लोकसभा कामकाज
शिर्डी,पंढरपूरसह नगर-मनमाड रस्त्याचा राष्ट्रपती अभिभाषणात उल्लेख नाही-यांचा खेद
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध शिर्डी साईबाबा,विठ्ठल रखुमाई मंदिर,वाट लागलेल्या नगर-मनमाड या रस्त्याबाबत राष्ट्रपतीच्या अभिभाषणात उल्लेख नसल्याबाबत शिर्डी लोक्सभा मतदारसंघाचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी संशोधन प्रस्ताव सादर केला असून त्यात शिर्डी धामच्या विकासासाठी तसेच साई धामला येणाऱ्या भाविकांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून निधी वाटप करण्याबाबतच्या अभिभाषणात कोणताही उल्लेख नसल्याबद्दल खेद व्यक्त केला आहे.
१८ व्या लोकसभेचे पहिले संसद अधिवेशन नुकतेच संपले असून त्यात पहिले दोन दिवस सदस्यांचा शपथविधी झाल्यानंतर २७ तारखेला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे अभिभाषण झाल्यावर त्याला पंतप्रधानांनी उत्तर दिले असून त्यानंतर खासदारांनी आपले संशोधन प्रस्ताव सादर केले आहे.त्यात शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी हा विषय उपस्थित केला आहे.
त्यावेळी प्रस्तावाच्या शेवटी त्यांनी,”साईबाबा शिर्डी धामला जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र आणि तीर्थक्षेत्र म्हणून विकसित करण्याबाबत संबोधनात कुठेही उल्लेख नाही याबद्दल खेद वाटत असल्याचे म्हंटले आहे.याशिवाय महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याचे आराध्य दैवत व चंद्रभागा नदीच्या काठी वसलेले विठ्ठल रखुमाई मंदिर विकसित करण्याबाबत कोणताही उल्लेख नाही असे सांगून नेमकेपणाने बोट ठेवले आहे.
दरम्यान गेली वीस-पंचवीस वर्षे दुर्दशेचे अवतार ठरलेला व वर्तमानात अत्यंत जीर्ण अवस्थेत असलेला आणि नगर जिल्ह्यातील सर्वच नेत्यांचे अपयश दर्शवत असलेल्या,अपघातातून अनेकांचे प्राण घेणाऱ्या मनमाड-अ.नगर राज्य महामार्गाची योग्य देखभाल करण्याबाबत या प्रस्तावात कोणताही उल्लेख नाही या बद्दल खेद व्यक्त केला आहे.
“महाराष्ट्रातील शिर्डी लोकसभा मतदारसंघात देशाच्या विविध भागांमध्ये आयटी पार्क उभारण्याबाबत कोणताही उल्लेख दिसत नाही याबद्दल खेद वाटत असल्याचे म्हंटले आहे.आणि प्रस्तावाच्या शेवटी,पुढील गोष्टी जोडल्या जाव्यात असे म्हणून त्यांनी “महाराष्ट्रातील शिर्डी लोकसभा मतदारसंघात आयटी प्रदर्शन आयोजित करण्यासाठी केंद्रीय सहाय्य देण्याबाबत पत्त्यात कोणताही उल्लेख नाही.शिर्डी धाम येथील पर्यटन विकासासाठी केंद्रीय निधी वाटप करण्याबाबत संबोधनात कुठेही उल्लेख नाही परंतु महाराष्ट्रातील कापूस उत्पादकांना केंद्रीय मदत देण्याबाबत पत्त्यात कुठेही उल्लेख नाही याबद्दल लक्षवेध केला आहे.
शिर्डी लोकसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांसाठी अधिक रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी सर्वसमावेशक केंद्रीय योजनेबद्दल कोणताही उल्लेख नाही.महाराष्ट्रातील लाखो बंद पडलेल्या छोट्या-मोठ्या कारखान्यांच्या पुनरुज्जीवनासाठी विशेष पॅकेज देण्याबाबत संबोधनात कुठेही उल्लेख नाही याबाबत खंत व्यक्त करून या बाबींचा समावेश करावा अशी आग्रही मागणी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी संशोधन प्रस्तावाद्वारे केली आहे.त्यामुळे मतदार संघातील नागरिकांनी त्यांच्या या मागणीबाबत समाधान व्यक्त केले आहे.