आरोग्य
..या उद्योग समूहातर्फे ग्रामीण रुग्णालयास वस्तूंचे वितरण
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोरूना विषाणूचा वाढता फैलाव लक्षात घेता सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेल्या येथील भागचंद माणिकचंद ठोळे उद्योग समुहाच्या वतीने येथील ग्रामीण रुग्णालयास सुमारे ५५ हजार रुपयांची औषधी व रुग्णालयास उपयुक्त असलेल्या वस्तू देणगी स्वरूपात देऊ केल्या आहेत त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोपरगावातील उद्योगपती कैलास चंद्र ठोळे यांच्या हस्ते ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदर यांचेकडे त्या सुपूर्त केल्या आहेत. त्यात सॅनीटायझर दहा लिटर,नेबी लायझर मशीन, नाईंटी फाईव्ह डिस्पोजल ग्लोज, स्टेरॉईड ग्लोज, नॉन टच थर्मामीटर,पी. पी.ई.किट आदी वस्तूंचा समावेश असल्याची माहिती डॉ.कृष्णा फुलसुंदर यांनी दिली.ठोळे उद्योग समूह सामाजिक क्षेत्रात कार्यात नेहमी अग्रेसर असतो विविध शिबिरे भरवणे आर्थिक दुर्बल घटकांना मदत करणे, ज्येष्ठ नागरिकांना सहकार्य करणे आदी विविध उपक्रम त्यांच्याकडून वर्षभर सुरू असतात अशी माहितीही युवक कार्यकर्ते राजेश ठोळे यांनी सांगितले आहे.