेच हाती आली आहे.त्यात हे  यश त्यांना प्राप्त झाले आहे.परीक्षेत तीन विद्यार्थी तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ४५ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.आदिती हुले ही राज्य गुणवत्ता यादीत १५ वी आली आहे.आत्मा मालिक सेमी इंग्लिश मिडीयम गुरुकुल हे सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये अव्वल ठरले असल्याची प्रतिक्रीया प्राचार्य निरंजन डांगे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

    दरम्यान यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे प्राचार्य निरंजन डांगे,विभाग प्रमुख सचिन डांगे,अनिल सोनवणे,सागर अहिरे,रमेश कालेकर,रविंद्र देठे,पर्यवेक्षक नयना शेटे,गणेश रासने,नितीन अनाप,सुनिल पाटील विषय शिक्षक राहुल जाधव,अनिता वाणी,किशोर बडाख,शिवम तिवारी,पंकज गुरसळ,नितीन अनाप,वनिता लोंढे, पांडुरंग वायखिंडे,ज्ञानेश्वर म्हस्के,अजय कांबळे,रविंद्र धावडे आदींचे मार्गदर्शन लाभले होते.

     सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अध्यक्ष नंदकु‌मार सूर्यवंशी,हनुमंतराव भोंगळे,विश्वस्त,प्रकाश भट,बाळासाहेब गोर्डे,प्रकाश गिरमे,शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक,वसतिगृह व्यवस्थापक साईनाथ वर्पे आदीनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close