निधन वार्ता
रुपेंद्र काले यांना पितृशोक
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राहाता तालुक्यातील वाकडी येथील मूळ रहिवाशी असलेले व जुने किराणा व्यापारी विजयकुमार रायचंद काला (वय-८४) यांचे सोमवार दि.१० जून रोजी रात्री ११.३० वाजता श्रीरामपूर येथे वृद्धापकाळाने निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात एक भाऊ,पत्नी शकुंतला काला,८ बहिणी,चार मुले,एक मुलगी असा मोठा परिवार आहे.ते निळवंडे कालवा कृती समितीचे अध्यक्ष व संकेत नर्सरीचे संचालक रुपेंद्र काला,व गणेशनगर येथील वर्धमान नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष जयचंद काला,कैलास काला,आनंद काला आदींचे पिताश्री होते.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
स्व.विजयकुमार काला हे वाकडी परिसरात एक सुसंस्कृत व प्रेमळ व्यापारी व्यक्तिमत्व म्हणून परिचित होते.त्यांनी अनेकांना प्रतिकूल परिस्थितीत मदत केली होती.त्यांनी नंतर प्रगतशील शेतकरी म्हणून आपली परिसरात ओळख निर्माण केली होती.त्यांची प्रकृती अनेक दिवसापासून खालावली होती.त्यांच्यावर अनेक ठिकाणी उपचार सुरू होते.मात्र त्यांना वाचविण्यात वैद्यकिय अधिकाऱ्यांना यश आले नाही.अखेर त्यांची काल रात्री ११.३० वाजता श्रीरामपूर येथील निवासी निधन झाले आहे.त्यांच्यावर श्रीरामपूर येथील स्मशानभूमीत आज दुपारी ०२ वाजेच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
त्यांच्या निधनाबद्दल शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे,केंद्रीय सिफाचे अध्यक्ष व शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथ दादा पाटील,शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट,उपाध्यक्ष ऍड.अजित काळे,क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव नांदखिले,निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,कार्याध्यक्ष मच्छीन्द्र दिघे,गंगाधर रहाणे,उपाध्यक्ष संजय गुंजाळ,सोन्याबापू उऱ्हे सर,सचिव कैलास गव्हाणे,माजी उपाध्यक्ष रमेश दिघे,संघटक नानासाहेब गाढवे,कौसर सय्यद,अप्पासाहेब कोल्हे,अशोक गांडोळे,माजी सरपंच वसंत थोरात,ऍड.योगेश खालकर,जवळके सरपंच सारिका विजय थोरात,तानाजी शिंदे,ज्ञानेश्वर शिंदे गुरुजी,बाळासाहेब सोनवणे,सोमनाथ दरंदले,उत्तमराव जोंधळे,विठ्ठलराव देशमुख,संदेश देशमुख आदींसह अनेकांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.