जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
धार्मिक

…या ठिकाणी,’आषाढी एकादशी उत्सव’ उत्साहात संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानने आज आषाढी एकादशी हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. यानिमित्त भाविकांसाठी श्री साईप्रसादालयात साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता.

आषाढी एकादशीनिमित्त श्री साईप्रसादालयात आयोजित साबुदाणा खिचडी महाप्रसादामध्ये सुमारे ५५ हजार भाविकांनी प्रसाद ग्रहण केला. तर २९,२०० भाविकांनी अन्नपाकिटांचा लाभ घेतला. यासाठी संस्थानने ७१ पोते साबुदाणा,४५ पोते शेंगदाणे,१०२० किलो तूप आणि सुमारे ३,६०० किलो बटाटे यासह इतर अनेक साहित्याचा वापर केला होता.

दरम्यान श्री समाधी मंदिर आणि परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती.
आषाढ शु ।।११ शके १९४६ आषाढी एकादशी हा दिवस श्री साईबाबांसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या दिवसाचे औचित्य साधून संस्थानने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. रात्री ८ ते ९ या वेळेत मंदिर कर्मचारी धर्मराज उपाडे यांचा कीर्तन कार्यक्रम संपन्‍न होईल. रात्री ९.१५ वाजता श्रींची पालखी शिर्डी गावातून मिरवणुकीत काढण्यात येणार असून पालखी समाधी मंदिरात परत आल्यानंतर श्रींची शेजारती करण्यात संपन्‍न होईल.


आषाढी एकादशीनिमित्त श्री साईप्रसादालयात आयोजित साबुदाणा खिचडी महाप्रसादामध्ये सुमारे ५५ हजार भाविकांनी प्रसाद ग्रहण केला. तर २९,२०० भाविकांनी अन्नपाकिटांचा लाभ घेतला. यासाठी संस्थानने ७१ पोते साबुदाणा,४५ पोते शेंगदाणे,१०२० किलो तूप आणि सुमारे ३,६०० किलो बटाटे यासह इतर अनेक साहित्याचा वापर केला.
याशिवाय, आषाढी एकादशीनिमित्त कर्नाटकमधील देणगीदार श्री एस.प्रकाश यांच्या देणगीतून श्री साईबाबा समाधी मंदिर, द्वारकामाई, चावडी आणि गुरुस्थान या ठिकाणी आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close