अपघात
विविध घटनांत तीन ठार,एक जखमी,गुन्हे दाखल
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज विविध तीन दुर्घटनांत राहुल बापूसाहेब खरणार,(वय-४६),मढी खुर्द.नंदुबाई तुळशीदास जाधव (वय-४८)रा.अनकवडे ता.येवला व समीर मोहंमद शेख (वय-३४) असे तिघे ठार झाले असून तुळशीदास भिवराव जाधव (वय-६०) हे गंभीर रित्या जखमी झाले आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरंगाव तालुक्यात येवला रोड अभिषेक ऍग्रो समोर काल सकाळी ८.३३ वाजता एक इसम बसच्या धडकेत ठार झाल्याची घटना ताजी असताना आज सकाळ पासून विविध तीन ठिकाणी वेगवेगळ्या घटना घडून त्यात तीन जण ठार झाले आहे.त्यात दोन पुरुष तर एक स्त्रीचा समावेश आहे.
दरम्यान पहिली घटना ही मढी येथे घडली असून यात सकाळी ७.४५ वाजता आपल्या घरात विजेच्या शॉक लागून त्यात राहूल बापूसाहेब खरणार (वय-४६) हे जागीच ठार झाले आहे.त्यांना शिर्डी येथील साईबाबा संस्थान रुग्नालयात उपचारार्थ भरती केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले आहे.या बाबत अनिल यादव खरणार यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंदणी केली आहे.
दरम्यान दुसऱ्या घटनेत नंदूबाई तुळशीदास जाधव व त्यांचे पती तुळशीदास भिवराव जाधव हे दोघे रा.अनकवडे ता.येवला हे दोघे नगर-मनमाड मार्गाने कोपरगावकडे येत असताना येसगाव शिवारात जिओ पेट्रोल पंपासमोर त्यांच्या दुचाकीस राजस्थानचा ट्रकने (क्र.आर.जे.०९ जी.डी.५५२५) जोराची धडक दिली असताना त्यात नंदूबाई जाधव (वय-४८) या गंभीर जखमी झाल्या असता त्यांचा त्यात मृत्यू झाला आहे.तर दुचाकीस्वार त्यांचे पती तुळसीदास जाधव हे गंभीर जखमी झाले आहे.
या प्रकरणी राहुल साहेबराव जावळे (वय-३७) रा.अनकवडे यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.ट्रक चालक आरोपी घटना घडल्यानंतर फरार झाला आहे.
दरम्यान तिसऱ्या घटनेत मयत समीर मोहंमद शेख रा.कोळगाव थडी हा धारणगाव शिवारातून कोळपेवाडी कडून कोपरगावकडे जात असताना त्यास रणशूर स्मारकाजवळ अज्ञात वाहनाने मयताच्या होंडा ऍक्टिव्हा (क्र.एम.एच.१७ सी.डब्ल्यू.४७६०) या दुचाकीस जोराची धडक दिली असता त्या धडकेत वरील इसम ठार झाला आहे.या प्रकरणी अमीर महमंद शेख (वय-३१) रा.कोळगाव थडी यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्र.२३२/२०२४ भा.द.वि.कलम ३०३(अ)२७९,४२७,सह मोटार वाहन कायदा कलम १८४ ,१३४,अ.ब.१७७ प्रमाणे दाखल केला आहे.
घटनास्थळी पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांचेसह पोलीस उपनिरीक्षक महेश कुसारे,जी.एस.वांढेकर यांनी भेट दिली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक कोळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.वांढेकर व सहाय्यक फौजदार महेश कुसारे हे करीत आहेत.